Tuesday, March 3, 2020

सौरबंब म्हणजेच सोलर वॉटर हीटर


इंधनाची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत आहे. स्वयंपाकाचा गॅसकोळसापेट्रोलडिझेल इ. ज्वलनशील पदार्थाचे साठे संपल्याचे संकेत तज्ज्ञ देत आहेत. अशावेळी सौर ऊर्जेवर चालणा-या सौरबंबचा पर्याय उपयुक्त ठरेल. त्याने इंधनाची 60 ते 70 टक्क्यांनी बचत होईल.
आंघोळीसाठी बहुतेक कुटुंबातून गरम पाण्याचा वापर केला जातो. हे गरम पाणी करण्यासाठी गावी बंब अथवा चुलीवर गरम पाणी करण्याची पद्धत आजही अस्तित्वात आहे. तसंच शहरी भागात इलेक्ट्रिक गिझरगॅस गिझर अथवा गॅस शेगडीचा वापर केला जात आहे. पण दिवसेंदिवस इंधनटंचाईवीजटंचाईची समस्या गंभीर होताना आपण पाहत आहोत. तसंच इंधनाचे साठे मर्यादित असल्याचेही संकेत आपल्याला मिळू लागले आहेत. इंधनांवर असलेल्या मर्यादा आणि उपलब्धता यामुळे स्वयंपाकाचा गॅसकेरोसीनपेट्रोलडिझेल इत्यादींच्या किमती झपाटय़ाने वाढत आहेत. वीजटंचाईचं सावट दूर होईल असं 2003 सालापासून बोललं जात आहे. पण विजेचं भारनियमन वाढलं आणि चौदा तासांपर्यंत वीज नाहीशी होऊ लागली. त्यामुळे सकाळी आंघोळीसाठी गरम पाणी मिळवण्यात अडचणी समोर येऊ लागल्या. या सर्व अडचणी सर्वत्रच सारख्या आहेत. त्यामुळे या समस्येवर उपाय आहे सौरबंब. म्हणजेच सोलर वॉटर हीटर. गेल्या तीन वर्षात गुंतवलेल्या रकमेचा परतावा मिळून पुढील काळात ही यंत्रणा मोफत सेवा देते.
सूर्य हा या विषृववृत्तातील ऊर्जेचा महत्त्वाचा स्त्रोत आहे. कधीही वेळ न चुकवता दररोज उष्णता आणि प्रकाश देण्याचं काम अव्याहतपणे करत आहे. या ऊर्जेचा वापर सर्वासाठी होऊ शकत असल्यामुळे निरनिराळ्या क्षेत्रात ही ऊर्जा उपयोगी ठरू शकते. आज पारंपरिक पध्दतीने पाणी गरम करावयाचं झाल्यास एका कुटुंबाला सुमारे 60 किलो लाकूड दर महिन्याला तर एक टन वर्षाला लागतं. एकीकडे जंगलं नष्ट होत असल्याचं बोललं जातंपण जंगलतोड थोपवणं मात्र शक्य होत नसल्याचं दिसून येत आहे. देशाच्या एकूण क्षेत्रफळापैकी 11 टक्के जागेवर जंगल असायला हवं. आजमितीला मात्र 16 टक्के जंगल अस्तित्वात राहिलं आहे. एकीकडे इंधनाची टंचाई तर दुसरीकडे अपव्यय बघावयास मिळतो. स्वयंपाकाचा गॅसकोळसापेट्रोलडिझेल इ. ज्वलनशील पदार्थाचे साठे संपत आल्याचे संकेत तज्ज्ञ देत आहे. आणि म्हणूनच याप्रसंगी सौरऊर्जेचा पर्याय उत्तम ठरणार आहे. सोलर वॉटर हीटर किंवा सौरबंब सर्व स्तरातील कुटुंबांना परवडणारं उपकरण असून भौगोलिक स्थितीप्रमाणे सुमारे 70 डिग्री सेल्सिअसपर्यंत पाणी गरम होतं.

