Thursday, June 1, 2023

नियमित तपासा, कोरोना थांबवा, सुरक्षित रहा.

 नियमित तपासा, कोरोना थांबवा, सुरक्षित रहा.

आवर्जून झोप, हात धुवा, कोरोना लाथावा.
सारंगीचे अंतर, घरात रहा, सुरक्षित व्हा.
आवर्जून ट्राफिक, आदर्श नगरीक, कोरोना विरोधीक.
मास्क लावा, सावध राहा, सुरक्षित रहा.
आपले करोनाविरुद्ध लढा, घरात रहा, सेवा करा.
दूरी ठेवा, हात धुवा, कोरोना विरोधी बना.
संघर्षात समोर आहोत, कोरोनावर जिंका.
आपले सुरक्षिततेला आपला दायित्व.
कोरोना रोगाच्या जंगात विजयी रहा.
आपली सुरक्षा आपल्याच हातात.
आपलं सुरक्षित आणि स्वस्थ जीवन, कोरोनापासून मुक्त.
कोरोनाची लढाई, घरी रहा, सुरक्षित रहा.

संगणकाचे ज्ञान असणे ही काळाची गरज बनली आहे!

 संगणकाचे ज्ञान वापरणे आणि त्यावर अधिकारीत असणे आपल्या काळाची आवश्यकता आहे. संगणकांच्या ज्ञानाचा वापर विविध क्षेत्रांमध्ये लागू केला जातो, जसे की वैज्ञानिक अनुसंधान, व्यावसायिक वापर, राष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक विकास, माहितीप्रवाह, संगणक सुरक्षा, विज्ञान आणि प्रौद्योगिकी, सामाजिक न्याय, आणि इतर अनेक व्यावसायिक आणि सार्वजनिक उपयोगांमध्ये.

संगणकांच्या ज्ञानाने आपल्याला तंत्रज्ञान, डेटा विश्लेषण, कम्प्यूटर प्रोग्रामिंग, मशीन लर्निंग, संगणक सुरक्षा, सोशल मीडिया विश्लेषण, बिग डेटा, वेब विकास, क्लाउड कंप्यूटिंग, आणि इतर नवीनतम टेक्नोलॉजींसाठी सुरक्षित प्रवेश मिळतो.

या आधुनिक युगात संगणकाचे ज्ञान महत्वाचे आहे, कारण ते संगणकांच्या विकासाचा आणि प्रगतीचा मुख्य आधार आहे. संगणकांचे ज्ञान देशांच्या विकासासाठी आवश्यक आहे आणि त्यामुळे तंत्रज्ञान, आईटी सेक्टर, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, डाटा साइंस, संगणक सुरक्षा, इंटरनेट, अंतराष्ट्रीय व्यावसायिकता, आणि इतर क्षेत्रांमध्ये नवीनतम उपक्रमांसाठी अपार संधी प्रदान करतो.

तसेच, संगणकांचे ज्ञान वापरण्याचे उदाहरण स्वतंत्रतेचे वापर असलेले आहे. स्वतंत्रतेचे वापर करून आपल्याला स्वतंत्रपणे सोयीसीई, आपल्या आपत्तिजन्य समस्यांना उपवास, बैंकिंग, ऑनलाइन व्यवसाय, आणि डिजिटल मार्केटिंग मध्ये तुमचे क्षमतेचे वापर करावे लागते.

आपल्या काळात संगणकांचे ज्ञान असणे हे अत्यंत महत्वाचे आहे आणि आपण त्याचा वापर आणि अध्ययन करून त्याची गरज पूर्ण करू शकता. अधिक माहितीसाठी, आपण आपल्या ठिकाणीसी उपलब्ध असलेल्या संगणक शिक्षण संस्था किंवा ऑनलाइन संसाधनांना संपर्क साधून त्याबद्दल माहिती घेऊ शकता.

Saturday, January 1, 2022

ALL ABOUT MS-CIT | एमएससीआयटी म्हणजे काय?



मित्रांनो! साधारणता कंप्यूटर हे सर्वांनाच माहिती आहे. आजच्या आधुनिक काळामध्ये तर लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच कम्प्युटर येणे अनिवार्य आहे. एम.एस.सी.आय.टी हादेखील कम्प्युटर संबंधीचा एक कोर्स आहे ज्यामध्ये कम्प्युटर च्या संबंधित सर्व काही माहिती आणि कम्प्युटरचे ज्ञान दिले जाते. आजच्या लेखामध्ये आपण एमएस-सीआयटी म्हणजे काय? आणि All about MS-CIT पाहणार आहोत.

