Wednesday, February 26, 2020

MS-CIT च का ?

MS-CIT च का ?

जगात आय.टी. क्षेत्रात भारताचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरणाऱ्या ‘परम’ महासंगणकाचे निर्माते तसेच जागतिक दर्जाचे आय.टी. तज्ञ डॉ. विजय भटकरसर व डॉ. विवेक सावंतसर यांच्या मार्गदर्शनाखाली बनविलेला अभ्यासक्रम.
MKCL ही महाराष्ट्र शासनाची अधिकृत संस्था आहे …..
( महाराष्ट्र राज्य उच्च तंत्रशिक्षण मंडळ – MSBTE )

MKCL देशभरात – केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या इतर राज्यांमध्येही त्या त्या राज्यांच्या मातृभाषेत MS-CIT कोर्स चालविला जातो. ( RS-CIT, OS-CIT, HS-CIT, TS-CIT, MS-CIT etc.. )
MKCL आंतरराष्ट्रीय – केवळ भारतातच नव्हे तर भारताबाहेर UAE (दुबई), सौदी अरेबिया, घाना, युरोप, इजिप्त, श्रीलंका या देशांमध्येही या अभ्यासक्रमांचे यशस्वी संचालन.
अशाप्रकारे MKCL ही जगातील अव्वल दर्जाची संस्था असून ERA या जगभरात लोकप्रिय असणाऱ्या शिक्षण प्रणालीच्या माध्यमातून शिक्षण देते.
शासनाच्या GR नुसार शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना
MS-CIT अनिवार्य आहे.
डिप्लोमा इंजिनीअरिंग साठी प्रवेश घेणाऱ्या विध्यार्थ्यांना CMF ह्या विषयाचा पेपर द्यावा लागत नाही.
MS-CIT च्या अभ्यासक्रमातील अत्याधुनिक सोफ्टवेअर जसे मायक्रोसॉफ्ट विन्डोज 10 व मायक्रोसॉफ्ट ऑफिस 2013 हे फक्त MS-CIT मध्येच समाविष्ट
कोर्स साठी लागणारे सोफ्टवेअर हे अधिकृत (Licence Copy) असल्याने सन्मानाने शिक्षण
MS-CIT च्या प्रत्येक केंद्रात अत्याधुनिक कंप्युटर ची व्यवस्था
MS-CIT च्या प्रत्येक केंद्रात लाईट गेल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून UPS ची सोय
MS-CIT ची परीक्षा शासनाच्या MSBTE बोर्डाकडून घेतली जाते.
MS-CIT केंद्रात असतात MKCL OnCeT सर्टिफाईड प्रशिक्षक.
MS-CIT केंद्रात असतो प्रत्येक विद्यर्थ्याला स्वतंत्र कंप्युटर व मिळतो पुरेसा वेळ.
MS-CIT कोर्स सोबत इंग्रजी व मराठी कॉम्पुटराइज टायपिंग कोर्स (प्रमाणपत्रासह)
MS-CIT परीक्षा दिल्यानंतर त्वरित प्रोविजनल सर्टिफिकेट तसेच अल्पावधीतच फायनल सर्टिफिकेट
माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्याना ICT साठी MS-CIT केल्यास फायद्याचेच परंतु ICT चा पुढचा टप्पा म्हणून विद्यार्थ्यांची MS-CIT लाच पसंती.
या तसेच इतर अनेक वैशिष्ट्यांमुळे MS-CIT आहे आंतरराष्ट्रीय दर्जाचा परिपूर्ण कंप्युटर कोर्स.
असे असतानाही अनेक प्रयत्न करूनही MS-CIT केंद्र मिळण्यास अपात्र ठरणाऱ्या काही संस्था चालकांकडून विद्यार्थी तसेच पालकांची दिशाभूल करून MS-CIT बरोबर नामसाधर्म्य असणारे कोर्सेस थोपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तरी जागरूक विद्यार्थी व पालकांनी आपली फसवणूक टाळावी व अधिकृत केंद्रातच आपला प्रवेश निश्चित करावा…..