सौरबंब प्रणालीमध्ये साधारणपणे दोन प्रकार आहेत: एफ.पी.सी. Flatt Plate Collector) व ई. टी. सी. (Evacuated Tubular Collector). पकी  एफ.पी.सी. हा प्रकार वर्षांनुवष्रे वापरला जाणारा व संपूर्णत: भारतीय बनावटीचा सौर बंब आहे. तर  ई. टी. सी. हा गेल्या काही वर्षांत लोकप्रिय झालेला पण चिनी बनावटीचा सौरबंब आहे. एफ.पी.सी. हा अधिक मजबूत व जास्त टिकाऊ आहेपण त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या तांबे व इतर धातूंमुळे त्याची किंमत थोडी जास्त असते. तसेच धातूच्या पाइपमुळे  पाण्यातील क्षारांचा परिणाम होऊन प्रणाली कालांतराने बंद पडण्याचा धोका असतो. अर्थातठराविक काळाने हे पॅनल्स साफ केल्यास फारशी अडचण येत नाही.
ई. टी. सी. प्रणाली ही वजनाने हलकी व किमतीला तुलनेने बरीचशी कमी असतेपण त्याचबरोबर थोडी नाजूकही असते. तसेच ती काचेच्या नळ्यांची बनविलेली असल्याने जेथे पाणी क्षारयुक्त आहे तेथे जास्त उपयोगाची ठरते. अर्थातप्रत्येक प्रणालीचे आपापले गुण व दोष असल्याने आपली गरजभौगोलिक परिस्थितीपाण्याची गुणवत्ता व सर्वात महत्त्वाचे आपले बजेटया सर्व गोष्टींचा विचार करून निर्णय घेणे योग्य! 

विजेची राष्ट्रीय बचत व्हावी व पर्यावरणास हातभार लागावा म्हणून मी माझ्या घराचा गच्चीवर ३० सप्टेबर २०१२ ला २५० लिटर ई. टी. सी. सौर वॉटर हिटर बसवून घेतला आहे व तेंव्हा पासून आजतागायत आम्हाला २४x३६५ केव्हाही गरम पाणी मिळते. सौर वॉटर हिटर बसवण्यासाठी प्लंबिंग कामासह एकूण खर्च रुपये २५,०००/-(दरमहाची गिझर वीज बचत किमान १०००/- पेक्षा जास्त होत आहे) (हे सयंत्र बसविण्यासाठी गच्चीवर लागणारी जागा १०' x ') गेल्या ८ वर्षात फक्त एकदाही खर्च आला नाही. बाकी मेंटेनन्स शून्यफक्त महिन्यातून एकदा काच स्वच्छ करावी लागते. (काही वर्षापूर्वी मी केलेल्या गुंतवणुकीची पूर्णपणे वसुली झालेली असून अजूनही पुढील काही वर्षे निश्चित मला गरम पाणी मिळू शकेल.)
सोलर काचेच्या नळ्यावर पक्षी विष्ठा टाकतात किंवा नळ्यावर धूळीचा थर बसून पुरेसे ऊन नळ्यांवर पंडत नाहीत्यावेळी पाणी गरम होण्यास जास्त वेळ लागतो. ( म्हणूनच महिन्यातून एकदा काच पाण्याने धुवून स्वच्छ करावी लागते).
या मर्यादा लक्षात घेऊन जर ह्या सौर वॉटर हिटरचा वापर केला तर तुम्हाला चोवीस तास केंव्हाही गरम पाणी तर मिळेलच पण तीन वर्षात केलेला खर्च भरून निघेल व उर्वरित आयुष्यभर जवळपास मोफत गरम पाणी मिळेल हे नक्की.

मीहीअपारंपारिक ऊर्जा क्षेत्रात काम करीत असल्याने अपारंपारिक ऊर्जा वापराबाबत सर्वसाधारण महत्त्व आणि गांभीर्य मला माहीत आहे.   

