Saturday, September 11, 2021

संगणकाचे ज्ञान असणे ही काळाची गरज बनली आहे!

संगणकाचे ज्ञान असणे ही काळाची गरज बनली आहे! 
२१ वे शतक हे तंत्रज्ञानाचे शतक मानले गेले आहे! संगणक ही तंत्रज्ञानाचा एक अविष्कार आहे!आज प्रत्येक क्षेत्रात संगणकाचा मुक्त वापर होतांना दिसतो! संगणकाच्या वापरामुळे अनेक अवघड आणि वेळखाऊ कामे सुलभ झाली आहेत! आपल्या दैनदिन व्यवहारात,रिजवेशन, हॉस्पिटल, शाळा, बँका, हॉटेल्स, व्यापारी प्रतिष्ठाने, कारखाने, सेवा क्षेत्र, कृषी क्षेत्र, रुग्णालये, सरकारी-खाजगी कार्यालये सगळीकडे संगणकाचा वापर केला जातो. बऱ्याचदा आपल्याला हवी असलेली माहिती व कागदपत्रे संबधित कार्यालयात व्यक्तीशः न जाता इंटरनेटच्या माध्यमातून संगणकावर सहज उपलब्ध होतात. परीक्षेचे व नोकरीचे अर्ज भरण्यापासून त्याच्या निकालापर्यंत सर्व गोष्टी इंटरनेटवर उपलब्ध होत असतात. याकरिता संगणकाचे शिक्षण घेणे अतिशय महत्वाचे आहे. पूर्वी ज्याला अक्षर कळत नसे त्यालाच निरक्षर म्हटले जाई, आता मात्र ज्याला संगणक वापरता येत नाही त्यालाही निरक्षरच मानले जाते, इतका संगणकाचा प्रभाव वाढला आहे. संगणकाचे शिक्षण घेऊन त्याचा व्यवसाय वा नोकरी म्हणून निवड केलेले कित्येक लोक कमालीचे यशस्वी झालेले आढळतात. अनेकांनी देश-विदेशात ‘तगड्या’ पगाराच्या नोकऱ्यादेखील मिळविल्या आहेत. म्हणूनच संगणकाचे ज्ञान असणे ही काळाची गरज बनली आहे 

अधिक माहितीसाठी MS-CIT सेंटरशी संपर्क करा किंवा भेट द्या:https://skcomputers-theinstitute.business.site 
Please Click our Services https://wa.me/c/919860000045 * 

*एस. के. कॉम्प्युटर्स*  
(महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे (MKCL) अधिकृत संगणक प्रशिक्षण केंद्र)* 
 *“पित्रुपुण्य़ाय” १८/२०, उषःक़ाल हौसिंग सोसा. (पोस्टल कॉलनी), 
महंमदवाडी पोलीस चौकीसमोर, तरवडेवस्ती, महंमदवाडी, पुणे – ४११०६०.* 
 9860000045* * : 9860000045* * : 
https://skcomputers-theinstitute.business.site* 
https://maps.app.goo.gl/4ok8jx7n9GAmR66XA* 
https://bit.ly/SKCOMPUTERS* 
sk47210145@gmail.com 
https://bit.ly/3sH7HOk 

 #MSCIT, #SKCOMPUTERS, #hadapsar, #Mohammadwadi, #computertraining,..