एस. के. कॉम्प्युटर्स
(महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे अधिकृत MS-CIT संगणक प्रशिक्षण केंद्र)
“पित्रुपुण्य़ाय” १८/२०, उषःक़ाल हौसिंग सोसा. (पोस्टल कॉलनी), महंमदवाडी पोलीस चौकीसमोर, तरवडेवस्ती, महंमदवाडी, पुणे – ४११०६०. भ्रमणध्वनी-९८६०००००४५
Website : https://skcomputers-theinstitute.business.site
Map : https://g.co/kgs/teFohDTo

#Mscit,#mkcl,#MSCIT, #SKCOMPUTERS, #hadapsar, #Mohammadwadi, #computertraining,#MKCL,

Saturday, February 22, 2020

पर्याय स्वंयपाकाच्या गॅसला


पर्याय स्वंयपाकाच्या गॅसला
सबसिडीचे सहा सिलेंडर आणि गॅस च्या किंमतीत दिवसेंदिवस होणाऱ्या भावावाढी मुळे आता स्वंयपाकाच्या गॅस ला पर्याय शोधणं गरजेचं झालं आहे. अद्यावत तंत्रज्ञानामूळे स्वंयपाक घरात नाना प्रकारची उपकरणं आली. कॉफी मेकर, सॅण्डविच मेकर, राईस कुकर, ओव्हन, मायक्रोव्हेव यासारख्या अत्याधुनिक उपकरणांनी स्वयंपाक घरं सजली, तरी स्वंयपाकाच्या गॅसला रास्त आणि स्वस्त पर्यायाविषयी बरेच जण अनभिज्ञ आहेत. काही पर्याय माहीत असले तरी त्याची जुजबी माहीती आणि शंका यामुळे सामान्य माणुस या पर्यायांचा अवलंब करताना कचरतात. परंतु आता सर्वांनाच याची गरज वाटू लागली आहे. सोलार कूकर , इंडक्शन कुकर आणि हॅलोजन कूकर या काही पर्यायांनी आपण गॅस बरोबरच वीज बचत करून स्वादिष्ट अन्न जरुर करु शकतो.
भारतात वर्षभर भरपूर सुर्य प्रकाश उपलब्ध असतो. आपल्या आर्थिक विकासासाठी तसेच घरघुती वापरासाठी आपण या उर्जेचा उपोयोग करु शकतो. सुर्यापासून भारताच्या भुमीवर प्रत्येक चौरसमीटरवर एका तासात सधारपणे ५ ते ७ किलोवॅट इतकी सौर उर्जा उपलब्ध होते. म्हणजेच वर्षभरात ६०,००० अब्ज मेगावॅट अवर इतकी उर्जा विनामुल्य आपल्याला उपलब्ध होते आणि आपण ही उर्जा वाया घालवतो. हीच उर्जा आपण जर सौर उपकरणां मार्फत उपोयोगात आणली तर खर्चिक इंधन आणि विजेचा प्रश्न निकालात निघेल