सौरभ लक्ष्मण कुंभार
९८६०००००४५




Wednesday, February 26, 2020

MS-CIT च का ?

MS-CIT च का ?

जगात आय.टी. क्षेत्रात भारताचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरणाऱ्या ‘परम’ महासंगणकाचे निर्माते तसेच जागतिक दर्जाचे आय.टी. तज्ञ डॉ. विजय भटकरसर व डॉ. विवेक सावंतसर यांच्या मार्गदर्शनाखाली बनविलेला अभ्यासक्रम.
MKCL ही महाराष्ट्र शासनाची अधिकृत संस्था आहे …..
( महाराष्ट्र राज्य उच्च तंत्रशिक्षण मंडळ – MSBTE )

MKCL देशभरात – केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या इतर राज्यांमध्येही त्या त्या राज्यांच्या मातृभाषेत MS-CIT कोर्स चालविला जातो. ( RS-CIT, OS-CIT, HS-CIT, TS-CIT, MS-CIT etc.. )
MKCL आंतरराष्ट्रीय – केवळ भारतातच नव्हे तर भारताबाहेर UAE (दुबई), सौदी अरेबिया, घाना, युरोप, इजिप्त, श्रीलंका या देशांमध्येही या अभ्यासक्रमांचे यशस्वी संचालन.
अशाप्रकारे MKCL ही जगातील अव्वल दर्जाची संस्था असून ERA या जगभरात लोकप्रिय असणाऱ्या शिक्षण प्रणालीच्या माध्यमातून शिक्षण देते.
शासनाच्या GR नुसार शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना
MS-CIT अनिवार्य आहे.
डिप्लोमा इंजिनीअरिंग साठी प्रवेश घेणाऱ्या विध्यार्थ्यांना CMF ह्या विषयाचा पेपर द्यावा लागत नाही.
MS-CIT च्या अभ्यासक्रमातील अत्याधुनिक सोफ्टवेअर जसे मायक्रोसॉफ्ट विन्डोज 10 व मायक्रोसॉफ्ट ऑफिस 2013 हे फक्त MS-CIT मध्येच समाविष्ट
कोर्स साठी लागणारे सोफ्टवेअर हे अधिकृत (Licence Copy) असल्याने सन्मानाने शिक्षण
MS-CIT च्या प्रत्येक केंद्रात अत्याधुनिक कंप्युटर ची व्यवस्था
MS-CIT च्या प्रत्येक केंद्रात लाईट गेल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून UPS ची सोय
MS-CIT ची परीक्षा शासनाच्या MSBTE बोर्डाकडून घेतली जाते.
MS-CIT केंद्रात असतात MKCL OnCeT सर्टिफाईड प्रशिक्षक.
MS-CIT केंद्रात असतो प्रत्येक विद्यर्थ्याला स्वतंत्र कंप्युटर व मिळतो पुरेसा वेळ.
MS-CIT कोर्स सोबत इंग्रजी व मराठी कॉम्पुटराइज टायपिंग कोर्स (प्रमाणपत्रासह)
MS-CIT परीक्षा दिल्यानंतर त्वरित प्रोविजनल सर्टिफिकेट तसेच अल्पावधीतच फायनल सर्टिफिकेट
माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्याना ICT साठी MS-CIT केल्यास फायद्याचेच परंतु ICT चा पुढचा टप्पा म्हणून विद्यार्थ्यांची MS-CIT लाच पसंती.
या तसेच इतर अनेक वैशिष्ट्यांमुळे MS-CIT आहे आंतरराष्ट्रीय दर्जाचा परिपूर्ण कंप्युटर कोर्स.
असे असतानाही अनेक प्रयत्न करूनही MS-CIT केंद्र मिळण्यास अपात्र ठरणाऱ्या काही संस्था चालकांकडून विद्यार्थी तसेच पालकांची दिशाभूल करून MS-CIT बरोबर नामसाधर्म्य असणारे कोर्सेस थोपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तरी जागरूक विद्यार्थी व पालकांनी आपली फसवणूक टाळावी व अधिकृत केंद्रातच आपला प्रवेश निश्चित करावा…..

