इंधनाची
समस्या दिवसेंदिवस तीव्र होत आहे. स्वयंपाकाचा गॅस, कोळसा, पेट्रोल, डिझेल
इ. ज्वलनशील पदार्थाचे साठे संपल्याचे संकेत तज्ज्ञ देत आहेत. अशावेळी सौर ऊर्जेवर
चालणा-या ‘सौरबंब’चा
पर्याय उपयुक्त ठरेल. त्याने इंधनाची 60 ते 70 टक्क्यांनी बचत होईल.
आंघोळीसाठी
बहुतेक कुटुंबातून गरम पाण्याचा वापर केला जातो. हे गरम पाणी करण्यासाठी गावी बंब
अथवा चुलीवर गरम पाणी करण्याची पद्धत आजही अस्तित्वात आहे. तसंच शहरी भागात
इलेक्ट्रिक गिझर, गॅस गिझर अथवा गॅस शेगडीचा
वापर केला जात आहे. पण दिवसेंदिवस इंधनटंचाई, वीजटंचाईची
समस्या गंभीर होताना आपण पाहत आहोत. तसंच इंधनाचे साठे मर्यादित असल्याचेही संकेत
आपल्याला मिळू लागले आहेत. इंधनांवर असलेल्या मर्यादा आणि उपलब्धता यामुळे
स्वयंपाकाचा गॅस, केरोसीन, पेट्रोल, डिझेल
इत्यादींच्या किमती झपाटय़ाने वाढत आहेत. वीजटंचाईचं सावट दूर होईल असं 2003 सालापासून बोललं जात आहे. पण विजेचं भारनियमन वाढलं आणि चौदा तासांपर्यंत
वीज नाहीशी होऊ लागली. त्यामुळे सकाळी आंघोळीसाठी गरम पाणी मिळवण्यात अडचणी समोर
येऊ लागल्या. या सर्व अडचणी सर्वत्रच सारख्या आहेत. त्यामुळे या समस्येवर उपाय आहे
सौरबंब. म्हणजेच सोलर वॉटर हीटर. गेल्या तीन वर्षात गुंतवलेल्या रकमेचा परतावा
मिळून पुढील काळात ही यंत्रणा मोफत सेवा देते.
सूर्य
हा या विषृववृत्तातील ऊर्जेचा महत्त्वाचा स्त्रोत आहे. कधीही वेळ न चुकवता दररोज
उष्णता आणि प्रकाश देण्याचं काम अव्याहतपणे करत आहे. या ऊर्जेचा वापर सर्वासाठी
होऊ शकत असल्यामुळे निरनिराळ्या क्षेत्रात ही ऊर्जा उपयोगी ठरू शकते. आज पारंपरिक
पध्दतीने पाणी गरम करावयाचं झाल्यास एका कुटुंबाला सुमारे 60 किलो लाकूड दर महिन्याला तर एक टन वर्षाला लागतं. एकीकडे जंगलं नष्ट होत
असल्याचं बोललं जातं; पण जंगलतोड थोपवणं मात्र शक्य
होत नसल्याचं दिसून येत आहे. देशाच्या एकूण क्षेत्रफळापैकी 11 टक्के जागेवर जंगल असायला हवं. आजमितीला मात्र 16 टक्के जंगल अस्तित्वात राहिलं आहे. एकीकडे इंधनाची टंचाई तर दुसरीकडे
अपव्यय बघावयास मिळतो. स्वयंपाकाचा गॅस, कोळसा, पेट्रोल, डिझेल
इ. ज्वलनशील पदार्थाचे साठे संपत आल्याचे संकेत तज्ज्ञ देत आहे. आणि म्हणूनच
याप्रसंगी सौरऊर्जेचा पर्याय उत्तम ठरणार आहे. सोलर वॉटर हीटर किंवा सौरबंब सर्व
स्तरातील कुटुंबांना परवडणारं उपकरण असून भौगोलिक स्थितीप्रमाणे सुमारे 70 डिग्री सेल्सिअसपर्यंत पाणी गरम होतं.
सौरबंब प्रणालीमध्ये साधारणपणे दोन प्रकार आहेत:
एफ.पी.सी. Flatt Plate Collector) व ई.
टी. सी. (Evacuated Tubular Collector). पकी एफ.पी.सी.
हा प्रकार वर्षांनुवष्रे वापरला जाणारा व संपूर्णत: भारतीय बनावटीचा सौर बंब आहे.
तर ई.
टी. सी. हा गेल्या काही वर्षांत लोकप्रिय झालेला पण चिनी बनावटीचा सौरबंब आहे.
एफ.पी.सी. हा अधिक मजबूत व जास्त टिकाऊ आहे, पण
त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या तांबे व इतर धातूंमुळे त्याची किंमत थोडी जास्त असते.
तसेच धातूच्या पाइपमुळे पाण्यातील
क्षारांचा परिणाम होऊन प्रणाली कालांतराने बंद पडण्याचा धोका असतो. अर्थात, ठराविक
काळाने हे पॅनल्स साफ केल्यास फारशी अडचण येत नाही.
ई. टी. सी. प्रणाली ही वजनाने हलकी व किमतीला
तुलनेने बरीचशी कमी असते, पण त्याचबरोबर थोडी नाजूकही
असते. तसेच ती काचेच्या नळ्यांची बनविलेली असल्याने जेथे पाणी क्षारयुक्त आहे तेथे
जास्त उपयोगाची ठरते. अर्थात, प्रत्येक प्रणालीचे आपापले गुण
व दोष असल्याने आपली गरज, भौगोलिक परिस्थिती, पाण्याची
गुणवत्ता व सर्वात महत्त्वाचे आपले बजेट, या
सर्व गोष्टींचा विचार करून निर्णय घेणे योग्य!
विजेची राष्ट्रीय बचत व्हावी व पर्यावरणास हातभार
लागावा म्हणून मी माझ्या घराचा गच्चीवर ३० सप्टेबर २०१२ ला २५० लिटर ई. टी. सी.
सौर वॉटर हिटर बसवून घेतला आहे व तेंव्हा पासून आजतागायत आम्हाला २४x३६५
केव्हाही गरम पाणी मिळते. सौर वॉटर हिटर बसवण्यासाठी प्लंबिंग कामासह एकूण खर्च
रुपये २५,०००/-(दरमहाची
गिझर वीज बचत किमान १०००/- पेक्षा जास्त होत आहे) (हे सयंत्र बसविण्यासाठी गच्चीवर
लागणारी जागा १०' x ५') गेल्या
८ वर्षात फक्त एकदाही खर्च आला नाही. बाकी मेंटेनन्स शून्य, फक्त
महिन्यातून एकदा काच स्वच्छ करावी लागते. (काही
वर्षापूर्वी मी केलेल्या गुंतवणुकीची पूर्णपणे वसुली झालेली असून अजूनही पुढील
काही वर्षे निश्चित मला गरम पाणी मिळू शकेल.)
सोलर काचेच्या नळ्यावर पक्षी विष्ठा टाकतात किंवा
नळ्यावर धूळीचा थर बसून पुरेसे ऊन नळ्यांवर पंडत नाही, त्यावेळी
पाणी गरम होण्यास जास्त वेळ लागतो. ( म्हणूनच महिन्यातून एकदा काच पाण्याने धुवून
स्वच्छ करावी लागते).
या मर्यादा लक्षात घेऊन जर ह्या सौर वॉटर हिटरचा
वापर केला तर तुम्हाला चोवीस तास केंव्हाही गरम पाणी तर मिळेलच पण तीन वर्षात केलेला
खर्च भरून निघेल व उर्वरित आयुष्यभर जवळपास मोफत गरम पाणी मिळेल हे नक्की.
मीही, अपारंपारिक
ऊर्जा क्षेत्रात काम करीत असल्याने अपारंपारिक
ऊर्जा वापराबाबत सर्वसाधारण महत्त्व आणि
गांभीर्य मला माहीत आहे.
सौरभ
लक्ष्मण कुंभार
९८६०००००४५