What is MS-CIT | एमएस-सीआयटी म्हणजे काय? 

MS-CIT म्हणजेच “Maharashtra state Certificate in Information Technology”, MS-CIT चा मराठी मध्ये अर्थ होतो की “महाराष्ट्र स्टेट सर्टिफिकेट इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी”. 

एमएस-सीआयटी हा कोर्स कॉम्प्युटर शिकण्यासाठी अलीकडे मोठ्या प्रमाणात पसंत केला जातो. बहुतेक विद्यार्थी दहावीचे पेपर झाल्यानंतर निश्चितपणे एमएस-सीआयटी हा कोर्स करतातच. 

MS-CIT full form in Marathi: “Maharashtra state Certificate in Information Technology”. एमएस -सीआयटी हा एक कम्प्युटरचा रिलेटेड कोर्स आहे जो महाराष्ट्र शासनामार्फत घेतला जातो. या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना किंवा हा कोर्स करणारा प्रत्येक व्यक्तीला कंप्यूटर कसे चालवावे यापासून कंप्यूटरमध्ये असलेल्या विविध फंक्शन ची माहिती शिकवली जाते. एमएस-सीआयटी हा कम्प्युटरचा बेसिक लेवलचा कोर्स आहे. साधारणता आठवी नंतरचे सर्व विद्यार्थी हा कोर्स निश्‍चितपणे करतातच. कम्प्युटर संबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हा कोर्स फायद्याचा ठरतो. सोबतच महाराष्ट्र शासनाचे एमएस-सीआयटीचे मिळणारे सर्टिफिकेट हे भविष्यामध्ये फायद्याचे ठरते. काही विद्यार्थी एमएस-सीआयटी हा कोर्स करून नोकरीसुद्धा करतात. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला एमएस-सीआयटी हा कोर्स खूप फायद्याचा ठरतो. 

MS-CIT कोर्स साठी आवश्यक य पात्रता: 
साधारणत: एमएस-सीआयटी हा कोर्स कोणालाही करता येतो. शालेय विद्यार्थ्या पासून ते पदव्युत्तर विद्यार्थ्यांपर्यंत सर्वजण एमएस-सीआयटी हा कोर्स करण्यासाठी पात्र ठरतात. तसेच अन्य कोर्स प्रमाणे एमएस-सीआयटी हा कोर्स साठी कुठल्याही अटी आणि नियम नाहीत. एमएस-सीआयटी हा कोर्स साधारणत: दोन ते तीन महिन्यांचा असतो. जर एखाद्या अकॅडमी मध्ये एमएस-सीआयटी हा कोर्ससाठी एखाद्या विद्यार्थ्याला वैयक्तिकरित्या दोन ते तीन तास दिले जातात, तेव्हा हा कोर्स तीन महिन्यांमध्ये पूर्ण होऊ शकतो. अन्य कोर्सेस सारखे ह्या कोर्सला काही अटी नाहीत कि तुमचा हेच बॅकग्राऊंड पाहिजे किंवा इतके शिक्षण झालेले पाहिजे. MS-CIT मुळातच तुम्हाला काँप्युटरचे मूलभूत गोष्टी (Basics) शिकवतो. त्यामुळे जे कोणी काँप्युटर शिकण्यासाठी इच्छुक असेल तो MS-CIT हा कोर्से करू शकतो. 

MS-CIT कोर्से करण्यासाठी मला काँप्युटर चालवता येणे अनिवार्य आहे का?  नाही.
MS-CIT कोर्से करण्यासाठी तुम्हाला काँप्युटर चालवता येणे अनिवार्य नाही. मुळातच ह्या कोर्से मध्ये तुम्हाला काँप्युटर कसे चालवायचे ते शिकवतात. MS-CIT कोर्सच्या अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला काँप्युटर चालू करण्यापासून ते काँप्युटर professionally कसे वापरायचे ते शिकवतात. त्यामुळे जर तुम्हाला काँप्युटर चालवता येत नसेल तरीही तुम्ही MS-CIT हा कोर्से करू शकता. 