एस. के. कॉम्प्युटर्स
(महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे अधिकृत MS-CIT संगणक प्रशिक्षण केंद्र)
“पित्रुपुण्य़ाय” १८/२०, उषःक़ाल हौसिंग सोसा. (पोस्टल कॉलनी), महंमदवाडी पोलीस चौकीसमोर, तरवडेवस्ती, महंमदवाडी, पुणे – ४११०६०. भ्रमणध्वनी-९८६०००००४५
Website : https://skcomputers-theinstitute.business.site
Map : https://g.co/kgs/teFohDTo

#Mscit,#mkcl,#MSCIT, #SKCOMPUTERS, #hadapsar, #Mohammadwadi, #computertraining,#MKCL,

Saturday, February 22, 2020

पर्याय स्वंयपाकाच्या गॅसला


पर्याय स्वंयपाकाच्या गॅसला
सबसिडीचे सहा सिलेंडर आणि गॅस च्या किंमतीत दिवसेंदिवस होणाऱ्या भावावाढी मुळे आता स्वंयपाकाच्या गॅस ला पर्याय शोधणं गरजेचं झालं आहे. अद्यावत तंत्रज्ञानामूळे स्वंयपाक घरात नाना प्रकारची उपकरणं आली. कॉफी मेकर, सॅण्डविच मेकर, राईस कुकर, ओव्हन, मायक्रोव्हेव यासारख्या अत्याधुनिक उपकरणांनी स्वयंपाक घरं सजली, तरी स्वंयपाकाच्या गॅसला रास्त आणि स्वस्त पर्यायाविषयी बरेच जण अनभिज्ञ आहेत. काही पर्याय माहीत असले तरी त्याची जुजबी माहीती आणि शंका यामुळे सामान्य माणुस या पर्यायांचा अवलंब करताना कचरतात. परंतु आता सर्वांनाच याची गरज वाटू लागली आहे. सोलार कूकर , इंडक्शन कुकर आणि हॅलोजन कूकर या काही पर्यायांनी आपण गॅस बरोबरच वीज बचत करून स्वादिष्ट अन्न जरुर करु शकतो.
भारतात वर्षभर भरपूर सुर्य प्रकाश उपलब्ध असतो. आपल्या आर्थिक विकासासाठी तसेच घरघुती वापरासाठी आपण या उर्जेचा उपोयोग करु शकतो. सुर्यापासून भारताच्या भुमीवर प्रत्येक चौरसमीटरवर एका तासात सधारपणे ५ ते ७ किलोवॅट इतकी सौर उर्जा उपलब्ध होते. म्हणजेच वर्षभरात ६०,००० अब्ज मेगावॅट अवर इतकी उर्जा विनामुल्य आपल्याला उपलब्ध होते आणि आपण ही उर्जा वाया घालवतो. हीच उर्जा आपण जर सौर उपकरणां मार्फत उपोयोगात आणली तर खर्चिक इंधन आणि विजेचा प्रश्न निकालात निघेल

