Saturday, February 22, 2020
पर्याय स्वंयपाकाच्या गॅसला
Friday, January 25, 2019
राज्यात 3200 मेगावॅट सोलार प्रकल्प उभारण्यात येतील
Saturday, November 10, 2018
पारंपरिक वीज वापरात बचत करण्याच्या उद्देशाने राज्यात अटल सौर कृषिपंप योजनेअंतर्गत सात हजार सौर कृषिपंप वाटप होणार...
पारंपरिक वीज वापरात बचत करण्याच्या उद्देशाने राज्यात अटल सौर कृषिपंप योजनेअंतर्गत सात हजार सौर कृषिपंप वाटपास मंत्रिमंडळाने बुधवारी 3 ऑक्टोबर २०१८ रोजी मान्यता दिल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली..
ते पुढे म्हणाले, की या योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा पिकांना सिंचन करणे शक्य होईल. ही संपूर्ण योजना महाऊर्जाकडून राबविण्यात येईल. योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या सौर कृषिपंपांपैकी २५ टक्के पंप हे ३ अश्वशक्तीचे, तर ७५ टक्के पंप ५ अश्वशक्तीचे असतील. ३ व ५ अश्वशक्ती पंपांच्या एकूण उद्दिष्टापैकी २२.५ टक्के पंप अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांसाठी राखीव राहणार आहेत. उर्वरित ७७.५ टक्के पंप सर्वसाधारण वर्गातील लाभार्थ्यांसाठी राहतील. पंपापोटी ५ टक्के हिस्सा शेतकऱ्याला भरावा लागणार आहे. ९५ टक्के वाटा केंद्र आणि राज्य शासन उचलणार आहे.
कृषिपंपाचा हमी कालावधी ५ वर्षांचा व सोलर मोड्यूल्सची हमी १० वर्षांची असणार आहे. कृषिपंप पुरवठा धारकावर ५ वर्षांसाठी पूर्ण देखभाल व दुरुस्ती करार करण्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे. सिंचनाची सोय असलेले शेतकरी या योजनेस पात्र ठरणार आहेत. तसेच, त्या शेतकऱ्याकडे पारंपरिक पद्धतीने वीज जोडणी नसावी. ५ एकरांपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्याला ३ अश्वशक्ती, तर ५ एकरांपेक्षा जास्त जमीन असलेल्या शेतकऱ्याला ५ अश्वशक्तीचा पंप देता येणार आहे.
पारंपरिक ऊर्जेद्वारे विद्युतीकरण न झालेले शेतकरी, वनविभागाचे प्रमाणपत्र न मिळालेले शेतकरी, महावितरणकडे पैसे भरून वीज जोडणी प्रलंबित असलेले शेतकरी, ज्यांना नजीकच्या काळात वीज जोडणी मिळणार नाही असे शेतकरी, अतिदुर्गम भागातील शेतकरी, शासनाच्या धडक सिंचन योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना या योजनेत प्राधान्य राहील. वैयक्तिक, सामुदायिक शेततळे, बारमाही वाहणारी नदी, नाल्याशेजारील शेत जमीनधारकही या योजनेसाठी पात्र राहतील.
शासनाच्या निकषानुसार लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे. तहसीलदार, जिल्हा कृषी अधीक्षक, समाज कल्याण सहायक आयुक्त, भूजल सर्वेक्षणचे वरिष्ठ वैज्ञानिक, आदिवासी विभागाचे प्रकल्प अधिकारी, महावितरणचे अधीक्षक अभियंता आणि महाऊर्जाचे विभागीय व्यवस्थापक यांचा या समितीत समावेश असेल. राज्य स्तरावरील सुकाणू समितीचे अध्यक्ष प्रधान सचिव, ऊर्जा हे योजनेचे नियंत्रण करणार आहेत.
१४ हजार हेक्टर क्षेत्र येणार सिंचनाखाली
या योजनेअंतर्गत १४ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल. योजनेमुळे कृषिपंप ग्राहकांना शासनातर्फे देण्यात येणाऱ्या अनुदानामध्ये ६३ कोटींची बचत होईल. क्रॉस सबसिडीही १६८ कोटींनी कमी होईल. वीजदर कमी होतील. पारंपरिक व अपारंपरिक पद्धतीने करण्यात येणाऱ्या वीजनिर्मितीतही बचत होणार आहे. याशिवाय राज्य शासनाद्वारे राज्यात एक लाख सौर कृषिपंप बसवण्यासाठी नवीन योजना तयार करण्यासही मंत्रिमंडळाने या वेळी मान्यता दिली आहे, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
असे असेल पंपांचे वितरण आणि किंमत
३ अश्वशक्ती - २ लाख ४० हजार रुपये किंमत
५ अश्वशक्ती - ३ लाख २५ हजार रुपये किंमत
३ अश्वशक्ती - १७५० पंप बसविणार
५ अश्वशक्ती - ५२५० पंप बसविणार
सौर ऊर्जा क्षेत्रातील शासकीय व इतर संस्था
आपण ह्य़ा अक्षय मिळणाऱ्या सौर ऊर्जेसंबंधी विचार करणार असल्याने सौर ऊर्जा क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांची व सौर ऊर्जा उपकरणे तयार करणाऱ्या निर्मात्यांची
माहिती मिळवणार आहोत, ती पुढीलप्रमाणे आहे. भारतामध्ये इंदोर, चंडीगड, मदुराई, वल्लभ विद्यानगर, कलकत्ता व पुणे येथे क्षेत्रीय परीक्षण केंद्रे कार्यरत आहेत.