MS-CIT कोर्से कुठून करावा? 
MS-CIT कोर्से शक्यतो ऑफलाईन माध्यमाने MS-CIT अधिकृत सेन्टर्स मध्ये घेतला जातो. जवळ जवळ सगळ्याच शहरांमध्ये आणि गावांमध्ये MS-CIT अधिकृत प्रशिक्षण केंद्र असतात. प्रशिक्षण अधिकृत संस्थेमार्फतच करा. तिथून तुम्हाला MS-CIT कोर्से करता येतो. एका शहरात किंवा एका गावात एका पेक्षा जास्त MS-CIT प्रशिक्षण केंद्र असू शकतात. त्यामुळे तुम्हाला कोणत्या प्रशिक्षण केंद्रमध्ये MS-CIT कोर्से करायचा ते तुम्ही तुमच्या सोयी नुसार ठरवू शकता. हे जाणून घेणे महत्वाचे आहे कि प्रत्येक सेन्टर मध्ये वेगळे वेगळे शिक्षित असतात. वेगवेगळे शिक्षक म्हणजे शिकवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती, त्यामुळे तुम्ही तुमच्या आसपास ज्या लोकांनी MS-CIT कोर्से केलेला आहे त्यांच्याकडून हि माहिती घेऊ शकता कि कोणत्या सेन्टर मध्ये चांगले शिकवले जाते. हे सुर्वेक्षण केल्यांनतर आपण कोणत्या सेन्टर मध्ये MS-CIT कोर्से करायचा ते ठरवू शकता. अश्या प्रकारे तुम्ही तुमचे MS-CIT सेन्टर निवडू शकता जेणे करून तुम्हाला काँप्युटरचे शिक्षण नीट घेता येईल. 

MS-CIT कोर्सेचा कालावधी किती असतो? 
MS-CIT हा २ महिन्याचा कोर्से असतो. २ महिने तुमचे रोज २ ते ३ तास क्लास घेतले जातात. क्लास मध्ये तुमची थेअरी आणि प्रॅक्टिकल्स घेतले जातात. क्लाससाठी वेगवेगळ्या बॅच असतात. तुम्ही चौकशी करायला गेल्यावर तुम्हाला कोणती बॅच घ्यायची आहे त्याचे पर्याय तुम्हाला दिले जातात. तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुमची बॅच निवडू शकता. शक्यतो विद्यार्थी उन्हाळाच्या सुट्टीमध्ये MS-CIT कोर्सेचा क्लास लावतात. जर तुम्ही उन्हाळ्यात MS-CIT कोर्सेचा क्लास लावत असाल आणि जर सेन्टर तुमच्या घरापासून लांब असेल तर सकाळची किंवा संध्याकाळची बॅच घेणे जोग्या असेल जेणे करून तुम्ही उन्हाचा प्रवास टाळू शकतात. 

MS-CIT कोर्से पूर्ण करण्यासाठी किती पैसे लागतात? 
MS-CIT कोर्सची फी ४,५०० रुपये इतकी आहे. जर तुम्ही एका हफ्त्यामध्ये फी भरली तर तुम्हाला ४,५०० रुपये फक्त लागतात पण जर तुम्ही २ हफ्त्यामध्ये फी भरणार असाल तुम्हचा पहिला हफ्ता २३५० रुपये आणि दुसरा हफ्ता २३५० रुपये, म्हणजेच पूर्ण ४,७०० रुपये फक्त इतका खर्च येतो. MS-CIT कोर्सेसाठी इतर काही खर्च येत नाही. तुम्ही जेवढी फी भरतात तीच तुमची एकमेव गुंतवणूक असते. तुम्हाला याच फी मध्ये MS-CIT कोर्सचा अभ्यास करण्यासाठी पुस्तक पण दिले जाते. 