Friday, May 1, 2020

घरी राहा सुरक्षित राहा मराठी कोरोन स्लोगन्स

मराठी स्लोगन्स | Marathi Slogans
  • घरी राहा सुरक्षित राहा.
  • स्नेहभाव जोडू, कोरोनाची साखळी तोडू.
  • हस्तांदोनाला दूर सारा, हाथ जोडून नमस्कार करा.
  • बाहेरून आल्यावर हाथ स्वच्छ धुवूया, कोरोना ला दूर पळवूया.
  • मास्क पासून होईल सुरक्षा, बरे आहे ते कोरोना पेक्षा.
  • मैत्री करावी हॅन्डवॉश शी, भीती नसेल कोरोनाची.
  • फक्त एकच नियम पाळा, सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळा.
  • आपली काळजी आपण स्वतः घेऊया, कोरोना ला हरवूया.
  • वेळेवर डॉक्टर जवळ जाऊ, आरोग्याची चाचणी करून घेऊ.
  • स्वतः घरी राहा आणि इतरांनाही सुरक्षित ठेवा.
  • घरी रहा, सुरक्षित रहा | जान है तो जहान है|
  • घरी रहा सुरक्षित रहा आणि कोरोना संसर्ग टाळा .
  • हाथ स्वच्छ धुवून घेऊ, कोरोना आपल्यापासून दूर ठेऊ.
  • आपले हात साबणाने आणि पाण्याने कमीतकमी १५-२० सेकंद धुवा.
  • आपले डोळे, नाक आणि तोंड यांना न धुतलेल्या हातांनी स्पर्श करणे टाळा.
  • आपल्या चेहऱ्याला स्पर्श करणे टाळा. विषाणू आपल्या तोंडातून, नाकातून आणि डोळ्यांद्वारे आपल्या शरीरात शिरतो.
  • लढ्यामध्ये महत्वाचे काम बाजवणारे डॉक्टर, नर्स हॉस्पिटल मधील संपूर्ण कामगार सर्वांना मानाचा सलाम!
  • आपले महाराष्ट्र पोलीस हवालदार आणि सर्व महानगरपालिकेमधील सर्व कर्मचारी वर्ग सर्वांना मानाचा सलाम!
  • सर्वांवर माझी नजर घरात बसा बेफिकार.
  • आजी बाबा घरात बसा
  • आजारी असताना प्रवास करू नका.
  • खोकला किंवा शिंकताना त्यांनी आपले तोंड व नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाकावे. आपली शिंक किंवा खोकला हातावर पडू देऊ नये.
  • पापा घर में रहो, बाहर कोरोना है, सब मिल साथ रहेंगे, किसी को नहीं खोना है
  • फिर मुस्कुराएगा इंडिया... फिर जीत जाएगा इंडिया.
  • गो कोरोना, कोरोना गो
  • पीएमओ का संदेश ।लॉकडॉउन का पालन करें पूरा देश ।।
  • कोरोना से हो बचना ।       आप घर में ही रहना ।।
  • PMO कर रहे दिन रात मेहनत।आप लॉकडॉउन को मन से अपनाना ।।
  • कोरोना को हराना ।आप घर से बाहर मत निकालना।।
  • कोरोना से बचना अति आसान।लॉकडॉउन का पालन अति आसान।।
  • सदा मास्क पहानिये । कोरोना से बचिए  ।
  • राष्ट्र से करते हों प्रेम ।लॉकडॉउन को अपनाए सप्रेम ।।
  • सौ बात की एक बात । अभी कोरोंना के बचाव की करिए बात ।।
  • कोरोना से हो बचना।प्लीज आप घर में ही रहना ।।
  • कोरोना को हो हराना ।आप घर से बाहर मत निकालना ।।
  • हिन्दू मुस्लिम सिख ईसाई।लॉकडाउन में सब सहयोग देना भाई ।
  • ना डॉरें ना घबराए ।लॉकडॉउन में हेल्प करे ।।
  • ना जात ना पात ।लॉकडॉउन में बनो सब एक जात ।।



महाराष्ट्र दिनानिमित्त MKCL चा अभिनव उपक्रम ‘आय.टी.त मराठी, ऐटीत मराठी’ अॅप.

मराठी माणसाने नक्कीच वापरून पहावे असे आय. टी. त मराठी हे अँप मी वापरत आहे. मराठीतून कंम्प्यूटर व स्मार्टफोन वापरायला शिकण्यासाठी खालील लिंकवर जाऊन हे अँप डाऊनलोड करा: https://play.google.com/store/apps/details?id=org.mkcl.solar.itmarathi&hl


महाराष्ट्र दिनानिमित्त MKCL चा अभिनव उपक्रम आय.टी.त मराठीऐटीत मराठी’ अॅप.

१ मे २०२० म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या हीरक महोत्सवी वर्षाची सुरुवात. गेल्या ६० वर्षांत आपले राज्य आणि आपली मराठी भाषा दोन्हीची परिस्थिती बदलली आहे. आज मोबाईलइंटरनेट आणि कंप्यूटर म्हणजेच माहिती तंत्रज्ञानाशिवाय दैनंदिन कामे जवळ जवळ अशक्य आहेतहे आपण अनुभवतो आहोत. अनेक प्रकारच्या डिजिटल उपकरणांवर मराठी भाषा वापरण्याचे प्रमाणही वाढत आहे.

