Saturday, January 1, 2022

ALL ABOUT MS-CIT | एमएससीआयटी म्हणजे काय?



मित्रांनो! साधारणता कंप्यूटर हे सर्वांनाच माहिती आहे. आजच्या आधुनिक काळामध्ये तर लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच कम्प्युटर येणे अनिवार्य आहे. एम.एस.सी.आय.टी हादेखील कम्प्युटर संबंधीचा एक कोर्स आहे ज्यामध्ये कम्प्युटर च्या संबंधित सर्व काही माहिती आणि कम्प्युटरचे ज्ञान दिले जाते. आजच्या लेखामध्ये आपण एमएस-सीआयटी म्हणजे काय? आणि All about MS-CIT पाहणार आहोत.

What is MS-CIT | एमएस-सीआयटी म्हणजे काय? 

MS-CIT म्हणजेच “Maharashtra state Certificate in Information Technology”, MS-CIT चा मराठी मध्ये अर्थ होतो की “महाराष्ट्र स्टेट सर्टिफिकेट इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी”. 

एमएस-सीआयटी हा कोर्स कॉम्प्युटर शिकण्यासाठी अलीकडे मोठ्या प्रमाणात पसंत केला जातो. बहुतेक विद्यार्थी दहावीचे पेपर झाल्यानंतर निश्चितपणे एमएस-सीआयटी हा कोर्स करतातच. 

MS-CIT full form in Marathi: “Maharashtra state Certificate in Information Technology”. एमएस -सीआयटी हा एक कम्प्युटरचा रिलेटेड कोर्स आहे जो महाराष्ट्र शासनामार्फत घेतला जातो. या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना किंवा हा कोर्स करणारा प्रत्येक व्यक्तीला कंप्यूटर कसे चालवावे यापासून कंप्यूटरमध्ये असलेल्या विविध फंक्शन ची माहिती शिकवली जाते. एमएस-सीआयटी हा कम्प्युटरचा बेसिक लेवलचा कोर्स आहे. साधारणता आठवी नंतरचे सर्व विद्यार्थी हा कोर्स निश्‍चितपणे करतातच. कम्प्युटर संबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हा कोर्स फायद्याचा ठरतो. सोबतच महाराष्ट्र शासनाचे एमएस-सीआयटीचे मिळणारे सर्टिफिकेट हे भविष्यामध्ये फायद्याचे ठरते. काही विद्यार्थी एमएस-सीआयटी हा कोर्स करून नोकरीसुद्धा करतात. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला एमएस-सीआयटी हा कोर्स खूप फायद्याचा ठरतो. 

MS-CIT कोर्स साठी आवश्यक य पात्रता: 
साधारणत: एमएस-सीआयटी हा कोर्स कोणालाही करता येतो. शालेय विद्यार्थ्या पासून ते पदव्युत्तर विद्यार्थ्यांपर्यंत सर्वजण एमएस-सीआयटी हा कोर्स करण्यासाठी पात्र ठरतात. तसेच अन्य कोर्स प्रमाणे एमएस-सीआयटी हा कोर्स साठी कुठल्याही अटी आणि नियम नाहीत. एमएस-सीआयटी हा कोर्स साधारणत: दोन ते तीन महिन्यांचा असतो. जर एखाद्या अकॅडमी मध्ये एमएस-सीआयटी हा कोर्ससाठी एखाद्या विद्यार्थ्याला वैयक्तिकरित्या दोन ते तीन तास दिले जातात, तेव्हा हा कोर्स तीन महिन्यांमध्ये पूर्ण होऊ शकतो. अन्य कोर्सेस सारखे ह्या कोर्सला काही अटी नाहीत कि तुमचा हेच बॅकग्राऊंड पाहिजे किंवा इतके शिक्षण झालेले पाहिजे. MS-CIT मुळातच तुम्हाला काँप्युटरचे मूलभूत गोष्टी (Basics) शिकवतो. त्यामुळे जे कोणी काँप्युटर शिकण्यासाठी इच्छुक असेल तो MS-CIT हा कोर्से करू शकतो. 

MS-CIT कोर्से करण्यासाठी मला काँप्युटर चालवता येणे अनिवार्य आहे का?  नाही.
MS-CIT कोर्से करण्यासाठी तुम्हाला काँप्युटर चालवता येणे अनिवार्य नाही. मुळातच ह्या कोर्से मध्ये तुम्हाला काँप्युटर कसे चालवायचे ते शिकवतात. MS-CIT कोर्सच्या अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला काँप्युटर चालू करण्यापासून ते काँप्युटर professionally कसे वापरायचे ते शिकवतात. त्यामुळे जर तुम्हाला काँप्युटर चालवता येत नसेल तरीही तुम्ही MS-CIT हा कोर्से करू शकता. 