इंडक्श्न कुकर :
इंडक्श्न कुकर हा विजेवर चालणारा आहे. यात उपकरणात आलेली विज थेट भांड्यात जाते त्यामुळे अन्न पटकन शिजते. यात फक्त कुकरचा भांड्याखालाचा पृष्ठभाग गरम होतो आणि भांड्य़ात ही ज्या पातळी पर्यंत अन आहे, त्या पातळी पर्यंतच भांडे गरम होते. म्हणजेच तुम्ही भांडे हाताने ही उचलू शकता. इडक्श्न कुकर electro magnetic induction technology वर आधारित आहे. इडक्श्न कुकर ला जरी २००० वॅट उर्जा लागत असली तरी त्यावरील अन्न पटकन शिजते त्यामूळे विज बचत होते. उदा. जर २००० वॅट चा इंडक्श्न कुकर १ तास चालला तर तर विजेचे २ युनिट खर्च होतील. आणि जर विजचे दर पर युनिट ६ रुपये पकडला तर २ युनिट साठी आपण १२ रुपये खर्च करतो. या कुकरची स्वछता पटकन करता येते, या कुकरसाठी विशिष्ठ प्रकारची आणी सपाट पॄष्ठ भाग असलेली भांडी वापरावी लागतात. साधारण ३००० ते ४३०० रुपायां पर्यंत इडक्श्न कुकर उपलब्ध आहे. यात बजाज , फिलिप्स यासारखी ब्रॅण्डेड तसेच नॉन ब्रॅण्डेड कंपन्याचे इंडक्श्न कुकर आहेत.
हॅलोजन कुकर :
पाश्चिमात्य देशात सध्या हॅलोजन कुकर च्या नवनवीन रेंज आलेल्या आहेत. भारतात ही हॅलोजन कूकरचा पर्याय उपलब्ध आहेत. हॅलोजन कूकर मध्ये हॅलोजन बल्बचा वापर करण्यात येतो. हॅलोजन बल्ब पटकन तापत असल्याने त्यापासून निर्माण होणाऱ्या उष्णतेने अन्न पटकन शिजते. हॅलोजन कुकर वेगवेगळ्या आकारात उपलब्ध आहे. मायक्रोव्हेव अवन तसेच इडक्शन कूकर सारख्याच आकारात उपलब्ध आहे. यात ही टेमप्रेचर नियंत्रीत करण्याची सोय आहे. साधारणत: २००० रुपायां पासून पूढे हॅलोजन कुकर च्या किंमती आहे
ही नवनवीन उत्पादनांची खरेदी करताना चोखंदळ ग्राहकांनी सर्व बाबींची खातरजमा करणं आवश्यक आहे. उत्पादनांची वॉरन्टी, गॅरन्टी तसेच मॅन्टेन्स कॉस्ट या सर्व गॊष्टींची पडताळणी गरजेचं आहे. याबरोबरच आय. एस. आय. प्रमाणित आणि ५ स्टार चिन्हांकीत उत्पादनेच खरेदी करा.


Friday, January 25, 2019

राज्यात 3200 मेगावॅट सोलार प्रकल्प उभारण्यात येतील

येत्या दोन वर्षात महावितरण द्वारे राज्यात 3200 मेगावॅट सोलार प्रकल्प उभारण्यात येतील, अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज  मंत्रालयात झालेल्या एका बैठकीत दिली. या बैठकीत महावितरणच्या 16 झोन मधील प्रत्येक मुख्य अभियंताकडून 200 मेगावॅट सोलर प्रकल्प उभारण्याबाबत निर्देश देण्यात आले. या बैठकीस ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव अरविंद सिंह, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार, विश्वास पाठक उपस्थित होते.
राज्यातील सर्व नळयोजना, उपसासिंचन योजना (खाजगी व शासकीय) तसेच ग्रामपंचायत मधील सर्व शासकीय इमारती (शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत भवन, आरोग्य केंद्रे) सौर ऊर्जेवर आणाव्यात या बाबत ऊर्जामंत्री यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत ऊर्जा संवर्धन धोरणा अंतर्गत या योजना राबवण्यात याव्या तसेच या योजनेकरिता 500 कोटीचे बजेट तयार करून मंत्रिमंडळासमोर सादर करण्याचे निर्देशही ऊर्जामंत्री यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. ऊर्जासंवर्धन धोरणा अंतर्गत पहिल्या टप्प्यात महावितरण कडून या योजना राबविण्यात येतील. 
या बैठकीत एचव्हीडीएस, इन्फ्रा - 2, दिनदयाल उपाध्याय व आय‍पीडीएस योजनेबाबतही आढावा घेण्यात आला. मार्च 2019 पर्यंत इन्फ्रा 2, दिनदयाल उपाध्याय तसेच आयपीडीएस योजनेचे काम पूर्ण करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री यांनी महावितरणला दिले. मुंबई, नवीमुंबई, पनवेल, कल्याण, औरंगाबाद, चंद्रपूर, ठाणे व नांदेड विभागात आयपीडीएसची कामे महानगर पालिकेद्वारे रस्ता पुर्नस्थापना दर मान्य न केल्यामुळे  पूर्ण झाली नाहीत ती पूर्ण कराव्यात तसेच एचव्हीडीएस योजनेत ज्या भागात विद्युत वाहक यंत्रणा पोहचणे शक्य नाही त्या भागात सोलार कृषी पंप देण्याचे निर्देशही बावनकुळे यांनी दिले.
राज्यात 750 मेगावॅट सोलार प्रकल्प महाजनकोद्वारे राबवण्यात येणार आहेत. यापुढे सौर ऊर्जेचे छोटे प्रकल्प महावितरण कडून तर महाजनको कडून मोठे प्रकल्प पूर्ण करण्यात येतील.
संकलन : लोकमत 