सध्याच्या परिस्थितीत घरी राहून आय.टी. तंत्रज्ञानाचा वापर हा महत्त्वाचाच ठरत आहेहे नक्की.. तरी केवळ भाषेची अडसर या कारणामुळे कोणी यात मागे पडू नये. संगणकावर व स्मार्टफोनवर मराठी भाषेचा वापर व्हावा यासाठी आय.टी.त मराठी’ या अॅपची खूप मदत होऊ शकते

आय.टी.त मराठी या अॅपमधील ठळक उपक्रम:
ü  गुगलचा वापर करून माहिती शोधणे व मराठी टायपिंग करायला शिकणे.
ü  टंकलेखनापेक्षा मोबाईलवर मराठीत बोलून संदेश लिहिणे - Voice Typing
ü  मराठीतून इतर कोणत्याही भाषेत व अन्य कोणत्याही भाषेतून मराठीत भाषांतर करणे  Translate
ü  मराठीतून ई-लर्निंगसाठी वेगवेगळ्या अॅप आणि वेब साईटचा वापर.
ü  मराठीतून दैनंदिन जीवन आणि व्यवस्थापन यासाठी वेगवेगळ्या अॅप आणि वेब साईटचा वापर.
ü  मराठी वर्तमानपत्र ऑनलाईन वाचणेसोशल मीडियावर मराठी वापरणेमराठी भाषकांसाठी विविध उपयुक्त अॅप्स, मराठी ऑडियो बुक्समराठी कवितासंग्रह, मराठी शब्दकोशइ.

विविध आयटी सुविधा, टूल्स व अॅप्स आप मराठी भाषेतून वापरली तरच जागतिकीकरणाच्या काळात मराठी भाषा जगात ऐटीत राहू केल, म्हणून जर आयटी त मराठी (तरच) ऐटीत मराठी’!

www.mkcl.org/itmarathi या लिंकवरून तुम्ही हे अॅप डाऊनलोड करू शकता किंवा आय.टी.त मराठी असे टाईप करून हे अॅप गुगल प्ले-स्टोअररून विनामूल्य डाऊनलोड करू शकता. तसेच www.mkcl.org/marathi या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला याचा लाभ ऑनलाईनही घेता येईल.



महाराष्ट्रदिनानिमित्त सर्वांनी वरील उपक्रमाचा जरूर लाभ घ्यावाही विनंती.

Sunday, April 12, 2020

महावितरण अँपद्वारे मीटर रीडिंग कशी सबमीट करायची याबाबत माहिती

नमस्कार मित्रांनो लॉकडाऊनच्या धर्तीवर महावितरण कंपनीचा SMS आपणास प्राप्त झाला असेल कि संचारबंदीच्या काळात एप्रिल महिन्याचे वीज मीटर रीडिंग होणार नसल्याचे सूचित केले आहे. परंतु महावितरण वेब पोर्टल किंवा महावितरण कंपनीने विकसित केलेल्या अँप च्या माध्यमातून आपण मीटर रीडिंग जमा करू शकता जर आपणास न जमल्यास महावितरण आपणाला सरासरी वीज देयक पाठवून देईल. अधिक माहितीसाठी खाली दिलेली व्हिडीओ लिंक पहा.

https://youtu.be/Rbm-f4ns8zA

सदर व्हिडिओ मध्ये महावितरण अँपद्वारे मीटर रीडिंग कशी सबमीट करायची याबाबत माहिती देण्यात आली आहे. सुरळीत रीडिंग सबमिट करण्यासाठी महावितरण अँपमध्ये रजिस्टर असणे आवश्यक आहे. तसेच आपण गेस्ट लॉगिन द्वारे सुद्धा मीटर रीडिंग सबमिट करू शकता.


सौरभ कुंभार

Tuesday, April 7, 2020

मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत शासन निर्णय

मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत शासन निर्णय



क्लिक : मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना https://youtu.be/-Gsc54Q8b5I क्लिक : अर्ज करा कसा करावा https://youtu.be/c6thItBrvcQ

पारेषण विरहीत सौर कृषीपंप नविन वीज जोडणी करिता अर्जाची प्रक्रिया.

पारेषण विरहीत सौर कृषीपंप नविन वीज जोडणी करिता अर्जाची प्रक्रिया.

