Wednesday, November 25, 2015

सौर उर्जेचा वापर करणेबाबत प्रचार व प्रसार मोहीम.

मी सौरभ कुंभार गेल्या सहा वर्षापासून मी सौर ऊर्जा क्षेत्रात काम करीत आहे, अपुरया विजेच्या संकटापासून वाचवण्यासाठी जगभर चालू असलेल्या चळवळीतपर्यावरणास पूरक अशा साधनसंपत्तीचा जास्तीत वापर करून, मी माझा खारीचा वाटा म्हणून हातभार लागावा, विजेची बचत व काही प्रमानात निर्मिती व्हावी, केवळ या उद्देशानेच, मी अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत म्हणून ओळख असलेल्या सौर ऊर्जाचा वापर शासकीय कार्यालयात करावा यासाठी मी, सौरभ लक्ष्मण कुंभार आणि माझा मित्र श्री. संतोष खोमणे महाराष्ट्रातील सर्व जिल्हा मुख्यालयास दुचाकीवरून (सर्व सुरक्षेच्या बाबी विचार करुन) भेट देऊन शासकीय कार्यालयात व त्यांच्या संलग्न संस्थेत सौर उर्जेचा वापर करणेबाबत प्रचार व प्रसार करण्याचे नियोजन दि. १ डिसेंबर २०१५  ते ३१ डिसेंबर २०१५ या कालावधीत केले आहे, या प्रवासात मी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद, मुख्य कार्यकारी अधिकारी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या अख्यातरीत असलेल्या शासकीय कार्यालयात सौर उर्जेचा ((विशेषतः छतावरील सौर ऊर्जा - नेट मीटरींग वापर करणेबाबत निवेदन सादर करणार आहे.

नियोजन : साधारणतः ५५०० किलोमीटर दुचाकीवरून प्रवास, ३४ जिल्हा मुख्यालयास भेटी, ५००० लोकांशी प्रत्यक्ष भेटी, ५०००० लोकांशी अप्रत्यक्ष भेटी आणि जिल्हा स्तरावर असलेले सहकार्यांशी भेट घेऊन प्रत्येक जिल्हा स्तरावर सौर ऊर्जेचा वापर करणेबाबत जनजागृती करण्याचा उद्दिष्ट समोर ठेऊन प्रवासाचे नियोजन केले आहे. तसेच स्थानिक वर्तमानपत्रात देखील ज्या उद्दिष्टाने मी प्रवास आखला आहे, ते उद्दिष्ठ आणि प्रवास याबद्दलची बातमी प्रसिद्ध करण्यात येईल. जिल्हा स्तरावरील माझ्या सहकाऱ्यांनां सक्रीय करुन त्यांची मदद मी स्थानिक स्तरावर घेण्याचा मानस आहे, तसेच facebook, whats app, Blog सारख्या सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून सदर संकल्पनेची व सौर ऊर्जा वापरासंदर्भात प्रसिद्धी करणार आहे. कृपया www.saurabhkumbhar.blogspot.in वर काही माहिती मी संग्रहित करुन एकत्रित करण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रत्येक जिल्हा स्तरावर सौर ऊर्जेचा वापर करणेबाबत जनजागृती करण्याचा उद्दिष्ट समोर ठेऊन प्रवासाचे नियोजन
क्र.
तारीख
वार
वेळ
जिल्हा मुख्यालय
1 डिसेंबर 2015
मंगळवार
10:00
सातारा
1 डिसेंबर 2015
मंगळवार
15:00
सांगली
2 डिसेंबर 2015
बुधवार
10:00
कोल्हापूर
2 डिसेंबर 2015
बुधवार
16:00
सिंधुदुर्ग
3 डिसेंबर 2015
गुरुवार
12:00
रत्नागिरी
4 डिसेंबर 2015
शुक्रवार
10:00
अलिबाग
4 डिसेंबर 2015
शुक्रवार
15:00
ठाणे
5 डिसेंबर 2015
शनिवार
10:00
पालघर
5 डिसेंबर 2015
शनिवार
16:00
नाशिक
१०
7 डिसेंबर 2015
सोमवार
12:00
धुळे
११
7 डिसेंबर 2015
सोमवार
15:00
नंदुरबार
१२
8 डिसेंबर 2015
मंगळवार
10:00
जळगाव
१३
9 डिसेंबर 2015
बुधवार
10:00
बुलढाणा
१४
9 डिसेंबर 2015
बुधवार
16:00
अकोला
१५
10 डिसेंबर 2015
गुरुवार
10:00
अमरावती
१६
10 डिसेंबर 2015
गुरुवार
16:00
वर्धा
१७
11 डिसेंबर 2015
शुक्रवार
10:00
नागपूर
१८
11 डिसेंबर 2015
शुक्रवार
15:00
भंडारा
१९
14 डिसेंबर 2015
सोमवार
10:00
गोंदिया
२०
14 डिसेंबर 2015
सोमवार
17:00
गडचिरोली
२१
15 डिसेंबर 2015
मंगळवार
16:00
चंद्रपूर
२२
16 डिसेंबर 2015
बुधवार
12:00
यवतमाळ
२३
16 डिसेंबर 2015
बुधवार
16:00
वाशीम
२४
17 डिसेंबर 2015
गुरुवार
10:00
हिंगोली
२५
18 डिसेंबर 2015
शुक्रवार
16:00
नांदेड
२६
19 डिसेंबर 2015
शनिवार
10:00
लातूर
२७
19 डिसेंबर 2015
शनिवार
16:00
उस्मानाबाद
२८
21 डिसेंबर 2015
सोमवार
13:00
सोलापूर
२९
22 डिसेंबर 2015
मंगळवार
10:00
बीड
३०
22 डिसेंबर 2015
मंगळवार
16:00
परभणी
३१
23 डिसेंबर 2015
बुधवार
11:00
जालना
३२
28 डिसेंबर 2015
सोमवार
10:00
औरंगाबाद
३३
28 डिसेंबर 2015
सोमवार
17:00
अहमदनगर
३४
30 डिसेंबर 2015
बुधवार
10:00
पुणे