Saturday, November 10, 2018

पारंपरिक वीज वापरात बचत करण्याच्या उद्देशाने राज्यात अटल सौर कृषिपंप योजनेअंतर्गत सात हजार सौर कृषिपंप वाटप होणार...

पारंपरिक वीज वापरात बचत करण्याच्या उद्देशाने राज्यात अटल सौर कृषिपंप योजनेअंतर्गत सात हजार सौर कृषिपंप वाटपास मंत्रिमंडळाने बुधवारी 3 ऑक्टोबर २०१८ रोजी  मान्यता दिल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली..
ते पुढे म्हणाले, की या योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा पिकांना सिंचन करणे शक्य होईल. ही संपूर्ण योजना महाऊर्जाकडून राबविण्यात येईल. योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या सौर कृषिपंपांपैकी २५ टक्के पंप हे ३ अश्वशक्तीचे, तर ७५ टक्के पंप ५ अश्वशक्तीचे असतील. ३ व ५ अश्वशक्ती पंपांच्या एकूण उद्दिष्टापैकी २२.५ टक्के पंप अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांसाठी राखीव राहणार आहेत. उर्वरित ७७.५ टक्के पंप सर्वसाधारण वर्गातील लाभार्थ्यांसाठी राहतील. पंपापोटी ५ टक्के हिस्सा शेतकऱ्याला भरावा लागणार आहे. ९५ टक्के वाटा  केंद्र आणि राज्य शासन उचलणार आहे.
   कृषिपंपाचा हमी कालावधी ५ वर्षांचा व सोलर मोड्यूल्सची हमी १० वर्षांची असणार आहे. कृषिपंप पुरवठा धारकावर ५ वर्षांसाठी पूर्ण देखभाल व दुरुस्ती करार करण्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे. सिंचनाची सोय असलेले शेतकरी या योजनेस पात्र ठरणार आहेत. तसेच, त्या शेतकऱ्याकडे पारंपरिक पद्धतीने वीज जोडणी नसावी. ५ एकरांपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्याला ३ अश्वशक्ती, तर ५ एकरांपेक्षा जास्त जमीन असलेल्या शेतकऱ्याला ५ अश्वशक्तीचा पंप देता येणार आहे.
   पारंपरिक ऊर्जेद्वारे विद्युतीकरण न झालेले शेतकरी, वनविभागाचे प्रमाणपत्र न मिळालेले शेतकरी, महावितरणकडे पैसे भरून वीज जोडणी प्रलंबित असलेले शेतकरी, ज्यांना नजीकच्या काळात वीज जोडणी मिळणार नाही असे शेतकरी, अतिदुर्गम भागातील शेतकरी, शासनाच्या धडक सिंचन योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना या योजनेत प्राधान्य राहील. वैयक्तिक, सामुदायिक शेततळे, बारमाही वाहणारी नदी, नाल्याशेजारील शेत जमीनधारकही या योजनेसाठी पात्र राहतील.
    शासनाच्या निकषानुसार लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे. तहसीलदार, जिल्हा कृषी अधीक्षक, समाज कल्याण सहायक आयुक्त, भूजल सर्वेक्षणचे वरिष्ठ वैज्ञानिक, आदिवासी विभागाचे प्रकल्प अधिकारी, महावितरणचे अधीक्षक अभियंता आणि महाऊर्जाचे विभागीय व्यवस्थापक यांचा या समितीत समावेश असेल. राज्य स्तरावरील सुकाणू समितीचे अध्यक्ष प्रधान सचिव, ऊर्जा हे योजनेचे नियंत्रण करणार आहेत.
१४ हजार हेक्टर क्षेत्र येणार सिंचनाखाली
    या योजनेअंतर्गत १४ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल. योजनेमुळे कृषिपंप ग्राहकांना शासनातर्फे देण्यात येणाऱ्या अनुदानामध्ये ६३ कोटींची बचत होईल. क्रॉस सबसिडीही १६८ कोटींनी कमी होईल. वीजदर कमी होतील. पारंपरिक व अपारंपरिक पद्धतीने करण्यात येणाऱ्या वीजनिर्मितीतही बचत होणार आहे. याशिवाय राज्य शासनाद्वारे राज्यात एक लाख सौर कृषिपंप बसवण्यासाठी नवीन योजना तयार करण्यासही मंत्रिमंडळाने या वेळी मान्यता दिली आहे, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
 असे असेल पंपांचे वितरण आणि     किंमत
३ अश्‍वशक्ती   -  २ लाख ४० हजार रुपये किंमत
५ अश्‍वशक्ती  -  ३ लाख २५ हजार रुपये किंमत
३ अश्‍वशक्ती  -  १७५० पंप बसविणार
५ अश्‍वशक्ती  -  ५२५० पंप बसविणार