इंडक्श्न कुकर :
इंडक्श्न कुकर हा विजेवर चालणारा आहे. यात उपकरणात आलेली विज थेट भांड्यात जाते त्यामुळे अन्न पटकन शिजते. यात फक्त कुकरचा भांड्याखालाचा पृष्ठभाग गरम होतो आणि भांड्य़ात ही ज्या पातळी पर्यंत अन आहे, त्या पातळी पर्यंतच भांडे गरम होते. म्हणजेच तुम्ही भांडे हाताने ही उचलू शकता. इडक्श्न कुकर electro magnetic induction technology वर आधारित आहे. इडक्श्न कुकर ला जरी २००० वॅट उर्जा लागत असली तरी त्यावरील अन्न पटकन शिजते त्यामूळे विज बचत होते. उदा. जर २००० वॅट चा इंडक्श्न कुकर १ तास चालला तर तर विजेचे २ युनिट खर्च होतील. आणि जर विजचे दर पर युनिट ६ रुपये पकडला तर २ युनिट साठी आपण १२ रुपये खर्च करतो. या कुकरची स्वछता पटकन करता येते, या कुकरसाठी विशिष्ठ प्रकारची आणी सपाट पॄष्ठ भाग असलेली भांडी वापरावी लागतात. साधारण ३००० ते ४३०० रुपायां पर्यंत इडक्श्न कुकर उपलब्ध आहे. यात बजाज , फिलिप्स यासारखी ब्रॅण्डेड तसेच नॉन ब्रॅण्डेड कंपन्याचे इंडक्श्न कुकर आहेत.
हॅलोजन कुकर :
पाश्चिमात्य देशात सध्या हॅलोजन कुकर च्या नवनवीन रेंज आलेल्या आहेत. भारतात ही हॅलोजन कूकरचा पर्याय उपलब्ध आहेत. हॅलोजन कूकर मध्ये हॅलोजन बल्बचा वापर करण्यात येतो. हॅलोजन बल्ब पटकन तापत असल्याने त्यापासून निर्माण होणाऱ्या उष्णतेने अन्न पटकन शिजते. हॅलोजन कुकर वेगवेगळ्या आकारात उपलब्ध आहे. मायक्रोव्हेव अवन तसेच इडक्शन कूकर सारख्याच आकारात उपलब्ध आहे. यात ही टेमप्रेचर नियंत्रीत करण्याची सोय आहे. साधारणत: २००० रुपायां पासून पूढे हॅलोजन कुकर च्या किंमती आहे
ही नवनवीन उत्पादनांची खरेदी करताना चोखंदळ ग्राहकांनी सर्व बाबींची खातरजमा करणं आवश्यक आहे. उत्पादनांची वॉरन्टी, गॅरन्टी तसेच मॅन्टेन्स कॉस्ट या सर्व गॊष्टींची पडताळणी गरजेचं आहे. याबरोबरच आय. एस. आय. प्रमाणित आणि ५ स्टार चिन्हांकीत उत्पादनेच खरेदी करा.


Friday, January 25, 2019

राज्यात 3200 मेगावॅट सोलार प्रकल्प उभारण्यात येतील

येत्या दोन वर्षात महावितरण द्वारे राज्यात 3200 मेगावॅट सोलार प्रकल्प उभारण्यात येतील, अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज  मंत्रालयात झालेल्या एका बैठकीत दिली. या बैठकीत महावितरणच्या 16 झोन मधील प्रत्येक मुख्य अभियंताकडून 200 मेगावॅट सोलर प्रकल्प उभारण्याबाबत निर्देश देण्यात आले. या बैठकीस ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव अरविंद सिंह, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार, विश्वास पाठक उपस्थित होते.
राज्यातील सर्व नळयोजना, उपसासिंचन योजना (खाजगी व शासकीय) तसेच ग्रामपंचायत मधील सर्व शासकीय इमारती (शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत भवन, आरोग्य केंद्रे) सौर ऊर्जेवर आणाव्यात या बाबत ऊर्जामंत्री यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत ऊर्जा संवर्धन धोरणा अंतर्गत या योजना राबवण्यात याव्या तसेच या योजनेकरिता 500 कोटीचे बजेट तयार करून मंत्रिमंडळासमोर सादर करण्याचे निर्देशही ऊर्जामंत्री यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. ऊर्जासंवर्धन धोरणा अंतर्गत पहिल्या टप्प्यात महावितरण कडून या योजना राबविण्यात येतील. 
या बैठकीत एचव्हीडीएस, इन्फ्रा - 2, दिनदयाल उपाध्याय व आय‍पीडीएस योजनेबाबतही आढावा घेण्यात आला. मार्च 2019 पर्यंत इन्फ्रा 2, दिनदयाल उपाध्याय तसेच आयपीडीएस योजनेचे काम पूर्ण करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री यांनी महावितरणला दिले. मुंबई, नवीमुंबई, पनवेल, कल्याण, औरंगाबाद, चंद्रपूर, ठाणे व नांदेड विभागात आयपीडीएसची कामे महानगर पालिकेद्वारे रस्ता पुर्नस्थापना दर मान्य न केल्यामुळे  पूर्ण झाली नाहीत ती पूर्ण कराव्यात तसेच एचव्हीडीएस योजनेत ज्या भागात विद्युत वाहक यंत्रणा पोहचणे शक्य नाही त्या भागात सोलार कृषी पंप देण्याचे निर्देशही बावनकुळे यांनी दिले.
राज्यात 750 मेगावॅट सोलार प्रकल्प महाजनकोद्वारे राबवण्यात येणार आहेत. यापुढे सौर ऊर्जेचे छोटे प्रकल्प महावितरण कडून तर महाजनको कडून मोठे प्रकल्प पूर्ण करण्यात येतील.
संकलन : लोकमत 

Saturday, November 10, 2018

पारंपरिक वीज वापरात बचत करण्याच्या उद्देशाने राज्यात अटल सौर कृषिपंप योजनेअंतर्गत सात हजार सौर कृषिपंप वाटप होणार...