Monday, November 23, 2015

एल.इ.डी बल्बचा वापर करुन विज बचत





वीज प्रत्येकाची गरज असल्याने बचत हीच एकप्रकारे विजेची निर्मिती आहे. मी माझ्या घरामध्ये १८ वॅटचे सी. एफ. एल. बदलून १० वॅटचे एल. इ. डी. बल्ब लावले आहेत. आज महावितरण कंपनीनी १०० रुपयात एल. इ. डी. बल्ब उपलब्ध करुन दिला आहे. त्याचे वितरण काही ठिकाणी चालू आहे. ऑनलाइन शॉप्सवरही स्वस्त दरात  एल. इ. डी. बल्बची विक्री होत आहे, परंतु गुणवत्ता पारखून खरेदी करणे उचित राहील.
माझ्या घरात २० एल. इ. डी. बल्बचा वापर करीत आहे. पूर्वी त्याच ठिकाणी १८ आणि २३ वॅटचे सी. एफ. एल. बल्ब लावलेले होते.साधारणत सायंकाळी ५ तास दिव्यांचा वापर केला जातो. त्यानुषंगाने
२० सी.एफ.एल. बल्ब  x १८ वॅट x   तास = १८०० वॅटचा वापर दर दिवशी होत होता परंतु

आज  २० एल.इ.डी बल्ब  x १० वॅट x   तास = १००० वॅटचा वापर होत आहे त्यामध्ये तांत्रिक दृष्ट्या पाहिलं तर ८०० वॅट प्रतिदिन मी विजेची बचत करीत आहे. महिन्याला ३० दिवस ८००वॅट =२४०००वॅट ची बचत होत आहे. म्हणजे २४ युनिट ची बचत होत आहे. 

    

Thursday, November 5, 2015

सौर उर्जा महत्व आणि देखभाल दुरुस्तीचे प्रशिक्षण देताना मी.



सौर उर्जा महत्व आणि देखभाल दुरुस्तीचे प्रशिक्षण देताना मी.

साधारणतः सौर प्रकाशीय उपकरणे देखभाल व दुरुस्ती करताना लागणारी उपकरणे





Monday, November 2, 2015

सौर वीज यंत्रणा (Small Solar Power Pack)