MS-CIT कोर्से करतांना काँप्युटर घेणे गरजेचे आहे का?  नाही. 
MS-CIT कोर्से करतांना काँप्युटर घेतलेच पाहिजे असा काही नाही. मुळातच तुम्ही जिथे क्लास लावणार आहेत तिथे सगळं काँप्युटरवरच शिकवतात. क्लास मध्ये खूप कॉम्प्युटर्स असतात, तुमचा सुरवातीला थेअरी क्लास घेतला जातो आणि नन्तर तुम्हाला त्या कॉम्प्युटरवर प्रॅक्टिस करायला दिले जाते. पण जर तुम्हाला जास्त प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्ही काँप्युटर घेऊ शकता. पण फक्त MS-CIT कोर्से करताय आणि कोर्सेसाठी काँप्युटर लागणार आहे आणि घावेच लागेल म्हणून घेताय तर काँप्युटर घेऊ नका. जर तुम्हाला काँप्युटरची गरज असेल तर काँप्युटर नक्की घ्या. काँप्युटरचे फायदे खूप आहेत. आजकाल काँप्युटरचा उपयोग सगळ्या ठिकाणी होतो. 

MS-CIT कोर्सेमध्ये मला काय शिकवले जाईल? 
MS-CIT कोर्सेमध्ये तुम्हाला काँप्युटर बद्दल भरपूर काही शिकवले जाते. सीआयडी कोर्स मध्ये सुरुवातीला कम्प्युटर चे बेसिक ज्ञान दिले जाते. कम्प्यूटर च्या विविध भागांची ओळख करून दिली जाते. तसेच कम्प्युटर कसे चालू करायचे कसे बंद करायचे याची देखील माहिती दिली जाते. त्यानंतर एम.एस.सी.आय.टी या कोर्स मध्ये पुढील प्रमाणे अभ्यासक्रम घेतला जातो. एम.एस.सी.आय.टी या संपूर्ण कोर्समध्ये थेर (Theory), प्रॅक्टिकल (Practical) आणि ERA शिकविले जाते. 

MS-CIT कोर्सेच्या अभ्यासक्रमामध्ये खाली दिलेली धडे आहेत: 
    • काँप्युटर काय आहे? त्याचे बेसिक, त्याचे उपयोग. 
    • काँप्युटरचे भाग, ते कसे वापरतात, ते काय काम करतात? 
    • काँप्युटर व्यवस्थित चालू कसे करायचे? त्याला परत व्यवस्थित बंद कसे करायचे? 
    • काँप्युटर कसे वापरतात? काँप्युटर कश्यासाठी वापरतात? 
    • मायक्रोसॉफ्ट पैंटब्रश कसे वापरतात? 
    • मायक्रोसॉफ्ट वर्ड कसे वापरतात? (MS वर्ड हे एक काँप्युटरवर खूप जास्त वापरलेले सॉफ्टवेअर आहे) 
    • मायक्रोसॉफ्ट एक्सेल कसे वापरायचे? त्याचे बेसिक, फॉर्मूलास कसे वापरायचे? (MS एक्सेल हा देखील                 काँप्युटरवर खूप जास्त वापरले जाणारे सॉफ्टवेअर आहे.) 
    • इंटरनेट काय आहे? ते कसे वापरायचे? इंटरनेट कसे चालते? 
    • Window 7 किंवा Window 10. 
    • Internet. 
    • MS-Word 2013. 
    • MS-Excel 2013. 
    • MS-PowerPoint 2013. 
    • MS-Outlook. 
    • ERA. 
    • Theory हे MS-CIT कोर्समध्ये शिकवले जाणारे काही महत्वाचे विषय आहेत. 
    (लक्षात ठेवा कि हि फक्त काही धडे आहेत, यापेक्षा जास्त शिकवले जाते MS-CIT कोर्समध्ये.) 

MS-CIT कोर्सेसाठी काही विकल्प आहे का?  हो. 
MS-CIT कोर्सेसाठी भरपूर विकल्प आहेत. जर तुमचे उद्देश काँप्युटर शिकणे असेल तर ऑनलाइन खूप अश्या वेबसाइट्स आहेत ज्या तुम्हाला काँप्युटर बद्दल सर्व काही शिकवतात. जर तुमचा पारंपरिक शिक्षण पद्धतीवर जास्त विश्वास असेल किंवा तुम्हाला असेल वाटत असेल कि घर बसून तुम्ही काँप्युटर शिकू शकत नाही तर MS-CIT कोर्सेचे कलासीस लावणे योग्य निर्णय आहे. 

