Sunday, April 12, 2020

महावितरण अँपद्वारे मीटर रीडिंग कशी सबमीट करायची याबाबत माहिती

नमस्कार मित्रांनो लॉकडाऊनच्या धर्तीवर महावितरण कंपनीचा SMS आपणास प्राप्त झाला असेल कि संचारबंदीच्या काळात एप्रिल महिन्याचे वीज मीटर रीडिंग होणार नसल्याचे सूचित केले आहे. परंतु महावितरण वेब पोर्टल किंवा महावितरण कंपनीने विकसित केलेल्या अँप च्या माध्यमातून आपण मीटर रीडिंग जमा करू शकता जर आपणास न जमल्यास महावितरण आपणाला सरासरी वीज देयक पाठवून देईल. अधिक माहितीसाठी खाली दिलेली व्हिडीओ लिंक पहा.

https://youtu.be/Rbm-f4ns8zA

सदर व्हिडिओ मध्ये महावितरण अँपद्वारे मीटर रीडिंग कशी सबमीट करायची याबाबत माहिती देण्यात आली आहे. सुरळीत रीडिंग सबमिट करण्यासाठी महावितरण अँपमध्ये रजिस्टर असणे आवश्यक आहे. तसेच आपण गेस्ट लॉगिन द्वारे सुद्धा मीटर रीडिंग सबमिट करू शकता.


सौरभ कुंभार

Tuesday, April 7, 2020

मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत शासन निर्णय

मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत शासन निर्णय



क्लिक : मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना https://youtu.be/-Gsc54Q8b5I क्लिक : अर्ज करा कसा करावा https://youtu.be/c6thItBrvcQ

पारेषण विरहीत सौर कृषीपंप नविन वीज जोडणी करिता अर्जाची प्रक्रिया.

पारेषण विरहीत सौर कृषीपंप नविन वीज जोडणी करिता अर्जाची प्रक्रिया.

  1. महावितरणाच्या वेब पोर्टलवर (https://www.mahadiscom.in/solar) ऑनलाइन अर्ज करावा.
    • सध्याच्या कृषीपंपाकरिता नवीन वीज जोडणीसाठी पैशाचा भरणा करुन प्रलंबित असलेल्या अर्जदाराने फक्त काही अनिवार्य फील्ड, उदा. अर्ज क्रमांक, पैसे भरल्याची पावती क्रमांक, मंजुरी क्रमांक आणि क्षमतेची मागणी इ. तपशील देणे अनिवार्य आहे.
    • नवीन अर्जदार (परंपरागत कृषीपंप नवीन वीज जोडणीसाठी पैशाचा भरणा केलेला नाही) सर्व फील्ड अनिवार्य आहेत म्हणून तपशील भरणे आवश्यक आहे.
  2. ए - 1 फॉर्मवर संपूर्ण माहिती भरावीे सोबत (कागदपत्रांची प्रत अपलोड करावी)
    • 7/12 उतारा प्रत
    • आधार कार्ड
    • कास्ट प्रमाणपत्र (एससी / एसटी लाभार्थींसाठी)
  3. अर्जदाराने ए - 1 फॉर्मवर व घोषणापत्रावर सही करणे आवश्यक आहे.
  4. ऑनलाइन ए - 1 फॉर्म प्राप्त झाल्यापासून 10 दिवसांच्या आत, सर्वेक्षण केल्यानंतर फील्ड ऑफिसमधून डिमांड नोट जारी केले जाईल. जर काही विसंगती आढळली तर त्यानुसार अर्जदाराला कळविण्यात येईल.
  5. डिमांड नोट देय झाल्यानंतर लाभार्थी एजन्सीचे नाव सादर करेल / देईल (केवळ 25000 निविदासाठी लागू आहे).
  6. प्रत्येक टप्प्यावर अर्जदारांना एसएमएसद्वारे कळविण्यात येईल.

क्लिक : मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना https://youtu.be/-Gsc54Q8b5I

 क्लिक : अर्ज करा कसा करावा https://youtu.be/c6thItBrvcQ

मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत लाभार्थी निवडीसाठी पात्रता निकष

 मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत लाभार्थी पात्रता निकष
1. या योजनेत खालीलप्रमाणे नविन तसेच प्रलंबित अर्जदार पात्र राहतील.
o    पैसे भरुन प्रलंबित असलेले अर्जदार (मार्च 2018 पूर्वी ज्यांना एचव्हीडीएस योजनेमध्ये 2.5 लाखांहून अधिक रकमेच्या पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे.)
o    31.03.2018 नंतर सर्व पैसे भरुन प्रलंबित असलेले अर्जदार.
o    01.01.2019 पासून कृषी पंपासाठी सर्व नवीन अर्जदार.
o    2.5 लाखापेक्षा कमी रकमेच्या पायाभूत सुविधा लागणाऱ्या एचव्हीडीएस मधील पैसे भरुन प्रलंबित असलेला व या योजनेमध्ये सहभाग घेण्यास इच्छुक असलेला अर्जदार.
2.    लाभार्थी निवडीसाठी पात्रता निकष
o    सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या शेतकऱ्याकडे शाश्वत जलस्त्रोत उपलब्ध आहे असे सर्व शेतकरी. मात्र अशा शेतकऱ्याकडे पारंपारिक पध्दतीने विद्युत जोडणी झालेली नसावी.
o    5 एकरापर्यंत शेतजमीनधारक शेतकऱ्यास 3 अश्वशक्ती क्षमतेपर्यंत सौर कृषीपंप व 5 एकरापर्यंत जास्त शेतजमीन धारकास शेतकऱ्यास 5 अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषीपंप देय आहे.
o    राज्यातील पारंपारिक ऊर्जेद्वारे विद्युतीकरण न झालेले शेतकरी
o    विद्युतीकरणासाठी वन विभागाची ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसलेले शेतकरी महावितरण कंपनीकडे विद्युत जोडणीसाठी पैसै भरुन ही प्रलंबित असणाऱ्या ग्राहकांपैकी / शेतकऱ्यांपैकी ज्यांना नजीकच्या काळात विद्युत जोडणी मिळणे शक्य नाही असे शेतकरी.
o    अतिदुर्गम भागातील शेतकरी.
o    महाराष्ट्र शासनाच्या सिंचन योजनेअंतर्गत लाभ घेतलेले शेतकरी.
o    वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे, नदी / विहिर / बोअरवेल यांचे शेजारील शेतजमीनधारक शेतकरी या योजनेत पात्र राहतील.
o    सदर योजनेअंतर्गत सौर कृषीपंपासाठी सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्यांकडून 10 टक्के व अनुसूचित जातीच्या / अनुसूचित ़जमातीच्या लाभार्थ्यांकरिता 5 टक्के लाभार्थी हिस्सा म्हणून लाभार्थ्यास भरणे आवश्यक आहे.
o    अटल सोलर योजनेमध्ये अर्जदाराने आधी लाभ घेतलेला नसावा.

क्लिक : मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना https://youtu.be/-Gsc54Q8b5I क्लिक : अर्ज करा कसा करावा https://youtu.be/c6thItBrvcQ

तर्गत माहिती

Thursday, April 2, 2020

CORONA POLICE PERMISSION

• Always carry government approved Identity card you have given in above request. Whenever stopped by police, the concerned person should show their ID card, and kindly cooperate with police on the ground. • You will be liable for prosecution if any false information provided. • This permission is subject to your adherence to various guidelines /orders given by authorities from time to time. • Please note, staying at home is important for your & others health until the lockdown is over. #StayHome #StaySafe • People in quarantine should not apply for Digital Pass, they are requested to #StayHome #StaySafe • आपण वरील विनंतीमध्ये दिलेले शासकीय मान्यताप्राप्त ओळखपत्र नेहमी जवळ बाळगा. पोलिसांनी थांबविल्यास संबंधित व्यक्तीने सदर ओळखपत्र दाखविणे अनिवार्य आहे. कृपया पोलिसांना सहकार्य करावे. • कोणतीही चुकीची माहिती आढळल्यास कायदेशीर कार्यवाही केली जाईल याची नोंद घ्यावी. • सदर परवानगी तसेच वेळोवेळी अधिकाऱ्यांनी दिलेली विविध मार्गदर्शक तत्त्वे / आदेशांचे पालन करणे आपणावर बंधनकारक राहील. • कृपया लक्षात ठेवा, लॉकडाउनची परिस्थिती संपेपर्यंत आपल्या आणि इतरांच्या आरोग्यासाठी आपले घरी रहाणे महत्वाचे आहे. #घरीरहा #सुरक्षितरहा • क्वारंटाईन करण्यात आलेल्या लोकांनी डिजिटल पास साठी अर्ज करू नये. #घरीरहा #सुरक्षितरहा Link for apply Essential Service E Pass : Maharashtra : https://covid19.mhpolice.in/ Pune City : https://punepolice.in/ #Maharashtra police, #Pune Police, #Digital pass, #Emergency Service Pass, #Essential Service Pass, #LockDown Pass,#E-Pass