MS-CIT कोर्से कुठून करावा? 
MS-CIT कोर्से शक्यतो ऑफलाईन माध्यमाने MS-CIT अधिकृत सेन्टर्स मध्ये घेतला जातो. जवळ जवळ सगळ्याच शहरांमध्ये आणि गावांमध्ये MS-CIT अधिकृत प्रशिक्षण केंद्र असतात. प्रशिक्षण अधिकृत संस्थेमार्फतच करा. तिथून तुम्हाला MS-CIT कोर्से करता येतो. एका शहरात किंवा एका गावात एका पेक्षा जास्त MS-CIT प्रशिक्षण केंद्र असू शकतात. त्यामुळे तुम्हाला कोणत्या प्रशिक्षण केंद्रमध्ये MS-CIT कोर्से करायचा ते तुम्ही तुमच्या सोयी नुसार ठरवू शकता. हे जाणून घेणे महत्वाचे आहे कि प्रत्येक सेन्टर मध्ये वेगळे वेगळे शिक्षित असतात. वेगवेगळे शिक्षक म्हणजे शिकवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती, त्यामुळे तुम्ही तुमच्या आसपास ज्या लोकांनी MS-CIT कोर्से केलेला आहे त्यांच्याकडून हि माहिती घेऊ शकता कि कोणत्या सेन्टर मध्ये चांगले शिकवले जाते. हे सुर्वेक्षण केल्यांनतर आपण कोणत्या सेन्टर मध्ये MS-CIT कोर्से करायचा ते ठरवू शकता. अश्या प्रकारे तुम्ही तुमचे MS-CIT सेन्टर निवडू शकता जेणे करून तुम्हाला काँप्युटरचे शिक्षण नीट घेता येईल. 

MS-CIT कोर्सेचा कालावधी किती असतो? 
MS-CIT हा २ महिन्याचा कोर्से असतो. २ महिने तुमचे रोज २ ते ३ तास क्लास घेतले जातात. क्लास मध्ये तुमची थेअरी आणि प्रॅक्टिकल्स घेतले जातात. क्लाससाठी वेगवेगळ्या बॅच असतात. तुम्ही चौकशी करायला गेल्यावर तुम्हाला कोणती बॅच घ्यायची आहे त्याचे पर्याय तुम्हाला दिले जातात. तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुमची बॅच निवडू शकता. शक्यतो विद्यार्थी उन्हाळाच्या सुट्टीमध्ये MS-CIT कोर्सेचा क्लास लावतात. जर तुम्ही उन्हाळ्यात MS-CIT कोर्सेचा क्लास लावत असाल आणि जर सेन्टर तुमच्या घरापासून लांब असेल तर सकाळची किंवा संध्याकाळची बॅच घेणे जोग्या असेल जेणे करून तुम्ही उन्हाचा प्रवास टाळू शकतात. 

MS-CIT कोर्से पूर्ण करण्यासाठी किती पैसे लागतात? 
MS-CIT कोर्सची फी ४,५०० रुपये इतकी आहे. जर तुम्ही एका हफ्त्यामध्ये फी भरली तर तुम्हाला ४,५०० रुपये फक्त लागतात पण जर तुम्ही २ हफ्त्यामध्ये फी भरणार असाल तुम्हचा पहिला हफ्ता २३५० रुपये आणि दुसरा हफ्ता २३५० रुपये, म्हणजेच पूर्ण ४,७०० रुपये फक्त इतका खर्च येतो. MS-CIT कोर्सेसाठी इतर काही खर्च येत नाही. तुम्ही जेवढी फी भरतात तीच तुमची एकमेव गुंतवणूक असते. तुम्हाला याच फी मध्ये MS-CIT कोर्सचा अभ्यास करण्यासाठी पुस्तक पण दिले जाते. 

MS-CIT कोर्से करतांना काँप्युटर घेणे गरजेचे आहे का?  नाही. 
MS-CIT कोर्से करतांना काँप्युटर घेतलेच पाहिजे असा काही नाही. मुळातच तुम्ही जिथे क्लास लावणार आहेत तिथे सगळं काँप्युटरवरच शिकवतात. क्लास मध्ये खूप कॉम्प्युटर्स असतात, तुमचा सुरवातीला थेअरी क्लास घेतला जातो आणि नन्तर तुम्हाला त्या कॉम्प्युटरवर प्रॅक्टिस करायला दिले जाते. पण जर तुम्हाला जास्त प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्ही काँप्युटर घेऊ शकता. पण फक्त MS-CIT कोर्से करताय आणि कोर्सेसाठी काँप्युटर लागणार आहे आणि घावेच लागेल म्हणून घेताय तर काँप्युटर घेऊ नका. जर तुम्हाला काँप्युटरची गरज असेल तर काँप्युटर नक्की घ्या. काँप्युटरचे फायदे खूप आहेत. आजकाल काँप्युटरचा उपयोग सगळ्या ठिकाणी होतो. 