MS-CIT कोर्स केल्यावर मला जॉब भेटू शकतो का? 
MS-CIT कोर्स हा तुम्हाला कॉम्पुटरचे बेसिक शिकवतो. नुसता MS-CIT कोर्से केलेला आहे म्हणून तुम्हाला कोणी जॉब देणार नाही. MS-CIT कोर्सचा उपयोग तुम्हाला जॉब मुलाखतीच्या वेळेस होऊ शकतो. तुम्ही तुमच्या बायो- डेटा मध्ये हे दाखवू शकता कि तुम्ही MS-CIT कोर्से केलेला आहे आणि तुम्हाला कंप्युटर वापरता येते. MS-CIT कोर्सेचा दुसरा फायदा म्हणजे तुम्हाला कंप्युटर कसे चालवावे ते कळते. तुम्ही तुमच्या स्किल्सचा वापर करून ऑनलाइन पैसे कमाऊ शकता. आजकाल ऑनलाइन पैसे कमावणे खूप सोपे झालेले आहे. 

MS-CIT कोर्स केलाच पाहिजे का? 
शासकीय नोकरी करिता जर कोणी प्रयत्न करीत असेल किंवा शासकीय नोकरी मध्ये असेल तर हा कोर्स करणे अनिवार्य आहे. आता तर नवीन MS-CIT मध्ये पहिल्या दिवशी पासूनच विविध कोशल्ये सोप्या पद्धतीने शिकविली जातात, जसे की आधार कार्ड डाऊनलोड करणे, इलेक्ट्रिसिटी बिल भरणे, फोन बिल, मोबाईल रिचार्ज, जन्म मृत्यू दाखला काढणे, या प्रकारच्या शेकडो कोशल्यावर आधारित हा कोर्स असून या द्वारे विदयार्थी स्वतःच्या पायावर आत्मविश्वासाने उभा राहू शकतो.

MS-CIT अधिक फायदे
# शासनाच्या GR नुसार शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना *MS-CIT* अनिवार्य आहे.
#डिप्लोमा इंजिनीअरिंग साठी प्रवेश घेणाऱ्या विध्यार्थ्यांना CMF ह्या विषयाचा पेपर द्यावा लागत नाही.
जर तुम्हाला जॉब करायचाय, तर तुम्हाला कॉम्पुटर बद्दल माहिती असणे खूप गरजेचे आहे कारण आजकाल सगळीकडेच कॉम्पुटरचा वापर केला जातो. बऱ्याच वेळा असे होते की जॉब मुलाखतीला गेल्यावर तुम्हाला कॉम्पुटर वापरता येत नाही म्हणून रिजेक्ट केले जाते. हे टाळण्यासाठी तुम्हाला कॉम्पुटर वापरता येणे गरजेचे आहे. पण कॉम्पुटर वापरता यावे यासाठी MS-CIT कोर्स केलाच पाहिजे असा काही नाही. 

ओनलाईन MS-CIT करू शकतो का आणि इतर संकेतस्थळ व फायदा काय?
हो तुमच्या करिता ओनलाईन MS-CIT हा पर्याय उपलब्ध आहे.

तुम्ही दुसऱ्या पद्धतीने सुद्धा कॉम्पुटर शिकू शकता. जसे मी सांगितले, खूप संकेतस्थळांवर संगणक कसे वापरायचे याची माहिती दिली जाते. असा पण आहे कि MS-CIT केल्यामुळे तुम्हाला कॉम्पुटर वापरता येत याचा प्रूफ म्हणून तुम्ही MS-CIT चे सर्टिफिकेट वापरू शकता. 

पण हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे कि ओनलाईन संकेतस्थळावरून कोर्से केल्यावर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर त्याचे निवारण करण्यासाठी वेळ लागू शकतो किंवा एखांद्यावेळेस निवारण होणार पण नाही.(?) 

ओनलाईन MS-CIT प्रशिक्षण घेत असताना काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही जवळील  MS-CIT प्रशिक्षण केंद्रात जाऊन आपल्या शंकेचे निरसन करू शकता.

पण जर तुम्ही MS-CIT क्लास लावत असाल आणि तुम्हाला काही अडचण आली तर क्लासचे शिक्षक तुम्हाला मदत करतात. जर घरी अभ्यास करतांना काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही दुसऱ्या दिवशी क्लासला गेल्यावर आपले प्रश्न विचारू शकता. 

