Saturday, November 10, 2018
सौर ऊर्जा क्षेत्रातील शासकीय व इतर संस्था
केंद्र शासनाने अपारंपरिक ऊर्जास्रोत मंत्रालय निर्माण केले आहे व प्रत्येक राज्याने राज्य पातळीवर ऊर्जा विकास अभिकरण स्थापन केले आहे. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा मंडळ) ही स्वायत्त संस्था १९८५ साली स्थापन केली. हे अभिकरण खालील अपारंपरिक ऊर्जास्रोतांच्या विकासासाठी काम करते.
आपण ह्य़ा अक्षय मिळणाऱ्या सौर ऊर्जेसंबंधी विचार करणार असल्याने सौर ऊर्जा क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांची व सौर ऊर्जा उपकरणे तयार करणाऱ्या निर्मात्यांची
माहिती मिळवणार आहोत, ती पुढीलप्रमाणे आहे. भारतामध्ये इंदोर, चंडीगड, मदुराई, वल्लभ विद्यानगर, कलकत्ता व पुणे येथे क्षेत्रीय परीक्षण केंद्रे कार्यरत आहेत.
या केंद्रांमध्ये विविध अपारंपरिक ऊर्जास्रोत उपकरणांच्या शास्त्रशुद्ध चाचण्या घेऊन उपकरणांच्या कार्यक्षमतेचे प्रमाणपत्र दिले जाते. पुण्यातील क्षेत्रीय केंद्राचा पत्ता पुढीलप्रमाणे. स्कूल ऑफ एनर्जी स्टडिज, भौतिकी विभाग, पुणे विश्वविद्यालय, पुणे ४११ ००७, दूरध्वनी क्रमांक (०२०) ५६५६०६१, ५६५५२०१, ई-मेल : mgt@physics.unipune.emet.in पुणे विद्यापीठात विविध अपारंपरिक ऊर्जास्रोतांविषयी संशोधन केले जाते. जिज्ञासूंनी वरील विभागाशी संपर्क साधल्यास अद्ययावत माहिती व तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळू शकेल. भारत सरकारने केंद्रात दिल्ली येथे एक स्वतंत्र अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाची स्थापना केली आहे. त्याला टठफए म्हणतात. म्हणजेच Ministry of New and renewable Energy MNRE (Ministry of New & Renewable Energy)
नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय, ब्लॉक नं. १४, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोदी रोड, नवी दिल्ली- ११० ००३, फोन ९१११२४३६३०३५, २४३६०७०७, वेब : www.mnre.gov.in
येथून एक अक्षयउर्जा नावाचे मासिकही निघते. त्यात देखील ही ऊर्जा वापरण्यासाठी मिळणाऱ्या सवलती, फायदे व अनुदानांबद्दलची माहिती असते. ह्य़ा सवलती मिळविण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे केंद्राला त्याची शिफारस लागते. ‘नाबाड’ देखील ह्य़ासाठी कर्ज देते. ‘नाबार्ड’ ही संस्था बँकांना कर्ज देते व बँक आपणास कर्ज देते. नाबाड हे कर्ज शेतकऱ्यांना,काही मर्यादित अपारंपरिक ऊर्जा योजनांसाठीच देते.

Monday, November 5, 2018
सेल्फी विथ रांगोळी स्पर्धा !
दिवाळीचा सण, करू या रांगोळीच्या रंगांची उधळण.
सहभागी व्हा फक्त एक सेल्फी पाठवून ...............
तुम्हाला, तुमच्या आईला, ताईला किंवा इतरांना जर रांगोळी काढता येत असेल तर या दिवाळीत तुमच्या रांगोळीसोबत एक सेल्फी पाठवा आणि बनू शकाल तुमच्या तालुक्यातील/जिल्ह्यातील सेल्फी-विथ-रांगोळी' स्पर्धेचे विजेते.
"सेल्फी विथ रांगोळी स्पर्धा, पुणे"
• दिनांक १ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर दरम्यान ही स्पर्धा पुणे विभागामधील MS-CIT व KLiCच्या सर्व अधिकृत केंद्रांमार्फत ही स्पर्धा राबवली जाईल.
