Wednesday, December 30, 2015

सौर उर्जेचा वापर करणेबाबत प्रचार व प्रसार मोहीम सांगता

अपुरया विजेच्या संकटापासून वाचवण्यासाठी जगभर चालू असलेल्या चळवळीत, पर्यावरणास पूरक अशा साधनसंपत्तीचा जास्तीत वापर करून, माझा खारीचा वाटा म्हणून हातभार लागावा, विजेची बचत व काही प्रमाणात निर्मिती व्हावी, केवळ या उद्देशानेच, अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत म्हणून ओळख असलेल्या सौर ऊर्जाचा वापर शासकीय कार्यालयात व्हावा यासाठी मी, सौरभ लक्ष्मण कुंभार आणि माझा मित्र श्री संतोष खोमणे यांना सोबत घेऊन महाराष्ट्रातील ३४ जिल्हा मुख्यालयास दुचाकीवरून भेट देऊन शासकीय कार्यालयात व त्यांच्या संलग्न संस्थेत सौर उर्जेचा वापर करणेबाबत प्रचार व प्रसार करण्याचे नियोजन दि. १ डिसेंबर २०१५ ते ३१ डिसेंबर २०१५ कालावधीत केले होते. या प्रवासात जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद त्यांच्या अखत्यारीत असलेल्या शासकीय कार्यालयात सौर उर्जेचा (विशेषतः छतावरील सौर ऊर्जा - नेट मीटरींग) वापर करुन विजेच्या बाबतीत कार्यालये स्वयंपूर्ण करणेबाबत निवेदन सादर केले आहे.

एकूण ५१०० किलोमीटर प्रवास, ३४ जिल्हा मुख्यालयास भेटी, लोकांशी प्रत्यक्ष, भेटीगाठी घेऊन स्थानिक पातळीवर आघाडीवर असलेले दैनिक वृत्तपत्र/आवृत्ती यामध्ये सौर ऊर्जेचा वापर करणेबाबत व माझ्या उपक्रमाबद्दल प्रसिद्धी देऊन जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. जिल्हा स्तरावरील शासकीय अधिकारी, मित्रपरिवार, सहकारी यांनी आमच्या या उपक्रमाचे कौतुक केले आणि उपक्रमास वेळोवेळी प्रोत्साहन मिळात गेले, त्यामुळेच मी हा उपक्रम अत्यंत यशस्वीरीत्या पूर्ण केला. काही उत्तम विधायक व समाजोपयोगी कार्य करताना व अगोदर कधी न भेटलेल्यांनी एकत्र येऊन, आमच्या या उपक्रमास मदत करणे, हा अनुभव माझ्याकरिता खुपच प्रेरणादायी होता. महिनाभर दुचाकीवरून केलेला प्रवास आणि  दरम्यानच्या भेटीगाठी हे अत्यंत आनंददायी अनुभव होते.

ज्या शासकीय अधिकाऱ्यांशी मी भेटलो, निवेदने सादर केली, त्यांनी देलेली सकारात्मक प्रतिक्रिया, माझ्या उपक्रामाचे कौतुक तसेच सहकार्य व मार्गदर्शन  केल्याबद्दल सर्व प्रशासकिय अधिकारी वर्गाचे आभार मानतो.

महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण, पुणे यांनी प्रत्राद्वारे माझ्या उपक्रमास शुभेच्छा व जिल्हा स्तरावरील शासकिय यंत्रणानी आम्हास सहकार्य करण्याचे आवाहन  केले व वैयक्तिक स्तरावरही मदत करण्याचे आश्वासन दिले  त्यामुळे मी महाउर्जाचे श्री. हेमंत कुलकर्णी, श्री.हेमंत पाटील, श्री.विकास रोडेश्री.विनोद शिरसाट, श्री.फडके श्री. अभिजीत हिंगे व श्री. जायभाय यांचे सहित समस्त महाऊर्जाचे  शतशः आभारी आहे.