या केंद्रांमध्ये विविध अपारंपरिक ऊर्जास्रोत उपकरणांच्या शास्त्रशुद्ध चाचण्या घेऊन उपकरणांच्या कार्यक्षमतेचे प्रमाणपत्र दिले जाते. पुण्यातील क्षेत्रीय केंद्राचा पत्ता पुढीलप्रमाणे. स्कूल ऑफ एनर्जी स्टडिज, भौतिकी विभाग, पुणे विश्वविद्यालय, पुणे ४११ ००७, दूरध्वनी क्रमांक (०२०) ५६५६०६१, ५६५५२०१, ई-मेल : mgt@physics.unipune.emet.in पुणे विद्यापीठात विविध अपारंपरिक ऊर्जास्रोतांविषयी संशोधन केले जाते. जिज्ञासूंनी वरील विभागाशी संपर्क साधल्यास अद्ययावत माहिती व तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळू शकेल. भारत सरकारने केंद्रात दिल्ली येथे एक स्वतंत्र अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाची स्थापना केली आहे. त्याला टठफए म्हणतात. म्हणजेच Ministry of New and renewable Energy MNRE (Ministry of New & Renewable Energy)
नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय, ब्लॉक नं. १४, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोदी रोड, नवी दिल्ली- ११० ००३, फोन ९१११२४३६३०३५, २४३६०७०७, वेब : www.mnre.gov.in
येथून एक अक्षयउर्जा नावाचे मासिकही निघते. त्यात देखील ही ऊर्जा वापरण्यासाठी मिळणाऱ्या सवलती, फायदे व अनुदानांबद्दलची माहिती असते. ह्य़ा सवलती मिळविण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे केंद्राला त्याची शिफारस लागते. ‘नाबाड’ देखील ह्य़ासाठी कर्ज देते. ‘नाबार्ड’ ही संस्था बँकांना कर्ज देते व बँक आपणास कर्ज देते. नाबाड हे कर्ज शेतकऱ्यांना,काही मर्यादित अपारंपरिक ऊर्जा योजनांसाठीच देते.
Monday, November 5, 2018
सेल्फी विथ रांगोळी स्पर्धा !
Thursday, February 15, 2018
सोलर इलेक्ट्रिक सिस्टिम कशी काम करते ?
सोलर सिस्टिम मध्ये Photo Voltaic सेल वापरले जातात. PV सेल हे सेमीकंडक्टर मटेरियल पासून बनवले जातात. या सेल वर प्रकाश पडला असता यामधून इलेक्ट्रॉन चे वहन चालू होते. म्हणजेच वीज निर्मितीला सुरुवात होते. ही वीज DC म्हणजेच डायरेक्ट करंट स्वरूपातील असते, जी बॅटरी मध्ये साठवली जाऊ शकते. ही वीज घरातील उपकरणांसाठी वापरण्यासाठी इन्व्हर्टर चा वापर करून AC म्हणजेच alternating current मध्ये रूपांतरित केली जाते.
ज्या ठिकाणी विजेची उपलब्धता नसेल, परंतु घरगुती उपकरणे, TV , मिक्सर , फ्रिज, इ. वापरायची आहेत तेथे ही सिस्टिम वापरली जाते. या सिस्टिम मध्ये सोलर पॅनल, चार्ज कंट्रोलर, इन्व्हर्टर, बॅटरी वापरली जाते. किती क्षमतेचा पॅनल, इन्व्हर्टर, बॅटरी वापरायची हे उपकरणांच्या energy consumption , तसेच रोज कोणते उपकरण किती तास वापरायचे आहे यावर अवलंबून आहे. या सिस्टिम मध्ये दिवसभर बॅटरी सोलर द्वारे चार्जे करून रात्री वीज वापरू शकतो. या सिस्टिम ला बॅटरी मेन्टेनन्स करण्याची तसेच ३ ते ५ वर्षानंतर बॅटरी बदलण्याची गरज असते.
