Showing posts with label सौर ऊर्जा. Show all posts
Showing posts with label सौर ऊर्जा. Show all posts

Tuesday, March 3, 2020

सौरबंब म्हणजेच सोलर वॉटर हीटर


इंधनाची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत आहे. स्वयंपाकाचा गॅसकोळसापेट्रोलडिझेल इ. ज्वलनशील पदार्थाचे साठे संपल्याचे संकेत तज्ज्ञ देत आहेत. अशावेळी सौर ऊर्जेवर चालणा-या सौरबंबचा पर्याय उपयुक्त ठरेल. त्याने इंधनाची 60 ते 70 टक्क्यांनी बचत होईल.
आंघोळीसाठी बहुतेक कुटुंबातून गरम पाण्याचा वापर केला जातो. हे गरम पाणी करण्यासाठी गावी बंब अथवा चुलीवर गरम पाणी करण्याची पद्धत आजही अस्तित्वात आहे. तसंच शहरी भागात इलेक्ट्रिक गिझरगॅस गिझर अथवा गॅस शेगडीचा वापर केला जात आहे. पण दिवसेंदिवस इंधनटंचाईवीजटंचाईची समस्या गंभीर होताना आपण पाहत आहोत. तसंच इंधनाचे साठे मर्यादित असल्याचेही संकेत आपल्याला मिळू लागले आहेत. इंधनांवर असलेल्या मर्यादा आणि उपलब्धता यामुळे स्वयंपाकाचा गॅसकेरोसीनपेट्रोलडिझेल इत्यादींच्या किमती झपाटय़ाने वाढत आहेत. वीजटंचाईचं सावट दूर होईल असं 2003 सालापासून बोललं जात आहे. पण विजेचं भारनियमन वाढलं आणि चौदा तासांपर्यंत वीज नाहीशी होऊ लागली. त्यामुळे सकाळी आंघोळीसाठी गरम पाणी मिळवण्यात अडचणी समोर येऊ लागल्या. या सर्व अडचणी सर्वत्रच सारख्या आहेत. त्यामुळे या समस्येवर उपाय आहे सौरबंब. म्हणजेच सोलर वॉटर हीटर. गेल्या तीन वर्षात गुंतवलेल्या रकमेचा परतावा मिळून पुढील काळात ही यंत्रणा मोफत सेवा देते.
सूर्य हा या विषृववृत्तातील ऊर्जेचा महत्त्वाचा स्त्रोत आहे. कधीही वेळ न चुकवता दररोज उष्णता आणि प्रकाश देण्याचं काम अव्याहतपणे करत आहे. या ऊर्जेचा वापर सर्वासाठी होऊ शकत असल्यामुळे निरनिराळ्या क्षेत्रात ही ऊर्जा उपयोगी ठरू शकते. आज पारंपरिक पध्दतीने पाणी गरम करावयाचं झाल्यास एका कुटुंबाला सुमारे 60 किलो लाकूड दर महिन्याला तर एक टन वर्षाला लागतं. एकीकडे जंगलं नष्ट होत असल्याचं बोललं जातंपण जंगलतोड थोपवणं मात्र शक्य होत नसल्याचं दिसून येत आहे. देशाच्या एकूण क्षेत्रफळापैकी 11 टक्के जागेवर जंगल असायला हवं. आजमितीला मात्र 16 टक्के जंगल अस्तित्वात राहिलं आहे. एकीकडे इंधनाची टंचाई तर दुसरीकडे अपव्यय बघावयास मिळतो. स्वयंपाकाचा गॅसकोळसापेट्रोलडिझेल इ. ज्वलनशील पदार्थाचे साठे संपत आल्याचे संकेत तज्ज्ञ देत आहे. आणि म्हणूनच याप्रसंगी सौरऊर्जेचा पर्याय उत्तम ठरणार आहे. सोलर वॉटर हीटर किंवा सौरबंब सर्व स्तरातील कुटुंबांना परवडणारं उपकरण असून भौगोलिक स्थितीप्रमाणे सुमारे 70 डिग्री सेल्सिअसपर्यंत पाणी गरम होतं.