सौर वीज यंत्रणा

मी माझ्या घराच्या छतावर दोन १२० वॅट्ची सौर पँनेल्स आणि १२ वोल्ट १०० अम्पीअरची बटरी बसविली आहे व संपूर्ण यंत्रणा १२वोल्ट डीसी वर चालू आहे. त्यापासून सौर उर्जेवर आधारित घरगुती वीज निर्मिती सुरू केली असून त्यावर जिन्यातील व पार्किग मध्ये असे दोन १२ वॅटची एल.ई.डी बल्ब, चार बालकनीत १२ वॅटचे एल.ई.डी. चार दिवे  व महावितरण वीज गेल्यावर दिवाणखान्यात व स्वयंपाक घरात पर्यायी दोन १२ वॅटचे दिवे पुर्णपणे सौर उर्जेमार्फत निर्मित विजेवर चालतात. साधारणपणे सायंकाळी ६.३० ते रात्री ११ .३०  पर्यन्त असे एकूण ५ तास ही सौर ऊर्जा पुरते. उभारणीसाठी मला एकूण ३०,०००/- रुपये खर्च आला होता व जोडणीचे काम मी स्वतः या क्षेत्रात असल्याने मीच सर्व जोडणी दोन दिवसात केली यामुळे निश्चितच महिन्याला १०० ते १५० रुपयाचा वीज बचतीतून फायदा होत आहे.



सौर वीज यंत्रणेवरील गुंतवणुकीचा विचार करता साधारणतः गुंतवणुकीवरील परतावा कालावधी खुप जास्त आहे. आज सौर पँनेल्सच्या किमती खुपच बऱ्याच सामान्य माणसाच्या आवाक्यात आलेल्या आहेत, परंतु जशी मागणी वाढेल तश्या किमतीही कामी होतील. सहा वर्षापूर्वी सौर पँनेल्स रु. ९०-१०० रुपये प्रति वॅट मिळत होता आज ४०-४५ रुपये प्रति वॅट बाजारपेठेत उपलब्ध आहेत. 


भविष्यात नेट मीटरींगच्या माध्यमातून माझ्या घरावर कमीत कामी ३ किलो वॅटचे सौर ऊर्जा पँनेल्स बसवून माझे घर वीजे बाबत स्वयंपूर्ण करण्याचा मानस आहे.

सौरभ कुंभार 
९८६०००००४५ 

सौरचूल किंवा सौरकूकर (solar cooker )

सौरचूल किंवा सौरकूकर

एल. पी. जी. गॅस सारख्या राष्ट्रीय साधन संपत्तीची बचत व्हावी, आपल्या खिश्यालाही जास्त झळ न बसावी व पर्यावरणास पूरक अशा अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांच्या वापरास हातभार लागावा म्हणून नोव्हेंबर २०१२ पासून माझ्या आम्ही घरी रोजचे अन्न (जेवण) शिजवण्यासाठी सौर कुकरचा वापर करत आहे. ह्या कुकरमध्ये रवा व शेंगदाणे उत्तम भाजले जातात व वरण-भात,सर्व प्रकारच्या भाज्या, बटाटे उत्तम शिजते. (खर्च ३,०००/-)
गेल्या ३ वर्षात एकदाही खर्च आला नाही. बाकी मेंटेनन्स शून्य, फक्त रोजच्या रोज एकदा काच स्वच्छ करावी लागते.

सोलर कुकर वापराच्या मर्यादा व अडचणी :
१. सोलर वॉटर हिटर प्रमाणेच या कुकरलाही मुबलक स्वच्छ सूर्य प्रकाश असणे गरजेचे आहे. म्हणजेच पावसाळ्यात जेंव्हा आकाश अभ्राच्छादित (ढगाळ) असते व जेंव्हा सूर्यप्रकाश पुरेसा नसतो त्यावेळी हा कुकर अन्न शिजवण्यासाठी वापरता येत नाही.
सौरभ लक्ष्मण कुंभार
९८६०००००४५

सौर बंब (सोलर वॉटर हीटर)

सौर बंब (सोलर वॉटर हीटर)

आंघोळीसाठी बहुतेक कुटुंबातून गरम पाण्याचा वापर केला जातो. हे गरम पाणी करण्यासाठी गावी बंब अथवा चुलीवर गरम पाणी करण्याची पद्धत आजही अस्तित्वात आहे. तसंच शहरी भागात इलेक्ट्रिक गिझर, गॅस गिझर अथवा गॅस शेगडीचा वापर केला जात आहे. पण दिवसेंदिवस इंधनटंचाई, वीजटंचाईची समस्या गंभीर होताना आपण पाहत आहोत. तसंच इंधनाचे साठे मर्यादित असल्याचेही संकेत आपल्याला मिळू लागले आहेत. इंधनांवर असलेल्या मर्यादा आणि उपलब्धता यामुळे स्वयंपाकाचा गॅस, केरोसीन, पेट्रोल, डिझेल इत्यादींच्या किमती झपाटय़ाने वाढत आहेत. विजेचं भारनियमन वाढलं आणि चौदा तासांपर्यंत वीज नाहीशी होऊ लागली. त्यामुळे सकाळी आंघोळीसाठी गरम पाणी मिळवण्यात अडचणी समोर येऊ लागल्या. या सर्व अडचणी सर्वत्रच सारख्या आहेत. त्यामुळे या समस्येवर उपाय आहे सौरबंब. म्हणजेच सोलर वॉटर हीटर. गेल्या तीन वर्षात गुंतवलेल्या रकमेचा परतावा मिळून पुढील काळात ही यंत्रणा मोफत सेवा देते.