ही सिस्टिम सोलर off grid सिस्टिम सारखीच असते परंतु यामध्ये सोलर वर तसेच MSEB सप्लाय वर चार्जिंग ची सुविधा असते. या सिस्टिम मध्ये सोलर इन्व्हर्टर वापरला जातो. या सिस्टिम जिथे लोड शेडींग आहे तेथे वीज बिल काही प्रमाणात कमी करण्याच्या दृष्टीने वापरल्या जातात. या सिस्टिम ला बॅटरी मेन्टेनन्स करण्याची तसेच ३ ते ५ वर्षानंतर बॅटरी बदलण्याची गरज असते.
या सोलर सिस्टिम मध्ये सोलर पॅनल आणि सोलर स्ट्रिंग इन्व्हर्टर वापरला जातो. या सिस्टिम मध्ये दिवसभर तयार झालेल्या सोलर ऊर्जेचे रूपांतर अल्टर्नेट करंट मध्ये केले जाते आणि ही वीज MSEB कडे नेट मीटर द्वारे निर्यात केली जाते. रात्रीच्या वेळी ही वीज आयात केली जाते. हे सिस्टिम वीज बिल कमी करण्यासाठी वापरली जाते. ही सिस्टिम वापरण्यासाठी दिवसभर लाईट असणे गरजेचे आहे. जर लाईट नसेल तर ही सिस्टिम वीज निर्यात करू शकत नाही तसेच बॅटरी नसल्यामुळे साठवता तसेच वापरताही येत नाही. या सिस्टिम मध्ये बॅटरी नसल्यामुळे मेंटेनन्स खूप कमी असतो. शहरांमध्ये तसेच जेथे लोड शेडींग नाही अशा ठिकाणी ही सिस्टिम वापराने फायदेशीर ठरू शकते. यासाठी MSEB किंवा स्थानिक वीज वितरण कंपनीची परवानगी घ्यावी.
किंमत रू 90,000/-
किंमत रू 1,80,000/-
किंमत रू 2,70,000/-
व्यावसायिकांची वार्षिक बचत: ७५,०००/-
करामध्ये सवलत: १ लाख पर्यंत
किंमत रू 4,00,000/-
वीज वापर 1200 ते 1250 युनिट प्रति महिना
व्यावसायिकांची वार्षिक बचत: १,५०,०००/-
करामध्ये सवलत: २ लाख पर्यंत
किंमत रू 8,00,000/-
दिवसभर चौकशीसाठी फोन चालु असतो त्यामुळे फक्त whats app संदेश करू शकता.
whats app ९८६०००००४५
Sunday, June 12, 2016
वीज निर्माते व्हा, पैसेही कमवा!
वीज निर्माते व्हा, पैसेही कमवा!
मोठ्या उद्योगांप्रमाणेच घराच्या छतावर ऊर्जानिर्मिती प्रकल्प साकारण्याची योजना महावितरणने आणली आहे. केवळ 75 हजार ते 1 लाख रुपये गुंतवून पैसे www.surbhisystems.in कमावण्याची संधी या उपक्रमाद्वारे सर्वसामान्यांना उपलब्ध झाली आहे. या योजनेतील कायदेशीर अडसरही राज्य शासनाने जाहीर केलेल्या अधिसूचनेमुळे दूर झाला आहे.
सौरऊर्जा निर्मितीची परवानगी आतापर्यंत केवळ उद्योगांनाच होती. आता, मात्र निवासी, वाणिज्य, औद्योगिक वसाहती आणि हाउसिंग सोसायट्यांना छतावर वीजनिर्मिती करता येईल. वापरानंतर वाचलेली वीज महावितरणला विकताही येणार आहे. त्यासाठी आवश्यक संयंत्रे सहज उपलब्ध आहेत. या संयंत्रांपासून दररोज एक ते आठ किलोवॉट वीजनिर्मिती करता येते. सिंगल फेस ग्राहक आठ किलोवॉट, थ्री फेस ग्राहक 150 किलोवॉट वीज निर्माण करू शकतो. www.surbhisystems.in महानगरपालिका हद्दीतील ग्राहक 150 किलोवॉट ते 1 मेगावॅट वीज निर्माण करू शकतो. महापालिका हद्दीबाहेरील ग्राहक 80 किलोवॉट ते 1 मेगावॅट वीजनिर्मिती करू शकतो. दिवसा निर्माण होणारी वीज गरजेपेक्षा निश्चितच अधिक राहील. न वापरलेली वीज नेटमीटरिंगद्वारे महावितरणला विकता येईल.
या योजनेसाठी महावितरणकडे अर्ज करणे आवश्यक आहे. महावितरणने ग्राहकांच्या सुविधेसाठी ऑनलाइन अर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. www.surbhisystems.in लिफ्ट, पाण्याची मोटार व लाइटसाठी ही वीज वापरता येईल. सध्या विजेचा दर सरासरी सात रुपये युनिट असा आहे. या हिशेबाने सोसायटीचे एका युनिटमागे तासाला सात रुपये वाचतील. अधिक माहिती महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