पारंपरिक वीज वापरात बचत करण्याच्या उद्देशाने राज्यात अटल सौर कृषिपंप योजनेअंतर्गत सात हजार सौर कृषिपंप वाटपास मंत्रिमंडळाने बुधवारी 3 ऑक्टोबर २०१८ रोजी  मान्यता दिल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली..
ते पुढे म्हणाले, की या योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा पिकांना सिंचन करणे शक्य होईल. ही संपूर्ण योजना महाऊर्जाकडून राबविण्यात येईल. योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या सौर कृषिपंपांपैकी २५ टक्के पंप हे ३ अश्वशक्तीचे, तर ७५ टक्के पंप ५ अश्वशक्तीचे असतील. ३ व ५ अश्वशक्ती पंपांच्या एकूण उद्दिष्टापैकी २२.५ टक्के पंप अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांसाठी राखीव राहणार आहेत. उर्वरित ७७.५ टक्के पंप सर्वसाधारण वर्गातील लाभार्थ्यांसाठी राहतील. पंपापोटी ५ टक्के हिस्सा शेतकऱ्याला भरावा लागणार आहे. ९५ टक्के वाटा  केंद्र आणि राज्य शासन उचलणार आहे.
   कृषिपंपाचा हमी कालावधी ५ वर्षांचा व सोलर मोड्यूल्सची हमी १० वर्षांची असणार आहे. कृषिपंप पुरवठा धारकावर ५ वर्षांसाठी पूर्ण देखभाल व दुरुस्ती करार करण्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे. सिंचनाची सोय असलेले शेतकरी या योजनेस पात्र ठरणार आहेत. तसेच, त्या शेतकऱ्याकडे पारंपरिक पद्धतीने वीज जोडणी नसावी. ५ एकरांपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्याला ३ अश्वशक्ती, तर ५ एकरांपेक्षा जास्त जमीन असलेल्या शेतकऱ्याला ५ अश्वशक्तीचा पंप देता येणार आहे.
   पारंपरिक ऊर्जेद्वारे विद्युतीकरण न झालेले शेतकरी, वनविभागाचे प्रमाणपत्र न मिळालेले शेतकरी, महावितरणकडे पैसे भरून वीज जोडणी प्रलंबित असलेले शेतकरी, ज्यांना नजीकच्या काळात वीज जोडणी मिळणार नाही असे शेतकरी, अतिदुर्गम भागातील शेतकरी, शासनाच्या धडक सिंचन योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना या योजनेत प्राधान्य राहील. वैयक्तिक, सामुदायिक शेततळे, बारमाही वाहणारी नदी, नाल्याशेजारील शेत जमीनधारकही या योजनेसाठी पात्र राहतील.
    शासनाच्या निकषानुसार लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे. तहसीलदार, जिल्हा कृषी अधीक्षक, समाज कल्याण सहायक आयुक्त, भूजल सर्वेक्षणचे वरिष्ठ वैज्ञानिक, आदिवासी विभागाचे प्रकल्प अधिकारी, महावितरणचे अधीक्षक अभियंता आणि महाऊर्जाचे विभागीय व्यवस्थापक यांचा या समितीत समावेश असेल. राज्य स्तरावरील सुकाणू समितीचे अध्यक्ष प्रधान सचिव, ऊर्जा हे योजनेचे नियंत्रण करणार आहेत.
१४ हजार हेक्टर क्षेत्र येणार सिंचनाखाली
    या योजनेअंतर्गत १४ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल. योजनेमुळे कृषिपंप ग्राहकांना शासनातर्फे देण्यात येणाऱ्या अनुदानामध्ये ६३ कोटींची बचत होईल. क्रॉस सबसिडीही १६८ कोटींनी कमी होईल. वीजदर कमी होतील. पारंपरिक व अपारंपरिक पद्धतीने करण्यात येणाऱ्या वीजनिर्मितीतही बचत होणार आहे. याशिवाय राज्य शासनाद्वारे राज्यात एक लाख सौर कृषिपंप बसवण्यासाठी नवीन योजना तयार करण्यासही मंत्रिमंडळाने या वेळी मान्यता दिली आहे, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
 असे असेल पंपांचे वितरण आणि     किंमत
३ अश्‍वशक्ती   -  २ लाख ४० हजार रुपये किंमत
५ अश्‍वशक्ती  -  ३ लाख २५ हजार रुपये किंमत
३ अश्‍वशक्ती  -  १७५० पंप बसविणार
५ अश्‍वशक्ती  -  ५२५० पंप बसविणार