सौर ऊर्जा क्षेत्रातील शासकीय व इतर संस्था

केंद्र शासनाने अपारंपरिक ऊर्जास्रोत मंत्रालय निर्माण केले आहे व प्रत्येक राज्याने राज्य पातळीवर ऊर्जा विकास अभिकरण स्थापन केले आहे. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा मंडळ) ही स्वायत्त संस्था १९८५ साली स्थापन केली. हे अभिकरण खालील अपारंपरिक ऊर्जास्रोतांच्या विकासासाठी काम करते. 
आपण ह्य़ा अक्षय मिळणाऱ्या सौर ऊर्जेसंबंधी विचार करणार असल्याने सौर ऊर्जा क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांची व सौर ऊर्जा उपकरणे तयार करणाऱ्या निर्मात्यांची 
माहिती मिळवणार आहोत, ती पुढीलप्रमाणे आहे. भारतामध्ये इंदोर, चंडीगड, मदुराई, वल्लभ विद्यानगर, कलकत्ता व पुणे येथे क्षेत्रीय परीक्षण केंद्रे कार्यरत आहेत. 
या केंद्रांमध्ये विविध अपारंपरिक ऊर्जास्रोत उपकरणांच्या शास्त्रशुद्ध चाचण्या घेऊन उपकरणांच्या कार्यक्षमतेचे प्रमाणपत्र दिले जाते. पुण्यातील क्षेत्रीय केंद्राचा पत्ता पुढीलप्रमाणे. स्कूल ऑफ एनर्जी स्टडिज, भौतिकी विभाग, पुणे विश्वविद्यालय, पुणे ४११ ००७, दूरध्वनी क्रमांक (०२०) ५६५६०६१, ५६५५२०१, ई-मेल : mgt@physics.unipune.emet.in  पुणे विद्यापीठात विविध अपारंपरिक ऊर्जास्रोतांविषयी संशोधन केले जाते. जिज्ञासूंनी वरील विभागाशी संपर्क साधल्यास अद्ययावत माहिती व तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळू शकेल. भारत सरकारने केंद्रात दिल्ली येथे एक स्वतंत्र अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाची स्थापना केली आहे. त्याला टठफए म्हणतात. म्हणजेच Ministry of New and renewable Energy  MNRE (Ministry of New & Renewable Energy)
नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय, ब्लॉक नं. १४, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोदी रोड, नवी दिल्ली- ११० ००३, फोन ९१११२४३६३०३५, २४३६०७०७, वेब : www.mnre.gov.in
येथून एक अक्षयउर्जा नावाचे  मासिकही निघते. त्यात देखील ही ऊर्जा वापरण्यासाठी मिळणाऱ्या सवलती, फायदे व अनुदानांबद्दलची माहिती असते. ह्य़ा सवलती मिळविण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे केंद्राला त्याची शिफारस लागते. ‘नाबाड’ देखील ह्य़ासाठी कर्ज देते. ‘नाबार्ड’ ही संस्था बँकांना कर्ज देते व बँक आपणास कर्ज देते. नाबाड हे कर्ज शेतकऱ्यांना,काही मर्यादित अपारंपरिक ऊर्जा योजनांसाठीच देते.    