सौरबंब प्रणालीमध्ये साधारणपणे दोन प्रकार आहेत: एफ.पी.सी. Flatt Plate Collector) व ई. टी. सी. (Evacuated Tubular Collector). पकी  एफ.पी.सी. हा प्रकार वर्षांनुवष्रे वापरला जाणारा व संपूर्णत: भारतीय बनावटीचा सौर बंब आहे. तर  ई. टी. सी. हा गेल्या काही वर्षांत लोकप्रिय झालेला पण चिनी बनावटीचा सौरबंब आहे. एफ.पी.सी. हा अधिक मजबूत व जास्त टिकाऊ आहेपण त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या तांबे व इतर धातूंमुळे त्याची किंमत थोडी जास्त असते. तसेच धातूच्या पाइपमुळे  पाण्यातील क्षारांचा परिणाम होऊन प्रणाली कालांतराने बंद पडण्याचा धोका असतो. अर्थातठराविक काळाने हे पॅनल्स साफ केल्यास फारशी अडचण येत नाही.
ई. टी. सी. प्रणाली ही वजनाने हलकी व किमतीला तुलनेने बरीचशी कमी असतेपण त्याचबरोबर थोडी नाजूकही असते. तसेच ती काचेच्या नळ्यांची बनविलेली असल्याने जेथे पाणी क्षारयुक्त आहे तेथे जास्त उपयोगाची ठरते. अर्थातप्रत्येक प्रणालीचे आपापले गुण व दोष असल्याने आपली गरजभौगोलिक परिस्थितीपाण्याची गुणवत्ता व सर्वात महत्त्वाचे आपले बजेटया सर्व गोष्टींचा विचार करून निर्णय घेणे योग्य! 

विजेची राष्ट्रीय बचत व्हावी व पर्यावरणास हातभार लागावा म्हणून मी माझ्या घराचा गच्चीवर ३० सप्टेबर २०१२ ला २५० लिटर ई. टी. सी. सौर वॉटर हिटर बसवून घेतला आहे व तेंव्हा पासून आजतागायत आम्हाला २४x३६५ केव्हाही गरम पाणी मिळते. सौर वॉटर हिटर बसवण्यासाठी प्लंबिंग कामासह एकूण खर्च रुपये २५,०००/-(दरमहाची गिझर वीज बचत किमान १०००/- पेक्षा जास्त होत आहे) (हे सयंत्र बसविण्यासाठी गच्चीवर लागणारी जागा १०' x ') गेल्या ८ वर्षात फक्त एकदाही खर्च आला नाही. बाकी मेंटेनन्स शून्यफक्त महिन्यातून एकदा काच स्वच्छ करावी लागते. (काही वर्षापूर्वी मी केलेल्या गुंतवणुकीची पूर्णपणे वसुली झालेली असून अजूनही पुढील काही वर्षे निश्चित मला गरम पाणी मिळू शकेल.)
सोलर काचेच्या नळ्यावर पक्षी विष्ठा टाकतात किंवा नळ्यावर धूळीचा थर बसून पुरेसे ऊन नळ्यांवर पंडत नाहीत्यावेळी पाणी गरम होण्यास जास्त वेळ लागतो. ( म्हणूनच महिन्यातून एकदा काच पाण्याने धुवून स्वच्छ करावी लागते).
या मर्यादा लक्षात घेऊन जर ह्या सौर वॉटर हिटरचा वापर केला तर तुम्हाला चोवीस तास केंव्हाही गरम पाणी तर मिळेलच पण तीन वर्षात केलेला खर्च भरून निघेल व उर्वरित आयुष्यभर जवळपास मोफत गरम पाणी मिळेल हे नक्की.

मीहीअपारंपारिक ऊर्जा क्षेत्रात काम करीत असल्याने अपारंपारिक ऊर्जा वापराबाबत सर्वसाधारण महत्त्व आणि गांभीर्य मला माहीत आहे.   