सौर ऊर्जा क्षेत्रातील शासकीय व इतर संस्था

केंद्र शासनाने अपारंपरिक ऊर्जास्रोत मंत्रालय निर्माण केले आहे व प्रत्येक राज्याने राज्य पातळीवर ऊर्जा विकास अभिकरण स्थापन केले आहे. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा मंडळ) ही स्वायत्त संस्था १९८५ साली स्थापन केली. हे अभिकरण खालील अपारंपरिक ऊर्जास्रोतांच्या विकासासाठी काम करते. 
आपण ह्य़ा अक्षय मिळणाऱ्या सौर ऊर्जेसंबंधी विचार करणार असल्याने सौर ऊर्जा क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांची व सौर ऊर्जा उपकरणे तयार करणाऱ्या निर्मात्यांची 
माहिती मिळवणार आहोत, ती पुढीलप्रमाणे आहे. भारतामध्ये इंदोर, चंडीगड, मदुराई, वल्लभ विद्यानगर, कलकत्ता व पुणे येथे क्षेत्रीय परीक्षण केंद्रे कार्यरत आहेत. 
या केंद्रांमध्ये विविध अपारंपरिक ऊर्जास्रोत उपकरणांच्या शास्त्रशुद्ध चाचण्या घेऊन उपकरणांच्या कार्यक्षमतेचे प्रमाणपत्र दिले जाते. पुण्यातील क्षेत्रीय केंद्राचा पत्ता पुढीलप्रमाणे. स्कूल ऑफ एनर्जी स्टडिज, भौतिकी विभाग, पुणे विश्वविद्यालय, पुणे ४११ ००७, दूरध्वनी क्रमांक (०२०) ५६५६०६१, ५६५५२०१, ई-मेल : mgt@physics.unipune.emet.in  पुणे विद्यापीठात विविध अपारंपरिक ऊर्जास्रोतांविषयी संशोधन केले जाते. जिज्ञासूंनी वरील विभागाशी संपर्क साधल्यास अद्ययावत माहिती व तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळू शकेल. भारत सरकारने केंद्रात दिल्ली येथे एक स्वतंत्र अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाची स्थापना केली आहे. त्याला टठफए म्हणतात. म्हणजेच Ministry of New and renewable Energy  MNRE (Ministry of New & Renewable Energy)
नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय, ब्लॉक नं. १४, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोदी रोड, नवी दिल्ली- ११० ००३, फोन ९१११२४३६३०३५, २४३६०७०७, वेब : www.mnre.gov.in
येथून एक अक्षयउर्जा नावाचे  मासिकही निघते. त्यात देखील ही ऊर्जा वापरण्यासाठी मिळणाऱ्या सवलती, फायदे व अनुदानांबद्दलची माहिती असते. ह्य़ा सवलती मिळविण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे केंद्राला त्याची शिफारस लागते. ‘नाबाड’ देखील ह्य़ासाठी कर्ज देते. ‘नाबार्ड’ ही संस्था बँकांना कर्ज देते व बँक आपणास कर्ज देते. नाबाड हे कर्ज शेतकऱ्यांना,काही मर्यादित अपारंपरिक ऊर्जा योजनांसाठीच देते.    

Monday, November 5, 2018

सेल्फी विथ रांगोळी स्पर्धा !

दिवाळीचा सण, करू या रांगोळीच्या रंगांची उधळण.

सहभागी व्हा फक्त एक सेल्फी पाठवून ...............