• या स्पर्धेमध्ये कोणीही सहभागी होऊ शकतात त्यासाठी कोणतीही वयोगटाची अट किंवा वयाची वर्गवारी नसणार आहे.
• ही स्पर्धा केवळ WhatsApp माध्यमाचा वापर करून घेतली जाणार आहे त्यामुळे प्रत्यक्ष रांगोळी स्पर्धा भरवली जाणार नाही.
• स्पर्धकाने दीपावलीच्या काळात आपल्या घरी काढण्यात आलेल्या रांगोळीचा फोटो केंद्राच्या WhatsApp नंबरवर आपल्या नावासहित पाठवून स्पर्धेतला आपला सहभाग नोंदवू शकतात.
Whatsapp no. 9860000045
• या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना MKCL, पुणे विभागातर्फे प्रमाणपत्र दिले जाईल.
अधिक माहितीसाठी आजच आपल्या शासन मान्यताप्राप्त MS-CIT प्रशिक्षण केंद्र. एस. के. कॉम्प्युटर्स मधे संपर्क साधा.
एस. के. कॉम्प्युटर्स, उषःक़ाल हौसिंग सोसा. कृष्णानगर रोड, महंमदवाडी पोलीस चौकीसमोर, तरवडेवस्ती, महंमदवाडी, पुणे – ६०. "माय ऊर्जा" शॉपी शेजारी
फोन:02026970964 / 8411900045
Click here and visit
Locations:
Thursday, February 15, 2018
सोलर इलेक्ट्रिक सिस्टिम कशी काम करते ?
सोलर इलेक्ट्रिक सिस्टिम विज निर्मितीचे नवे किफयतशिर व प्रदूषण रहित तंत्र .
सध्याचा काळ हा अपारंपरिक ऊर्जा स्रोत वापरण्याचा काळ आहे. अपारंपरिक पर्यावरणपूरक ऊर्जा स्रोतांद्वारे निर्माण केलेल्या ऊर्जेमुळे निसर्गाचे तसेच पर्यावरणाचे संवर्धन होण्यास मदत होते. सौर ऊर्जा हा एक त्यामधील महत्वाचा ऊर्जा स्रोत आहे जो आपण अगदी कमी किमतीमध्ये वापरण्यास चालू करू शकतो. आज आपण त्याबद्दल माहिती बघणार आहोत.
सोलर इलेक्ट्रिक सिस्टिम कशी काम करते ?
सोलर सिस्टिम मध्ये Photo Voltaic सेल वापरले जातात. PV सेल हे सेमीकंडक्टर मटेरियल पासून बनवले जातात. या सेल वर प्रकाश पडला असता यामधून इलेक्ट्रॉन चे वहन चालू होते. म्हणजेच वीज निर्मितीला सुरुवात होते. ही वीज DC म्हणजेच डायरेक्ट करंट स्वरूपातील असते, जी बॅटरी मध्ये साठवली जाऊ शकते. ही वीज घरातील उपकरणांसाठी वापरण्यासाठी इन्व्हर्टर चा वापर करून AC म्हणजेच alternating current मध्ये रूपांतरित केली जाते.

सोलर इलेक्ट्रिक सिस्टिम्स पुढील प्रकारांमधून वापरल्या जातात :
1) सोलर ऑफ ग्रीड ( off - grid ) सिस्टिम :
ज्या ठिकाणी विजेची उपलब्धता नसेल, परंतु घरगुती उपकरणे, TV , मिक्सर , फ्रिज, इ. वापरायची आहेत तेथे ही सिस्टिम वापरली जाते. या सिस्टिम मध्ये सोलर पॅनल, चार्ज कंट्रोलर, इन्व्हर्टर, बॅटरी वापरली जाते. किती क्षमतेचा पॅनल, इन्व्हर्टर, बॅटरी वापरायची हे उपकरणांच्या energy consumption , तसेच रोज कोणते उपकरण किती तास वापरायचे आहे यावर अवलंबून आहे. या सिस्टिम मध्ये दिवसभर बॅटरी सोलर द्वारे चार्जे करून रात्री वीज वापरू शकतो. या सिस्टिम ला बॅटरी मेन्टेनन्स करण्याची तसेच ३ ते ५ वर्षानंतर बॅटरी बदलण्याची गरज असते.