सौरभ लक्ष्मण कुंभार
९८६०००००४५




Wednesday, December 30, 2015

सौर उर्जेचा वापर करणेबाबत प्रचार व प्रसार मोहीम सांगता

अपुरया विजेच्या संकटापासून वाचवण्यासाठी जगभर चालू असलेल्या चळवळीत, पर्यावरणास पूरक अशा साधनसंपत्तीचा जास्तीत वापर करून, माझा खारीचा वाटा म्हणून हातभार लागावा, विजेची बचत व काही प्रमाणात निर्मिती व्हावी, केवळ या उद्देशानेच, अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत म्हणून ओळख असलेल्या सौर ऊर्जाचा वापर शासकीय कार्यालयात व्हावा यासाठी मी, सौरभ लक्ष्मण कुंभार आणि माझा मित्र श्री संतोष खोमणे यांना सोबत घेऊन महाराष्ट्रातील ३४ जिल्हा मुख्यालयास दुचाकीवरून भेट देऊन शासकीय कार्यालयात व त्यांच्या संलग्न संस्थेत सौर उर्जेचा वापर करणेबाबत प्रचार व प्रसार करण्याचे नियोजन दि. १ डिसेंबर २०१५ ते ३१ डिसेंबर २०१५ कालावधीत केले होते. या प्रवासात जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद त्यांच्या अखत्यारीत असलेल्या शासकीय कार्यालयात सौर उर्जेचा (विशेषतः छतावरील सौर ऊर्जा - नेट मीटरींग) वापर करुन विजेच्या बाबतीत कार्यालये स्वयंपूर्ण करणेबाबत निवेदन सादर केले आहे.

एकूण ५१०० किलोमीटर प्रवास, ३४ जिल्हा मुख्यालयास भेटी, लोकांशी प्रत्यक्ष, भेटीगाठी घेऊन स्थानिक पातळीवर आघाडीवर असलेले दैनिक वृत्तपत्र/आवृत्ती यामध्ये सौर ऊर्जेचा वापर करणेबाबत व माझ्या उपक्रमाबद्दल प्रसिद्धी देऊन जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. जिल्हा स्तरावरील शासकीय अधिकारी, मित्रपरिवार, सहकारी यांनी आमच्या या उपक्रमाचे कौतुक केले आणि उपक्रमास वेळोवेळी प्रोत्साहन मिळात गेले, त्यामुळेच मी हा उपक्रम अत्यंत यशस्वीरीत्या पूर्ण केला. काही उत्तम विधायक व समाजोपयोगी कार्य करताना व अगोदर कधी न भेटलेल्यांनी एकत्र येऊन, आमच्या या उपक्रमास मदत करणे, हा अनुभव माझ्याकरिता खुपच प्रेरणादायी होता. महिनाभर दुचाकीवरून केलेला प्रवास आणि  दरम्यानच्या भेटीगाठी हे अत्यंत आनंददायी अनुभव होते.

ज्या शासकीय अधिकाऱ्यांशी मी भेटलो, निवेदने सादर केली, त्यांनी देलेली सकारात्मक प्रतिक्रिया, माझ्या उपक्रामाचे कौतुक तसेच सहकार्य व मार्गदर्शन  केल्याबद्दल सर्व प्रशासकिय अधिकारी वर्गाचे आभार मानतो.

महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण, पुणे यांनी प्रत्राद्वारे माझ्या उपक्रमास शुभेच्छा व जिल्हा स्तरावरील शासकिय यंत्रणानी आम्हास सहकार्य करण्याचे आवाहन  केले व वैयक्तिक स्तरावरही मदत करण्याचे आश्वासन दिले  त्यामुळे मी महाउर्जाचे श्री. हेमंत कुलकर्णी, श्री.हेमंत पाटील, श्री.विकास रोडेश्री.विनोद शिरसाट, श्री.फडके श्री. अभिजीत हिंगे व श्री. जायभाय यांचे सहित समस्त महाऊर्जाचे  शतशः आभारी आहे.

राज्य व जिल्हा पातळीवर आघाडीवर असलेले दैनिक वृत्तपत्र, साप्ताहिक आणि  मासिक यामध्ये लेखन करणारे पत्रकार मित्र, तसेच स्थानिक दुरचित्रवाणीवरून बातम्या प्रसारण करणारे प्रतिनिधी, यांनी माझ्या उपक्रमास व सौर उर्जा वापराबाबत प्रसिद्धी दिल्याबद्दल, मी सर्व माध्यम प्रतिनिधींचे आभार मानतो. त्यामुळेच मला प्रत्यक्षरीत्या अनेक लोकांपर्यंत सौर ऊर्जेचे महत्त्व पोहचवता आले.