सौरबंब प्रणालीमध्ये साधारणपणे दोन प्रकार आहेत: एफ.पी.सी. Flatt Plate Collector) व ई. टी. सी. (Evacuated Tubular Collector). पकी  एफ.पी.सी. हा प्रकार वर्षांनुवष्रे वापरला जाणारा व संपूर्णत: भारतीय बनावटीचा सौर बंब आहे. तर  ई. टी. सी. हा गेल्या काही वर्षांत लोकप्रिय झालेला पण चिनी बनावटीचा सौरबंब आहे. एफ.पी.सी. हा अधिक मजबूत व जास्त टिकाऊ आहे, पण त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या तांबे व इतर धातूंमुळे त्याची किंमत थोडी जास्त असते. तसेच धातूच्या पाइपमुळे  पाण्यातील क्षारांचा परिणाम होऊन प्रणाली कालांतराने बंद पडण्याचा धोका असतो. अर्थात, ठराविक काळाने हे पॅनल्स साफ केल्यास फारशी अडचण येत नाही.
ई. टी. सी. प्रणाली ही वजनाने हलकी व किमतीला तुलनेने बरीचशी कमी असते, पण त्याचबरोबर थोडी नाजूकही असते. तसेच ती काचेच्या नळ्यांची बनविलेली असल्याने जेथे पाणी क्षारयुक्त आहे तेथे जास्त उपयोगाची ठरते. अर्थात, प्रत्येक प्रणालीचे आपापले गुण व दोष असल्याने आपली गरज, भौगोलिक परिस्थिती, पाण्याची गुणवत्ता व सर्वात महत्त्वाचे आपले बजेट, या सर्व गोष्टींचा विचार करून निर्णय घेणे योग्य! 

विजेची राष्ट्रीय बचत व्हावी व पर्यावरणास हातभार लागावा म्हणून मी माझ्या घराचा गच्चीवर ३० सप्टेबर २०१२ ला २५० लिटर ई. टी. सी. सौर वॉटर हिटर बसवून घेतला आहे व तेंव्हा पासून आजतागायत आम्हाला २४x३६५ केव्हाही गरम पाणी मिळते. सौर वॉटर हिटर बसवण्यासाठी प्लंबिंग कामासह एकूण खर्च रुपये २५,०००/-(दरमहाची गिझर वीज बचत किमान १०००/- पेक्षा जास्त होत आहे) (हे सयंत्र बसविण्यासाठी गच्चीवर लागणारी जागा १०' x ') गेल्या ३ वर्षात फक्त एकदाही खर्च आला नाही. बाकी मेंटेनन्स शून्य, फक्त महिन्यातून एकदा काच स्वच्छ करावी लागते. (आज रोजी, तीन वर्षापूर्वी मी केलेल्या गुंतवणुकीची पूर्णपणे वसुली झालेली असून पुढील दहा वर्षे निश्चित मला गरम पाणी मिळू शकेल.)
सोलर काचेच्या नळ्यावर पक्षी विष्ठा टाकतात किंवा नळ्यावर धूळीचा थर बसून पुरेसे ऊन नळ्यांवर पंडत नाही, त्यावेळी पाणी गरम होण्यास जास्त वेळ लागतो. ( म्हणूनच महिन्यातून एकदा काच पाण्याने धुवून स्वच्छ करावी लागते).
या मर्यादा लक्षात घेऊन जर ह्या सौर वॉटर हिटरचा वापर केला तर तुम्हाला चोवीस तास केंव्हाही गरम पाणी तर मिळेलच पण तीन वर्षात केलेला खर्च भरून निघेल व उर्वरित आयुष्यभर जवळपास मोफत गरम पाणी मिळेल हे नक्की.

मीही, अपारंपारिक ऊर्जा क्षेत्रात काम करीत असल्याने अपारंपारिक ऊर्जा वापराबाबत सर्वसाधारण महत्त्व आणि गांभीर्य मला माहीत आहे.   

सौरभ लक्ष्मण कुंभार
९८६०००००४५