राज्य व जिल्हा पातळीवर आघाडीवर असलेले दैनिक वृत्तपत्र, साप्ताहिक आणि  मासिक यामध्ये लेखन करणारे पत्रकार मित्र, तसेच स्थानिक दुरचित्रवाणीवरून बातम्या प्रसारण करणारे प्रतिनिधी, यांनी माझ्या उपक्रमास व सौर उर्जा वापराबाबत प्रसिद्धी दिल्याबद्दल, मी सर्व माध्यम प्रतिनिधींचे आभार मानतो. त्यामुळेच मला प्रत्यक्षरीत्या अनेक लोकांपर्यंत सौर ऊर्जेचे महत्त्व पोहचवता आले.

जिल्हा स्तरावरील माझ्या खालील मित्रांनी त्यांच्या व्यस्त वेळातुन न कंटाळता केलेल्या सहकार्याबद्दल मनपूर्वक आभार.
नितिन सपकाळ(सातारा)सचिन खांडेकर आणि सागर बाबर(सांगली)प्रदिप  घोडके आणि सचिन पटिल(कोल्हापुर)हार्दिक शिगले(सिंधुदुर्ग), नितिन पडाळकर आणि श्री. जगदीश चव्हाण(रत्नागिरी), निलेश पाटिल(रायगड), विशाल कुंभार (ठाणे आणि पालघर), दुर्गेश मारु, प्रशांत जोशी, मनोहर चव्हाण आणि योगेश पगर(नाशिक आणि नंदुरबार), महेंद्र नेरकर, प्रविण नवले आणि सागर जाधव(धुळे), अरुण कोष्टी, निलेश पाटील, शाम दिक्षित, रितेश माळी- सोयो सिस्टिम्स(जळगाव आणि बुलढाणा), श्रीकांत आणि संदिप(अकोला), किशोर काजळकर आणि श्री. मानकर(अमरावती), सचिन ढोणे आणि सुनिल गुंटे(वर्धा), प्रितेश उचकलवार(नागपुर), सुभाष सतदेव, श्री. तुरस्कर(भंडारा), पुरुषोत्तम बिसेन आणि विनोदकुमार चौधरी(गोंदिया), सुशांत रच्चावार, अनिल कुंटावार, दुर्गेश इंगोले आणि नंदकिशोर नल्लुरवार(गडचिरोली), श्री. दत्ता भाके, संजय कुंभार, हरिश बारे(चंद्रपुर), संदिप फुटाने आणि श्री. राउत(यवतमाळ), गजानन अंभोरे(वाशिम), विशाल(हिंगोली), माधव वाघमारे आणि श्री. दासरी(नांदेड), प्रशांत बेल्लाळे(लातुर), विकास मेटे आणि श्री. शिरपुकर(उस्मानाबाद), गिरिश इप्पाकायल(सोलापुर), श्री. मोमिन(बीड), राजेश पुरी(औरंगाबाद), सागर काळे, निलेश गोरे आणि श्री. विकास साळुंखे (अहमदनगर) आणि पुण्यातील अनेक सहकारी.
जिल्हा स्तरावरील माझ्या मित्रांनी वेळापत्रकानुसार उपक्रमास सहकार्य करण्याकरिता नियोजन केले होते, परंतु नियोजित वेळेच्या अगोदर एक दिवस माझा प्रवास चालला होता त्यामुळे   अनेक माझ्या सहकाऱ्यांना भेटी देता आल्या नाहीत, त्यामुळे त्यांनी मला माफ करावे.
माझ्या या उपक्रमास माझ्या संपुर्ण कुटुंबाकडुनही प्रोत्साहन मिळाले. माझे आई, वडिल, भाऊ, बहिण, पत्नी विशाखा, माझ्या गोड मुली सुरभि आणि स्वानंदि यांनी काहीही कुरबुर न करिता दिलेल्या पाठिंब्यामुळे मी उपक्रम पुर्ण करु शकलो.
प्रवासाचे नियोजन करण्यात मार्गदर्शन केल्याबद्दल, मी श्री. अजय गुप्ते यांचे आभार मानतो. 