जिल्हा स्तरावरील माझ्या खालील मित्रांनी त्यांच्या व्यस्त वेळातुन न कंटाळता केलेल्या सहकार्याबद्दल मनपूर्वक आभार.
नितिन सपकाळ(सातारा)सचिन खांडेकर आणि सागर बाबर(सांगली)प्रदिप  घोडके आणि सचिन पटिल(कोल्हापुर)हार्दिक शिगले(सिंधुदुर्ग), नितिन पडाळकर आणि श्री. जगदीश चव्हाण(रत्नागिरी), निलेश पाटिल(रायगड), विशाल कुंभार (ठाणे आणि पालघर), दुर्गेश मारु, प्रशांत जोशी, मनोहर चव्हाण आणि योगेश पगर(नाशिक आणि नंदुरबार), महेंद्र नेरकर, प्रविण नवले आणि सागर जाधव(धुळे), अरुण कोष्टी, निलेश पाटील, शाम दिक्षित, रितेश माळी- सोयो सिस्टिम्स(जळगाव आणि बुलढाणा), श्रीकांत आणि संदिप(अकोला), किशोर काजळकर आणि श्री. मानकर(अमरावती), सचिन ढोणे आणि सुनिल गुंटे(वर्धा), प्रितेश उचकलवार(नागपुर), सुभाष सतदेव, श्री. तुरस्कर(भंडारा), पुरुषोत्तम बिसेन आणि विनोदकुमार चौधरी(गोंदिया), सुशांत रच्चावार, अनिल कुंटावार, दुर्गेश इंगोले आणि नंदकिशोर नल्लुरवार(गडचिरोली), श्री. दत्ता भाके, संजय कुंभार, हरिश बारे(चंद्रपुर), संदिप फुटाने आणि श्री. राउत(यवतमाळ), गजानन अंभोरे(वाशिम), विशाल(हिंगोली), माधव वाघमारे आणि श्री. दासरी(नांदेड), प्रशांत बेल्लाळे(लातुर), विकास मेटे आणि श्री. शिरपुकर(उस्मानाबाद), गिरिश इप्पाकायल(सोलापुर), श्री. मोमिन(बीड), राजेश पुरी(औरंगाबाद), सागर काळे, निलेश गोरे आणि श्री. विकास साळुंखे (अहमदनगर) आणि पुण्यातील अनेक सहकारी.
जिल्हा स्तरावरील माझ्या मित्रांनी वेळापत्रकानुसार उपक्रमास सहकार्य करण्याकरिता नियोजन केले होते, परंतु नियोजित वेळेच्या अगोदर एक दिवस माझा प्रवास चालला होता त्यामुळे   अनेक माझ्या सहकाऱ्यांना भेटी देता आल्या नाहीत, त्यामुळे त्यांनी मला माफ करावे.
माझ्या या उपक्रमास माझ्या संपुर्ण कुटुंबाकडुनही प्रोत्साहन मिळाले. माझे आई, वडिल, भाऊ, बहिण, पत्नी विशाखा, माझ्या गोड मुली सुरभि आणि स्वानंदि यांनी काहीही कुरबुर न करिता दिलेल्या पाठिंब्यामुळे मी उपक्रम पुर्ण करु शकलो.
प्रवासाचे नियोजन करण्यात मार्गदर्शन केल्याबद्दल, मी श्री. अजय गुप्ते यांचे आभार मानतो. 

सर्वात शेवट श्री. संतोष खोमणे यांनी आदल्या दिवशी हॉस्पिटलमधुन डिस्चार्ज घेतला असताना या संपुर्ण प्रवासात माझी साथ दिली, त्यांच्यामुळे माझा हा महत्वकांक्षी उपक्रम यशस्वी होण्यास मदत झाली.

नियोजन वेळेत पूर्ण होईल का? हे शक्य नाही? अशा उपक्रमातून काहीही साध्य होणार नाही! अनावश्यक खटाटोप आहे! जिल्हांना खरंच भेटी देणार का? यापूर्वी आम्ही असे प्रयोग केले होते पण काहीही फायदा झाला नाही, असे अनेक शंका/प्रश्न  उपस्थित करणाऱ्यांनी मला अप्रत्यक्ष प्रोत्साहन दिले.

माझ्या या संकल्पनेस व सदर उपक्रम उत्तमरीत्या संपन्न करण्यासाठी, आपण सर्वांनी दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल व विविध माध्यमातुन दिलेल्या असंख्य  शुभेच्छांबद्दल,  मी पुनश्च आपला आभारी आहे.
Without your support and generosity I would not have been complete this task. Thanks (भावना व्यक्त करायला इंग्लिश जरा बरी पडते म्हणुन आपलं थोडंss...........!!)


असाच लोभ भविष्यातही असु द्या, धन्यवाद!

आपला स्नेहांकित 
सौरभ लक्ष्मण कुंभार