तुम्हाला, तुमच्या आईला, ताईला किंवा इतरांना जर रांगोळी काढता येत असेल तर या दिवाळीत तुमच्या रांगोळीसोबत एक सेल्फी पाठवा आणि बनू शकाल तुमच्या तालुक्यातील/जिल्ह्यातील सेल्फी-विथ-रांगोळी' स्पर्धेचे विजेते. 

"सेल्फी विथ रांगोळी स्पर्धा, पुणे"
दिनांक १ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर दरम्यान ही स्पर्धा पुणे विभागामधील MS-CIT व KLiCच्या सर्व अधिकृत केंद्रांमार्फत ही स्पर्धा राबवली जाईल.
या स्पर्धेमध्ये कोणीही सहभागी होऊ शकतात त्यासाठी कोणतीही वयोगटाची अट किंवा वयाची वर्गवारी नसणार आहे.
ही स्पर्धा केवळ WhatsApp माध्यमाचा वापर करून घेतली जाणार आहे त्यामुळे प्रत्यक्ष रांगोळी स्पर्धा भरवली जाणार नाही. 
स्पर्धकाने दीपावलीच्या काळात आपल्या घरी काढण्यात आलेल्या रांगोळीचा फोटो केंद्राच्या WhatsApp नंबरवर आपल्या नावासहित पाठवून स्पर्धेतला आपला सहभाग नोंदवू शकतात. 

Whatsapp no. 9860000045

या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना MKCL, पुणे विभागातर्फे प्रमाणपत्र दिले जाईल.  

अधिक माहितीसाठी आजच आपल्या शासन मान्यताप्राप्त MS-CIT प्रशिक्षण केंद्र. एस. के. कॉम्प्युटर्स मधे संपर्क साधा.

एस. के. कॉम्प्युटर्स, उषःक़ाल हौसिंग सोसा. कृष्णानगर रोड, महंमदवाडी पोलीस चौकीसमोर, तरवडेवस्ती, महंमदवाडी, पुणे – ६०. "माय ऊर्जा" शॉपी शेजारी
फोन:02026970964 / 8411900045

Click here and visit

Locations:

Thursday, February 15, 2018

सोलर इलेक्ट्रिक सिस्टिम कशी काम करते ?