  1. महावितरणाच्या वेब पोर्टलवर (https://www.mahadiscom.in/solar) ऑनलाइन अर्ज करावा.
    • सध्याच्या कृषीपंपाकरिता नवीन वीज जोडणीसाठी पैशाचा भरणा करुन प्रलंबित असलेल्या अर्जदाराने फक्त काही अनिवार्य फील्ड, उदा. अर्ज क्रमांक, पैसे भरल्याची पावती क्रमांक, मंजुरी क्रमांक आणि क्षमतेची मागणी इ. तपशील देणे अनिवार्य आहे.
    • नवीन अर्जदार (परंपरागत कृषीपंप नवीन वीज जोडणीसाठी पैशाचा भरणा केलेला नाही) सर्व फील्ड अनिवार्य आहेत म्हणून तपशील भरणे आवश्यक आहे.
  2. ए - 1 फॉर्मवर संपूर्ण माहिती भरावीे सोबत (कागदपत्रांची प्रत अपलोड करावी)
    • 7/12 उतारा प्रत
    • आधार कार्ड
    • कास्ट प्रमाणपत्र (एससी / एसटी लाभार्थींसाठी)
  3. अर्जदाराने ए - 1 फॉर्मवर व घोषणापत्रावर सही करणे आवश्यक आहे.
  4. ऑनलाइन ए - 1 फॉर्म प्राप्त झाल्यापासून 10 दिवसांच्या आत, सर्वेक्षण केल्यानंतर फील्ड ऑफिसमधून डिमांड नोट जारी केले जाईल. जर काही विसंगती आढळली तर त्यानुसार अर्जदाराला कळविण्यात येईल.
  5. डिमांड नोट देय झाल्यानंतर लाभार्थी एजन्सीचे नाव सादर करेल / देईल (केवळ 25000 निविदासाठी लागू आहे).
  6. प्रत्येक टप्प्यावर अर्जदारांना एसएमएसद्वारे कळविण्यात येईल.

क्लिक : मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना https://youtu.be/-Gsc54Q8b5I

 क्लिक : अर्ज करा कसा करावा https://youtu.be/c6thItBrvcQ

मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत लाभार्थी निवडीसाठी पात्रता निकष

 मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत लाभार्थी पात्रता निकष
1. या योजनेत खालीलप्रमाणे नविन तसेच प्रलंबित अर्जदार पात्र राहतील.
o    पैसे भरुन प्रलंबित असलेले अर्जदार (मार्च 2018 पूर्वी ज्यांना एचव्हीडीएस योजनेमध्ये 2.5 लाखांहून अधिक रकमेच्या पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे.)
o    31.03.2018 नंतर सर्व पैसे भरुन प्रलंबित असलेले अर्जदार.
o    01.01.2019 पासून कृषी पंपासाठी सर्व नवीन अर्जदार.
o    2.5 लाखापेक्षा कमी रकमेच्या पायाभूत सुविधा लागणाऱ्या एचव्हीडीएस मधील पैसे भरुन प्रलंबित असलेला व या योजनेमध्ये सहभाग घेण्यास इच्छुक असलेला अर्जदार.
2.    लाभार्थी निवडीसाठी पात्रता निकष
o    सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या शेतकऱ्याकडे शाश्वत जलस्त्रोत उपलब्ध आहे असे सर्व शेतकरी. मात्र अशा शेतकऱ्याकडे पारंपारिक पध्दतीने विद्युत जोडणी झालेली नसावी.
o    5 एकरापर्यंत शेतजमीनधारक शेतकऱ्यास 3 अश्वशक्ती क्षमतेपर्यंत सौर कृषीपंप व 5 एकरापर्यंत जास्त शेतजमीन धारकास शेतकऱ्यास 5 अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषीपंप देय आहे.
o    राज्यातील पारंपारिक ऊर्जेद्वारे विद्युतीकरण न झालेले शेतकरी
o    विद्युतीकरणासाठी वन विभागाची ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसलेले शेतकरी महावितरण कंपनीकडे विद्युत जोडणीसाठी पैसै भरुन ही प्रलंबित असणाऱ्या ग्राहकांपैकी / शेतकऱ्यांपैकी ज्यांना नजीकच्या काळात विद्युत जोडणी मिळणे शक्य नाही असे शेतकरी.
o    अतिदुर्गम भागातील शेतकरी.
o    महाराष्ट्र शासनाच्या सिंचन योजनेअंतर्गत लाभ घेतलेले शेतकरी.
o    वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे, नदी / विहिर / बोअरवेल यांचे शेजारील शेतजमीनधारक शेतकरी या योजनेत पात्र राहतील.
o    सदर योजनेअंतर्गत सौर कृषीपंपासाठी सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्यांकडून 10 टक्के व अनुसूचित जातीच्या / अनुसूचित ़जमातीच्या लाभार्थ्यांकरिता 5 टक्के लाभार्थी हिस्सा म्हणून लाभार्थ्यास भरणे आवश्यक आहे.
o    अटल सोलर योजनेमध्ये अर्जदाराने आधी लाभ घेतलेला नसावा.

क्लिक : मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना https://youtu.be/-Gsc54Q8b5I क्लिक : अर्ज करा कसा करावा https://youtu.be/c6thItBrvcQ

तर्गत माहिती