करा डिजिटल दुनियाची सफर...
ऑफिस कामासाठी उपयोगी
वेगवेगळ्या ट्रिक्स , टिप्स आणि रोजच्या वापरण्यात येणाऱ्या डिजिटल टूल्ससाठी आजच
जॉईन करा  *MS-CIT*

उपरोक्त माहिती हि इतर वेबसाईट व माहितीच्या आधारे संकलित केलेली आहे. अधिक माहितीसाठी नजीकच्या MS-CIT प्रशिक्षण केंद्रात माहिती घेऊ शकता किवा https://mscit.mkcl.org/ या संकेतस्थळाला भेट द्या.


हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आवश्य शेअर करा. धन्यवाद!

Saturday, September 11, 2021

संगणकाचे ज्ञान असणे ही काळाची गरज बनली आहे!

संगणकाचे ज्ञान असणे ही काळाची गरज बनली आहे! 
२१ वे शतक हे तंत्रज्ञानाचे शतक मानले गेले आहे! संगणक ही तंत्रज्ञानाचा एक अविष्कार आहे!आज प्रत्येक क्षेत्रात संगणकाचा मुक्त वापर होतांना दिसतो! संगणकाच्या वापरामुळे अनेक अवघड आणि वेळखाऊ कामे सुलभ झाली आहेत! आपल्या दैनदिन व्यवहारात,रिजवेशन, हॉस्पिटल, शाळा, बँका, हॉटेल्स, व्यापारी प्रतिष्ठाने, कारखाने, सेवा क्षेत्र, कृषी क्षेत्र, रुग्णालये, सरकारी-खाजगी कार्यालये सगळीकडे संगणकाचा वापर केला जातो. बऱ्याचदा आपल्याला हवी असलेली माहिती व कागदपत्रे संबधित कार्यालयात व्यक्तीशः न जाता इंटरनेटच्या माध्यमातून संगणकावर सहज उपलब्ध होतात. परीक्षेचे व नोकरीचे अर्ज भरण्यापासून त्याच्या निकालापर्यंत सर्व गोष्टी इंटरनेटवर उपलब्ध होत असतात. याकरिता संगणकाचे शिक्षण घेणे अतिशय महत्वाचे आहे. पूर्वी ज्याला अक्षर कळत नसे त्यालाच निरक्षर म्हटले जाई, आता मात्र ज्याला संगणक वापरता येत नाही त्यालाही निरक्षरच मानले जाते, इतका संगणकाचा प्रभाव वाढला आहे. संगणकाचे शिक्षण घेऊन त्याचा व्यवसाय वा नोकरी म्हणून निवड केलेले कित्येक लोक कमालीचे यशस्वी झालेले आढळतात. अनेकांनी देश-विदेशात ‘तगड्या’ पगाराच्या नोकऱ्यादेखील मिळविल्या आहेत. म्हणूनच संगणकाचे ज्ञान असणे ही काळाची गरज बनली आहे 

अधिक माहितीसाठी MS-CIT सेंटरशी संपर्क करा किंवा भेट द्या:https://skcomputers-theinstitute.business.site 
Please Click our Services https://wa.me/c/919860000045 * 

*एस. के. कॉम्प्युटर्स*  
(महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे (MKCL) अधिकृत संगणक प्रशिक्षण केंद्र)* 
 *“पित्रुपुण्य़ाय” १८/२०, उषःक़ाल हौसिंग सोसा. (पोस्टल कॉलनी), 
महंमदवाडी पोलीस चौकीसमोर, तरवडेवस्ती, महंमदवाडी, पुणे – ४११०६०.* 
 9860000045* * : 9860000045* * : 
https://skcomputers-theinstitute.business.site* 
https://maps.app.goo.gl/4ok8jx7n9GAmR66XA* 
https://bit.ly/SKCOMPUTERS* 
sk47210145@gmail.com 
https://bit.ly/3sH7HOk 

 #MSCIT, #SKCOMPUTERS, #hadapsar, #Mohammadwadi, #computertraining,..