Monday, November 5, 2018

सेल्फी विथ रांगोळी स्पर्धा !

दिवाळीचा सण, करू या रांगोळीच्या रंगांची उधळण.

सहभागी व्हा फक्त एक सेल्फी पाठवून ...............

तुम्हाला, तुमच्या आईला, ताईला किंवा इतरांना जर रांगोळी काढता येत असेल तर या दिवाळीत तुमच्या रांगोळीसोबत एक सेल्फी पाठवा आणि बनू शकाल तुमच्या तालुक्यातील/जिल्ह्यातील सेल्फी-विथ-रांगोळी' स्पर्धेचे विजेते. 

"सेल्फी विथ रांगोळी स्पर्धा, पुणे"
दिनांक १ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर दरम्यान ही स्पर्धा पुणे विभागामधील MS-CIT व KLiCच्या सर्व अधिकृत केंद्रांमार्फत ही स्पर्धा राबवली जाईल.
या स्पर्धेमध्ये कोणीही सहभागी होऊ शकतात त्यासाठी कोणतीही वयोगटाची अट किंवा वयाची वर्गवारी नसणार आहे.
ही स्पर्धा केवळ WhatsApp माध्यमाचा वापर करून घेतली जाणार आहे त्यामुळे प्रत्यक्ष रांगोळी स्पर्धा भरवली जाणार नाही. 
स्पर्धकाने दीपावलीच्या काळात आपल्या घरी काढण्यात आलेल्या रांगोळीचा फोटो केंद्राच्या WhatsApp नंबरवर आपल्या नावासहित पाठवून स्पर्धेतला आपला सहभाग नोंदवू शकतात. 

Whatsapp no. 9860000045

या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना MKCL, पुणे विभागातर्फे प्रमाणपत्र दिले जाईल.  

अधिक माहितीसाठी आजच आपल्या शासन मान्यताप्राप्त MS-CIT प्रशिक्षण केंद्र. एस. के. कॉम्प्युटर्स मधे संपर्क साधा.

एस. के. कॉम्प्युटर्स, उषःक़ाल हौसिंग सोसा. कृष्णानगर रोड, महंमदवाडी पोलीस चौकीसमोर, तरवडेवस्ती, महंमदवाडी, पुणे – ६०. "माय ऊर्जा" शॉपी शेजारी
फोन:02026970964 / 8411900045

Click here and visit

Locations: