LIC of India

नमस्कार!

"एलआईसीविमामित्र (licvimamitra)" या माझ्या वेबसाईटवर आपणासर्वांचे हार्दिक स्वागत आहे. 

“बहुतेक लोकांच्या मनात आयुर्विम्याविषयी चुकीच्या कल्पना असतात.  त्यांचे निराकरण केले गेले पाहिजे.”

हा वेबसाईट तयार करण्यामागचा माझा मूळ उद्देश जवळ जवळ सर्व संकेतस्थळ हे इंग्रजी भाषेत असतात "एलआईसीविमामित्र (licvimamitra)" संकेतस्थळ हे पूर्णपणे मराठी असावे व महाराष्ट्रीय जनतेला एलआईसी च्या योजना मराठी भाषेत समजाव्यात त्या उद्देशांनी माझ्या मनातील विचार इतरांपुढे व्यक्त करण्याचे छोटासा प्रयत्न आणि माझी पत्नी भारतीय आयुर्विमा महामंडळा ची विमा प्रतिनिधी आहे. त्यांना विमा व्यवसाय करताना पर्यायाने मलाही आलेल्या अनुभवातून  माहिती समाजापर्यंत पोहोचाव्यात याकरिता वेबस्थळ एक माध्यम बनवायाचा छोटासा प्रयत्न आम्ही करत आहे. सदर वेबस्थळांवरील माहिती विविध माध्यमांतून गोळा केलेली आहे. त्यामुळे वेबस्थळांमधे काही सुधारणा होऊ शकेल. आमचा हा प्रयत्न सर्वांनाच आवडेल असा मला विश्वास वाटतो.

स्नेहांकित,
श्री. सौरभ कुंभार
भारतीय आयुर्विमा महामंडळ

 आयुर्विम्याचे संरक्षण देण्याच्या उद्देशाने स्थापन झालेली कंपनी व आयुर्विमा घेऊ इच्छिणारी व्यक्ती या दोघांमध्ये एखाद्या नक्की केलेल्या काळाच्या समाप्तीनंतर किंवा दरम्यानच्या काळात त्या व्यक्तिचा मृत्यू झाल्यास, संबंधित व्यक्तिच्या वारसदारास अगोदर मान्य केल्याप्रमाणे ठराविक रक्कम देण्याचा करार म्हणजे आयुर्विमा. मृत्युमुळे उद्भवलेल्या समस्येमुळे निर्माण होणार्या परिस्थितीवर काढलेला एक अंशतः तोडगा.
प्रत्येक माणसाच्या जीवनकाळात येणार्या दोन अडचणींशी तो विशेष संबंधित असतो. एक म्हणजे आपल्यावर अवलंबून असणारे कुटुंब मागे ठेऊन झालेला आपला मृत्यू, किंवा कोणताही आधार नसताना आलेलं वार्धक्य.

No comments:

Post a Comment