सोलर इलेक्ट्रिक सिस्टिम विज निर्मितीचे नवे  किफयतशिर व प्रदूषण रहित तंत्र .
सध्याचा काळ हा अपारंपरिक ऊर्जा स्रोत वापरण्याचा काळ आहे. अपारंपरिक पर्यावरणपूरक ऊर्जा स्रोतांद्वारे निर्माण केलेल्या ऊर्जेमुळे निसर्गाचे तसेच पर्यावरणाचे संवर्धन होण्यास मदत होते. सौर ऊर्जा हा एक त्यामधील महत्वाचा ऊर्जा स्रोत आहे जो आपण अगदी कमी किमतीमध्ये वापरण्यास चालू करू शकतो. आज आपण त्याबद्दल माहिती बघणार आहोत.
सोलर इलेक्ट्रिक सिस्टिम कशी काम करते ?
सोलर सिस्टिम मध्ये Photo Voltaic सेल वापरले जातात. PV सेल हे सेमीकंडक्टर मटेरियल पासून बनवले जातात. या सेल वर प्रकाश पडला असता यामधून इलेक्ट्रॉन चे वहन चालू होते. म्हणजेच वीज निर्मितीला सुरुवात होते. ही वीज DC म्हणजेच डायरेक्ट करंट स्वरूपातील असते, जी बॅटरी मध्ये साठवली जाऊ शकते. ही वीज घरातील उपकरणांसाठी वापरण्यासाठी इन्व्हर्टर चा वापर करून AC म्हणजेच alternating current मध्ये रूपांतरित केली जाते.
सोलर इलेक्ट्रिक सिस्टिम्स पुढील प्रकारांमधून वापरल्या जातात :
1) सोलर ऑफ ग्रीड ( off - grid ) सिस्टिम :
ज्या ठिकाणी विजेची उपलब्धता नसेल, परंतु घरगुती उपकरणे, TV , मिक्सर , फ्रिज, इ.  वापरायची आहेत  तेथे ही सिस्टिम वापरली जाते. या सिस्टिम मध्ये सोलर पॅनल, चार्ज कंट्रोलर, इन्व्हर्टर, बॅटरी वापरली जाते. किती क्षमतेचा पॅनल, इन्व्हर्टर,  बॅटरी वापरायची हे उपकरणांच्या energy consumption , तसेच रोज कोणते उपकरण किती तास वापरायचे आहे यावर अवलंबून आहे. या सिस्टिम मध्ये दिवसभर बॅटरी सोलर द्वारे चार्जे करून रात्री वीज वापरू शकतो. या सिस्टिम ला बॅटरी मेन्टेनन्स करण्याची तसेच ३ ते ५ वर्षानंतर बॅटरी बदलण्याची गरज असते.
2) सोलर हायब्रीड सिस्टिम:
ही सिस्टिम सोलर off grid सिस्टिम सारखीच असते परंतु यामध्ये सोलर वर तसेच MSEB सप्लाय वर चार्जिंग ची सुविधा असते. या सिस्टिम मध्ये सोलर इन्व्हर्टर वापरला जातो.  या सिस्टिम जिथे लोड शेडींग आहे तेथे वीज बिल काही प्रमाणात कमी करण्याच्या दृष्टीने  वापरल्या जातात. या सिस्टिम ला बॅटरी मेन्टेनन्स करण्याची तसेच ३ ते ५ वर्षानंतर बॅटरी बदलण्याची गरज असते.
3) सोलर ग्रीड टाय ( GRID - Tie / ON GRID ) सिस्टिम :
या सोलर सिस्टिम मध्ये सोलर पॅनल आणि सोलर स्ट्रिंग इन्व्हर्टर वापरला जातो. या सिस्टिम मध्ये दिवसभर तयार झालेल्या सोलर ऊर्जेचे रूपांतर अल्टर्नेट करंट मध्ये केले जाते आणि ही वीज MSEB कडे नेट मीटर द्वारे निर्यात केली जाते. रात्रीच्या वेळी ही वीज आयात केली जाते. हे सिस्टिम वीज बिल कमी करण्यासाठी वापरली जाते. ही सिस्टिम वापरण्यासाठी दिवसभर लाईट असणे गरजेचे आहे. जर लाईट नसेल तर ही सिस्टिम वीज निर्यात करू शकत नाही तसेच बॅटरी नसल्यामुळे साठवता तसेच वापरताही येत नाही. या सिस्टिम मध्ये बॅटरी नसल्यामुळे मेंटेनन्स खूप कमी असतो. शहरांमध्ये तसेच जेथे लोड शेडींग नाही अशा ठिकाणी ही सिस्टिम वापराने फायदेशीर ठरू शकते. यासाठी MSEB किंवा स्थानिक वीज वितरण कंपनीची परवानगी घ्यावी.
जिथे commercial वीज मीटर आहे अशा व्यावसायिकांना MSEB ची वीज १० ते १३ रस. प्रति युनिट ने विकत घ्यावी लागते. अशा व्यावसायिकांसाठी ही सोलर सिस्टिम खूप फायदेशीर ठरू शकते.
१ किलो वॅट सोलर सिस्टिम सरासरी १२० युनिट प्रति महिना वीज तयार करते. तसेच खाली दिल्याप्रमाणे आपली वीज बिलामध्ये बचत होऊ शकते.  १ किलोवॅट सोलर सिस्टिम मुळे वर्षभरात १ ते १.५ टन कार्बन पर्यावरणात येण्यापासून वाचतो. त्यामुळे प्रदूषण नियंत्रणास मदत होते.
आपण जर रेसिडेन्शिअल ग्राहक असाल आणि आपले लाईट बिल Rs ७०० ते ८०० येत असेल किंवा १२० पेक्षा जास्त युनिट प्रति महिना विजेचा वापर होत असेल तर आपल्याला १ किलो वॅट सोलर सिस्टिम ची गरज आहे.
आपण जर कमर्शिअल ग्राहक असाल आणि आपले वीज बिल ११०० ते १४०० येत असेल किंवा १२० युनिट पेक्षा जास्त विजेचा वापर असेल तर आपल्याला १ किलो वॅट सोलर सिस्टिम ची गरज आहे.
आपल्या वीज बिलावर तसेच वर्षभरातील सरासरी विजेच्या वापर नुसार नेमका किती क्षमतेचा सोलर पॉवर प्लांट लागणार आहे याची कल्पना येऊ शकते.
आपली विजेची गरज, घराचे अथवा व्यवसायाचे ठिकाण, मंजुर भार, इमारतीचे छत, सावली , आपल्या एरिया मध्ये  GRID ची उपलब्धता इ. चे सर्वेक्षण करून सोलर सिस्टिम ची साईझ ठरवावी लागते तसेच किंमत या सर्व गोष्टींवर अवलंबून असते.
सोलर सिस्टिम बसवून घेताना त्याच्या किमतीकडे जास्त लक्ष न देता त्यामधील मालाचा दर्जा, गुणवत्ता, तसेच आपल्याला मिळणारी सेवा याचा विचार करणे गरजेचे आहे. अन्यथा आपले नुकसान होऊ शकते. आपली गरज नेमकी कोणत्या सिस्टिम ची आहे हे समजून घेणे गरजेचे आहे.
आपल्या माहिती साठी खाली सोलर सिस्टिमचे दर देत आहे. हे दर प्रत्यक्षात कमी जास्त होऊ शकतात.
1 KW : सोलर पॅनल 1000 Wp , स्ट्रिंग इन्व्हर्टर , ACDB , DCDB , support structure , नेट मीटर, अर्थिंग किट, लायटनिंग अरेस्टर, केबल, इ.  तसेच नेट मीटर परवानगी.  
वीज वापर १२० ते १३० युनिट प्रति महिना
किंमत रू 90,000/-
2 KW : सोलर पॅनल 2000 Wp , स्ट्रिंग इन्व्हर्टर , ACDB , DCDB , support structure , नेट मीटर, अर्थिंग किट, लायटनिंग अरेस्टर, केबल, इ.  तसेच नेट मीटर परवानगी.
वीज वापर २४० ते २६० युनिट प्रति महिना
किंमत रू 1,80,000/-
3 KW : सोलर पॅनल 3000  Wp , स्ट्रिंग इन्व्हर्टर , ACDB , DCDB , support structure , नेट मीटर, अर्थिंग किट, लायटनिंग अरेस्टर, केबल, इ.  तसेच नेट मीटर परवानगी.
वीज वापर ३६० ते ३८० युनिट प्रति महिना
किंमत रू 2,70,000/-
5 KW : सोलर पॅनल 5000 Wp , स्ट्रिंग इन्व्हर्टर , ACDB , DCDB , support structure , नेट मीटर, अर्थिंग किट, लायटनिंग अरेस्टर, केबल, इ.  तसेच नेट मीटर परवानगी.
वीज वापर ६०० ते ६२० युनिट प्रति महिना
व्यावसायिकांची वार्षिक बचत: ७५,०००/-
करामध्ये सवलत: १ लाख पर्यंत
किंमत रू 4,00,000/-
10 KW : सोलर पॅनल 10000 Wp , स्ट्रिंग इन्व्हर्टर , ACDB , DCDB , support structure , नेट मीटर, अर्थिंग किट, लायटनिंग अरेस्टर, केबल, इ.  तसेच नेट मीटर परवानगी.
वीज वापर 1200 ते 1250 युनिट प्रति महिना
व्यावसायिकांची वार्षिक बचत: १,५०,०००/-
करामध्ये सवलत: २ लाख पर्यंत
किंमत रू 8,00,000/-
हे दर आपल्याला अंदाज यावा म्हणून दिलेले दर आहेत. यामध्ये १ वर्ष देखभाल खर्च समाविष्ट असतो तसेच सोलर पॅनल ला २५ वर्षाची परफॉर्मन्स वॉरंटी असते तसेच इन्व्हर्टर ला ५ ते १० वर्षाची वॉरंटी असते. या सिस्टिम चे लाईफ २५ ते ३० वर्षे असते.
ज्यांना कोणाला सोलर संदर्भात काही शंका असतील तर कंमेंट मध्ये विचारू शकता.
दिवसभर चौकशीसाठी फोन चालु असतो त्यामुळे फक्त whats app संदेश करू शकता.
whats app ९८६०००००४५