सर्वात शेवट श्री. संतोष खोमणे यांनी आदल्या दिवशी हॉस्पिटलमधुन डिस्चार्ज घेतला असताना या संपुर्ण प्रवासात माझी साथ दिली, त्यांच्यामुळे माझा हा महत्वकांक्षी उपक्रम यशस्वी होण्यास मदत झाली.

नियोजन वेळेत पूर्ण होईल का? हे शक्य नाही? अशा उपक्रमातून काहीही साध्य होणार नाही! अनावश्यक खटाटोप आहे! जिल्हांना खरंच भेटी देणार का? यापूर्वी आम्ही असे प्रयोग केले होते पण काहीही फायदा झाला नाही, असे अनेक शंका/प्रश्न  उपस्थित करणाऱ्यांनी मला अप्रत्यक्ष प्रोत्साहन दिले.

माझ्या या संकल्पनेस व सदर उपक्रम उत्तमरीत्या संपन्न करण्यासाठी, आपण सर्वांनी दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल व विविध माध्यमातुन दिलेल्या असंख्य  शुभेच्छांबद्दल,  मी पुनश्च आपला आभारी आहे.
Without your support and generosity I would not have been complete this task. Thanks (भावना व्यक्त करायला इंग्लिश जरा बरी पडते म्हणुन आपलं थोडंss...........!!)


असाच लोभ भविष्यातही असु द्या, धन्यवाद!

आपला स्नेहांकित 
सौरभ लक्ष्मण कुंभार



Saturday, December 12, 2015

MSEDCLhas put on website the net metering procedure and forms.

MSEDCLhas put on website the net metering procedure and forms. http://www.mahadiscom.in/SolarRoofTopNetMetering.shtm.

Wednesday, November 25, 2015

सौर उर्जेचा वापर करणेबाबत प्रचार व प्रसार मोहीम.

मी सौरभ कुंभार गेल्या सहा वर्षापासून मी सौर ऊर्जा क्षेत्रात काम करीत आहे, अपुरया विजेच्या संकटापासून वाचवण्यासाठी जगभर चालू असलेल्या चळवळीतपर्यावरणास पूरक अशा साधनसंपत्तीचा जास्तीत वापर करून, मी माझा खारीचा वाटा म्हणून हातभार लागावा, विजेची बचत व काही प्रमानात निर्मिती व्हावी, केवळ या उद्देशानेच, मी अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत म्हणून ओळख असलेल्या सौर ऊर्जाचा वापर शासकीय कार्यालयात करावा यासाठी मी, सौरभ लक्ष्मण कुंभार आणि माझा मित्र श्री. संतोष खोमणे महाराष्ट्रातील सर्व जिल्हा मुख्यालयास दुचाकीवरून (सर्व सुरक्षेच्या बाबी विचार करुन) भेट देऊन शासकीय कार्यालयात व त्यांच्या संलग्न संस्थेत सौर उर्जेचा वापर करणेबाबत प्रचार व प्रसार करण्याचे नियोजन दि. १ डिसेंबर २०१५  ते ३१ डिसेंबर २०१५ या कालावधीत केले आहे, या प्रवासात मी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद, मुख्य कार्यकारी अधिकारी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या अख्यातरीत असलेल्या शासकीय कार्यालयात सौर उर्जेचा ((विशेषतः छतावरील सौर ऊर्जा - नेट मीटरींग वापर करणेबाबत निवेदन सादर करणार आहे.