2) सोलर हायब्रीड सिस्टिम:
ही सिस्टिम सोलर off grid सिस्टिम सारखीच असते परंतु यामध्ये सोलर वर तसेच MSEB सप्लाय वर चार्जिंग ची सुविधा असते. या सिस्टिम मध्ये सोलर इन्व्हर्टर वापरला जातो. या सिस्टिम जिथे लोड शेडींग आहे तेथे वीज बिल काही प्रमाणात कमी करण्याच्या दृष्टीने वापरल्या जातात. या सिस्टिम ला बॅटरी मेन्टेनन्स करण्याची तसेच ३ ते ५ वर्षानंतर बॅटरी बदलण्याची गरज असते.

3) सोलर ग्रीड टाय ( GRID - Tie / ON GRID ) सिस्टिम :
या सोलर सिस्टिम मध्ये सोलर पॅनल आणि सोलर स्ट्रिंग इन्व्हर्टर वापरला जातो. या सिस्टिम मध्ये दिवसभर तयार झालेल्या सोलर ऊर्जेचे रूपांतर अल्टर्नेट करंट मध्ये केले जाते आणि ही वीज MSEB कडे नेट मीटर द्वारे निर्यात केली जाते. रात्रीच्या वेळी ही वीज आयात केली जाते. हे सिस्टिम वीज बिल कमी करण्यासाठी वापरली जाते. ही सिस्टिम वापरण्यासाठी दिवसभर लाईट असणे गरजेचे आहे. जर लाईट नसेल तर ही सिस्टिम वीज निर्यात करू शकत नाही तसेच बॅटरी नसल्यामुळे साठवता तसेच वापरताही येत नाही. या सिस्टिम मध्ये बॅटरी नसल्यामुळे मेंटेनन्स खूप कमी असतो. शहरांमध्ये तसेच जेथे लोड शेडींग नाही अशा ठिकाणी ही सिस्टिम वापराने फायदेशीर ठरू शकते. यासाठी MSEB किंवा स्थानिक वीज वितरण कंपनीची परवानगी घ्यावी.

जिथे commercial वीज मीटर आहे अशा व्यावसायिकांना MSEB ची वीज १० ते १३ रस. प्रति युनिट ने विकत घ्यावी लागते. अशा व्यावसायिकांसाठी ही सोलर सिस्टिम खूप फायदेशीर ठरू शकते.
१ किलो वॅट सोलर सिस्टिम सरासरी १२० युनिट प्रति महिना वीज तयार करते. तसेच खाली दिल्याप्रमाणे आपली वीज बिलामध्ये बचत होऊ शकते. १ किलोवॅट सोलर सिस्टिम मुळे वर्षभरात १ ते १.५ टन कार्बन पर्यावरणात येण्यापासून वाचतो. त्यामुळे प्रदूषण नियंत्रणास मदत होते.
आपण जर रेसिडेन्शिअल ग्राहक असाल आणि आपले लाईट बिल Rs ७०० ते ८०० येत असेल किंवा १२० पेक्षा जास्त युनिट प्रति महिना विजेचा वापर होत असेल तर आपल्याला १ किलो वॅट सोलर सिस्टिम ची गरज आहे.
आपण जर कमर्शिअल ग्राहक असाल आणि आपले वीज बिल ११०० ते १४०० येत असेल किंवा १२० युनिट पेक्षा जास्त विजेचा वापर असेल तर आपल्याला १ किलो वॅट सोलर सिस्टिम ची गरज आहे.
आपल्या वीज बिलावर तसेच वर्षभरातील सरासरी विजेच्या वापर नुसार नेमका किती क्षमतेचा सोलर पॉवर प्लांट लागणार आहे याची कल्पना येऊ शकते.
आपली विजेची गरज, घराचे अथवा व्यवसायाचे ठिकाण, मंजुर भार, इमारतीचे छत, सावली , आपल्या एरिया मध्ये GRID ची उपलब्धता इ. चे सर्वेक्षण करून सोलर सिस्टिम ची साईझ ठरवावी लागते तसेच किंमत या सर्व गोष्टींवर अवलंबून असते.