Friday, May 1, 2020

घरी राहा सुरक्षित राहा मराठी कोरोन स्लोगन्स

मराठी स्लोगन्स | Marathi Slogans
  • घरी राहा सुरक्षित राहा.
  • स्नेहभाव जोडू, कोरोनाची साखळी तोडू.
  • हस्तांदोनाला दूर सारा, हाथ जोडून नमस्कार करा.
  • बाहेरून आल्यावर हाथ स्वच्छ धुवूया, कोरोना ला दूर पळवूया.
  • मास्क पासून होईल सुरक्षा, बरे आहे ते कोरोना पेक्षा.
  • मैत्री करावी हॅन्डवॉश शी, भीती नसेल कोरोनाची.
  • फक्त एकच नियम पाळा, सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळा.
  • आपली काळजी आपण स्वतः घेऊया, कोरोना ला हरवूया.
  • वेळेवर डॉक्टर जवळ जाऊ, आरोग्याची चाचणी करून घेऊ.
  • स्वतः घरी राहा आणि इतरांनाही सुरक्षित ठेवा.
  • घरी रहा, सुरक्षित रहा | जान है तो जहान है|
  • घरी रहा सुरक्षित रहा आणि कोरोना संसर्ग टाळा .
  • हाथ स्वच्छ धुवून घेऊ, कोरोना आपल्यापासून दूर ठेऊ.
  • आपले हात साबणाने आणि पाण्याने कमीतकमी १५-२० सेकंद धुवा.
  • आपले डोळे, नाक आणि तोंड यांना न धुतलेल्या हातांनी स्पर्श करणे टाळा.
  • आपल्या चेहऱ्याला स्पर्श करणे टाळा. विषाणू आपल्या तोंडातून, नाकातून आणि डोळ्यांद्वारे आपल्या शरीरात शिरतो.
  • लढ्यामध्ये महत्वाचे काम बाजवणारे डॉक्टर, नर्स हॉस्पिटल मधील संपूर्ण कामगार सर्वांना मानाचा सलाम!
  • आपले महाराष्ट्र पोलीस हवालदार आणि सर्व महानगरपालिकेमधील सर्व कर्मचारी वर्ग सर्वांना मानाचा सलाम!
  • सर्वांवर माझी नजर घरात बसा बेफिकार.
  • आजी बाबा घरात बसा
  • आजारी असताना प्रवास करू नका.
  • खोकला किंवा शिंकताना त्यांनी आपले तोंड व नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाकावे. आपली शिंक किंवा खोकला हातावर पडू देऊ नये.
  • पापा घर में रहो, बाहर कोरोना है, सब मिल साथ रहेंगे, किसी को नहीं खोना है
  • फिर मुस्कुराएगा इंडिया... फिर जीत जाएगा इंडिया.
  • गो कोरोना, कोरोना गो
  • पीएमओ का संदेश ।लॉकडॉउन का पालन करें पूरा देश ।।
  • कोरोना से हो बचना ।       आप घर में ही रहना ।।
  • PMO कर रहे दिन रात मेहनत।आप लॉकडॉउन को मन से अपनाना ।।
  • कोरोना को हराना ।आप घर से बाहर मत निकालना।।
  • कोरोना से बचना अति आसान।लॉकडॉउन का पालन अति आसान।।
  • सदा मास्क पहानिये । कोरोना से बचिए  ।
  • राष्ट्र से करते हों प्रेम ।लॉकडॉउन को अपनाए सप्रेम ।।
  • सौ बात की एक बात । अभी कोरोंना के बचाव की करिए बात ।।
  • कोरोना से हो बचना।प्लीज आप घर में ही रहना ।।
  • कोरोना को हो हराना ।आप घर से बाहर मत निकालना ।।
  • हिन्दू मुस्लिम सिख ईसाई।लॉकडाउन में सब सहयोग देना भाई ।
  • ना डॉरें ना घबराए ।लॉकडॉउन में हेल्प करे ।।
  • ना जात ना पात ।लॉकडॉउन में बनो सब एक जात ।।



महाराष्ट्र दिनानिमित्त MKCL चा अभिनव उपक्रम ‘आय.टी.त मराठी, ऐटीत मराठी’ अॅप.

मराठी माणसाने नक्कीच वापरून पहावे असे आय. टी. त मराठी हे अँप मी वापरत आहे. मराठीतून कंम्प्यूटर व स्मार्टफोन वापरायला शिकण्यासाठी खालील लिंकवर जाऊन हे अँप डाऊनलोड करा: https://play.google.com/store/apps/details?id=org.mkcl.solar.itmarathi&hl


महाराष्ट्र दिनानिमित्त MKCL चा अभिनव उपक्रम आय.टी.त मराठीऐटीत मराठी’ अॅप.