नियोजन : साधारणतः ५५०० किलोमीटर दुचाकीवरून प्रवास, ३४ जिल्हा मुख्यालयास भेटी, ५००० लोकांशी प्रत्यक्ष भेटी, ५०००० लोकांशी अप्रत्यक्ष भेटी आणि जिल्हा स्तरावर असलेले सहकार्यांशी भेट घेऊन प्रत्येक जिल्हा स्तरावर सौर ऊर्जेचा वापर करणेबाबत जनजागृती करण्याचा उद्दिष्ट समोर ठेऊन प्रवासाचे नियोजन केले आहे. तसेच स्थानिक वर्तमानपत्रात देखील ज्या उद्दिष्टाने मी प्रवास आखला आहे, ते उद्दिष्ठ आणि प्रवास याबद्दलची बातमी प्रसिद्ध करण्यात येईल. जिल्हा स्तरावरील माझ्या सहकाऱ्यांनां सक्रीय करुन त्यांची मदद मी स्थानिक स्तरावर घेण्याचा मानस आहे, तसेच facebook, whats app, Blog सारख्या सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून सदर संकल्पनेची व सौर ऊर्जा वापरासंदर्भात प्रसिद्धी करणार आहे. कृपया www.saurabhkumbhar.blogspot.in वर काही माहिती मी संग्रहित करुन एकत्रित करण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रत्येक जिल्हा स्तरावर सौर ऊर्जेचा वापर करणेबाबत जनजागृती करण्याचा उद्दिष्ट समोर ठेऊन प्रवासाचे नियोजन
क्र.
तारीख
वार
वेळ
जिल्हा मुख्यालय
1 डिसेंबर 2015
मंगळवार
10:00
सातारा
1 डिसेंबर 2015
मंगळवार
15:00
सांगली
2 डिसेंबर 2015
बुधवार
10:00
कोल्हापूर
2 डिसेंबर 2015
बुधवार
16:00
सिंधुदुर्ग
3 डिसेंबर 2015
गुरुवार
12:00
रत्नागिरी
4 डिसेंबर 2015
शुक्रवार
10:00
अलिबाग
4 डिसेंबर 2015
शुक्रवार
15:00
ठाणे
5 डिसेंबर 2015
शनिवार
10:00
पालघर
5 डिसेंबर 2015
शनिवार
16:00
नाशिक
१०
7 डिसेंबर 2015
सोमवार
12:00
धुळे
११
7 डिसेंबर 2015
सोमवार
15:00
नंदुरबार
१२
8 डिसेंबर 2015
मंगळवार
10:00
जळगाव
१३
9 डिसेंबर 2015
बुधवार
10:00
बुलढाणा
१४
9 डिसेंबर 2015
बुधवार
16:00
अकोला
१५
10 डिसेंबर 2015
गुरुवार
10:00
अमरावती
१६
10 डिसेंबर 2015
गुरुवार
16:00
वर्धा
१७
11 डिसेंबर 2015
शुक्रवार
10:00
नागपूर
१८
11 डिसेंबर 2015
शुक्रवार
15:00
भंडारा
१९
14 डिसेंबर 2015
सोमवार
10:00
गोंदिया
२०
14 डिसेंबर 2015
सोमवार
17:00
गडचिरोली
२१
15 डिसेंबर 2015
मंगळवार
16:00
चंद्रपूर
२२
16 डिसेंबर 2015
बुधवार
12:00
यवतमाळ
२३
16 डिसेंबर 2015
बुधवार
16:00
वाशीम
२४
17 डिसेंबर 2015
गुरुवार
10:00
हिंगोली
२५
18 डिसेंबर 2015
शुक्रवार
16:00
नांदेड
२६
19 डिसेंबर 2015
शनिवार
10:00
लातूर
२७
19 डिसेंबर 2015
शनिवार
16:00
उस्मानाबाद
२८
21 डिसेंबर 2015
सोमवार
13:00
सोलापूर
२९
22 डिसेंबर 2015
मंगळवार
10:00
बीड
३०
22 डिसेंबर 2015
मंगळवार
16:00
परभणी
३१
23 डिसेंबर 2015
बुधवार
11:00
जालना
३२
28 डिसेंबर 2015
सोमवार
10:00
औरंगाबाद
३३
28 डिसेंबर 2015
सोमवार
17:00
अहमदनगर
३४
30 डिसेंबर 2015
बुधवार
10:00
पुणे