सोलर सिस्टिम बसवून घेताना त्याच्या किमतीकडे जास्त लक्ष न देता त्यामधील मालाचा दर्जा, गुणवत्ता, तसेच आपल्याला मिळणारी सेवा याचा विचार करणे गरजेचे आहे. अन्यथा आपले नुकसान होऊ शकते. आपली गरज नेमकी कोणत्या सिस्टिम ची आहे हे समजून घेणे गरजेचे आहे.
आपल्या माहिती साठी खाली सोलर सिस्टिमचे दर देत आहे. हे दर प्रत्यक्षात कमी जास्त होऊ शकतात.
1 KW : सोलर पॅनल 1000 Wp , स्ट्रिंग इन्व्हर्टर , ACDB , DCDB , support structure , नेट मीटर, अर्थिंग किट, लायटनिंग अरेस्टर, केबल, इ. तसेच नेट मीटर परवानगी.
वीज वापर १२० ते १३० युनिट प्रति महिना
किंमत रू 90,000/-
किंमत रू 90,000/-
2 KW : सोलर पॅनल 2000 Wp , स्ट्रिंग इन्व्हर्टर , ACDB , DCDB , support structure , नेट मीटर, अर्थिंग किट, लायटनिंग अरेस्टर, केबल, इ. तसेच नेट मीटर परवानगी.
वीज वापर २४० ते २६० युनिट प्रति महिना
किंमत रू 1,80,000/-
किंमत रू 1,80,000/-
3 KW : सोलर पॅनल 3000 Wp , स्ट्रिंग इन्व्हर्टर , ACDB , DCDB , support structure , नेट मीटर, अर्थिंग किट, लायटनिंग अरेस्टर, केबल, इ. तसेच नेट मीटर परवानगी.
वीज वापर ३६० ते ३८० युनिट प्रति महिना
किंमत रू 2,70,000/-
किंमत रू 2,70,000/-
5 KW : सोलर पॅनल 5000 Wp , स्ट्रिंग इन्व्हर्टर , ACDB , DCDB , support structure , नेट मीटर, अर्थिंग किट, लायटनिंग अरेस्टर, केबल, इ. तसेच नेट मीटर परवानगी.
वीज वापर ६०० ते ६२० युनिट प्रति महिना
व्यावसायिकांची वार्षिक बचत: ७५,०००/-
करामध्ये सवलत: १ लाख पर्यंत
किंमत रू 4,00,000/-
व्यावसायिकांची वार्षिक बचत: ७५,०००/-
करामध्ये सवलत: १ लाख पर्यंत
किंमत रू 4,00,000/-
10 KW : सोलर पॅनल 10000 Wp , स्ट्रिंग इन्व्हर्टर , ACDB , DCDB , support structure , नेट मीटर, अर्थिंग किट, लायटनिंग अरेस्टर, केबल, इ. तसेच नेट मीटर परवानगी.
वीज वापर 1200 ते 1250 युनिट प्रति महिना
व्यावसायिकांची वार्षिक बचत: १,५०,०००/-
करामध्ये सवलत: २ लाख पर्यंत
किंमत रू 8,00,000/-
वीज वापर 1200 ते 1250 युनिट प्रति महिना
व्यावसायिकांची वार्षिक बचत: १,५०,०००/-
करामध्ये सवलत: २ लाख पर्यंत
किंमत रू 8,00,000/-
हे दर आपल्याला अंदाज यावा म्हणून दिलेले दर आहेत. यामध्ये १ वर्ष देखभाल खर्च समाविष्ट असतो तसेच सोलर पॅनल ला २५ वर्षाची परफॉर्मन्स वॉरंटी असते तसेच इन्व्हर्टर ला ५ ते १० वर्षाची वॉरंटी असते. या सिस्टिम चे लाईफ २५ ते ३० वर्षे असते.
ज्यांना कोणाला सोलर संदर्भात काही शंका असतील तर कंमेंट मध्ये विचारू शकता.
दिवसभर चौकशीसाठी फोन चालु असतो त्यामुळे फक्त whats app संदेश करू शकता.
whats app ९८६०००००४५
दिवसभर चौकशीसाठी फोन चालु असतो त्यामुळे फक्त whats app संदेश करू शकता.
whats app ९८६०००००४५
Subscribe to:
Comments (Atom)