१ मे २०२० म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या हीरक महोत्सवी वर्षाची सुरुवात. गेल्या ६० वर्षांत आपले राज्य आणि आपली मराठी भाषा दोन्हीची परिस्थिती बदलली आहे. आज मोबाईलइंटरनेट आणि कंप्यूटर म्हणजेच माहिती तंत्रज्ञानाशिवाय दैनंदिन कामे जवळ जवळ अशक्य आहेतहे आपण अनुभवतो आहोत. अनेक प्रकारच्या डिजिटल उपकरणांवर मराठी भाषा वापरण्याचे प्रमाणही वाढत आहे.

सध्याच्या परिस्थितीत घरी राहून आय.टी. तंत्रज्ञानाचा वापर हा महत्त्वाचाच ठरत आहेहे नक्की.. तरी केवळ भाषेची अडसर या कारणामुळे कोणी यात मागे पडू नये. संगणकावर व स्मार्टफोनवर मराठी भाषेचा वापर व्हावा यासाठी आय.टी.त मराठी’ या अॅपची खूप मदत होऊ शकते

आय.टी.त मराठी या अॅपमधील ठळक उपक्रम:
ü  गुगलचा वापर करून माहिती शोधणे व मराठी टायपिंग करायला शिकणे.
ü  टंकलेखनापेक्षा मोबाईलवर मराठीत बोलून संदेश लिहिणे - Voice Typing
ü  मराठीतून इतर कोणत्याही भाषेत व अन्य कोणत्याही भाषेतून मराठीत भाषांतर करणे  Translate
ü  मराठीतून ई-लर्निंगसाठी वेगवेगळ्या अॅप आणि वेब साईटचा वापर.
ü  मराठीतून दैनंदिन जीवन आणि व्यवस्थापन यासाठी वेगवेगळ्या अॅप आणि वेब साईटचा वापर.
ü  मराठी वर्तमानपत्र ऑनलाईन वाचणेसोशल मीडियावर मराठी वापरणेमराठी भाषकांसाठी विविध उपयुक्त अॅप्स, मराठी ऑडियो बुक्समराठी कवितासंग्रह, मराठी शब्दकोशइ.

विविध आयटी सुविधा, टूल्स व अॅप्स आप मराठी भाषेतून वापरली तरच जागतिकीकरणाच्या काळात मराठी भाषा जगात ऐटीत राहू केल, म्हणून जर आयटी त मराठी (तरच) ऐटीत मराठी’!

www.mkcl.org/itmarathi या लिंकवरून तुम्ही हे अॅप डाऊनलोड करू शकता किंवा आय.टी.त मराठी असे टाईप करून हे अॅप गुगल प्ले-स्टोअररून विनामूल्य डाऊनलोड करू शकता. तसेच www.mkcl.org/marathi या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला याचा लाभ ऑनलाईनही घेता येईल.



महाराष्ट्रदिनानिमित्त सर्वांनी वरील उपक्रमाचा जरूर लाभ घ्यावाही विनंती.

Sunday, April 12, 2020

महावितरण अँपद्वारे मीटर रीडिंग कशी सबमीट करायची याबाबत माहिती

नमस्कार मित्रांनो लॉकडाऊनच्या धर्तीवर महावितरण कंपनीचा SMS आपणास प्राप्त झाला असेल कि संचारबंदीच्या काळात एप्रिल महिन्याचे वीज मीटर रीडिंग होणार नसल्याचे सूचित केले आहे. परंतु महावितरण वेब पोर्टल किंवा महावितरण कंपनीने विकसित केलेल्या अँप च्या माध्यमातून आपण मीटर रीडिंग जमा करू शकता जर आपणास न जमल्यास महावितरण आपणाला सरासरी वीज देयक पाठवून देईल. अधिक माहितीसाठी खाली दिलेली व्हिडीओ लिंक पहा.

https://youtu.be/Rbm-f4ns8zA

सदर व्हिडिओ मध्ये महावितरण अँपद्वारे मीटर रीडिंग कशी सबमीट करायची याबाबत माहिती देण्यात आली आहे. सुरळीत रीडिंग सबमिट करण्यासाठी महावितरण अँपमध्ये रजिस्टर असणे आवश्यक आहे. तसेच आपण गेस्ट लॉगिन द्वारे सुद्धा मीटर रीडिंग सबमिट करू शकता.


सौरभ कुंभार