MS-CIT कोर्सेमध्ये मला काय शिकवले जाईल? 
MS-CIT कोर्सेमध्ये तुम्हाला काँप्युटर बद्दल भरपूर काही शिकवले जाते. सीआयडी कोर्स मध्ये सुरुवातीला कम्प्युटर चे बेसिक ज्ञान दिले जाते. कम्प्यूटर च्या विविध भागांची ओळख करून दिली जाते. तसेच कम्प्युटर कसे चालू करायचे कसे बंद करायचे याची देखील माहिती दिली जाते. त्यानंतर एम.एस.सी.आय.टी या कोर्स मध्ये पुढील प्रमाणे अभ्यासक्रम घेतला जातो. एम.एस.सी.आय.टी या संपूर्ण कोर्समध्ये थेर (Theory), प्रॅक्टिकल (Practical) आणि ERA शिकविले जाते. 

MS-CIT कोर्सेच्या अभ्यासक्रमामध्ये खाली दिलेली धडे आहेत: 
    • काँप्युटर काय आहे? त्याचे बेसिक, त्याचे उपयोग. 
    • काँप्युटरचे भाग, ते कसे वापरतात, ते काय काम करतात? 
    • काँप्युटर व्यवस्थित चालू कसे करायचे? त्याला परत व्यवस्थित बंद कसे करायचे? 
    • काँप्युटर कसे वापरतात? काँप्युटर कश्यासाठी वापरतात? 
    • मायक्रोसॉफ्ट पैंटब्रश कसे वापरतात? 
    • मायक्रोसॉफ्ट वर्ड कसे वापरतात? (MS वर्ड हे एक काँप्युटरवर खूप जास्त वापरलेले सॉफ्टवेअर आहे) 
    • मायक्रोसॉफ्ट एक्सेल कसे वापरायचे? त्याचे बेसिक, फॉर्मूलास कसे वापरायचे? (MS एक्सेल हा देखील                 काँप्युटरवर खूप जास्त वापरले जाणारे सॉफ्टवेअर आहे.) 
    • इंटरनेट काय आहे? ते कसे वापरायचे? इंटरनेट कसे चालते? 
    • Window 7 किंवा Window 10. 
    • Internet. 
    • MS-Word 2013. 
    • MS-Excel 2013. 
    • MS-PowerPoint 2013. 
    • MS-Outlook. 
    • ERA. 
    • Theory हे MS-CIT कोर्समध्ये शिकवले जाणारे काही महत्वाचे विषय आहेत. 
    (लक्षात ठेवा कि हि फक्त काही धडे आहेत, यापेक्षा जास्त शिकवले जाते MS-CIT कोर्समध्ये.) 

MS-CIT कोर्सेसाठी काही विकल्प आहे का?  हो. 
MS-CIT कोर्सेसाठी भरपूर विकल्प आहेत. जर तुमचे उद्देश काँप्युटर शिकणे असेल तर ऑनलाइन खूप अश्या वेबसाइट्स आहेत ज्या तुम्हाला काँप्युटर बद्दल सर्व काही शिकवतात. जर तुमचा पारंपरिक शिक्षण पद्धतीवर जास्त विश्वास असेल किंवा तुम्हाला असेल वाटत असेल कि घर बसून तुम्ही काँप्युटर शिकू शकत नाही तर MS-CIT कोर्सेचे कलासीस लावणे योग्य निर्णय आहे. 

MS-CIT कोर्स केल्यावर मला जॉब भेटू शकतो का? 
MS-CIT कोर्स हा तुम्हाला कॉम्पुटरचे बेसिक शिकवतो. नुसता MS-CIT कोर्से केलेला आहे म्हणून तुम्हाला कोणी जॉब देणार नाही. MS-CIT कोर्सचा उपयोग तुम्हाला जॉब मुलाखतीच्या वेळेस होऊ शकतो. तुम्ही तुमच्या बायो- डेटा मध्ये हे दाखवू शकता कि तुम्ही MS-CIT कोर्से केलेला आहे आणि तुम्हाला कंप्युटर वापरता येते. MS-CIT कोर्सेचा दुसरा फायदा म्हणजे तुम्हाला कंप्युटर कसे चालवावे ते कळते. तुम्ही तुमच्या स्किल्सचा वापर करून ऑनलाइन पैसे कमाऊ शकता. आजकाल ऑनलाइन पैसे कमावणे खूप सोपे झालेले आहे. 

MS-CIT कोर्स केलाच पाहिजे का? 
शासकीय नोकरी करिता जर कोणी प्रयत्न करीत असेल किंवा शासकीय नोकरी मध्ये असेल तर हा कोर्स करणे अनिवार्य आहे. आता तर नवीन MS-CIT मध्ये पहिल्या दिवशी पासूनच विविध कोशल्ये सोप्या पद्धतीने शिकविली जातात, जसे की आधार कार्ड डाऊनलोड करणे, इलेक्ट्रिसिटी बिल भरणे, फोन बिल, मोबाईल रिचार्ज, जन्म मृत्यू दाखला काढणे, या प्रकारच्या शेकडो कोशल्यावर आधारित हा कोर्स असून या द्वारे विदयार्थी स्वतःच्या पायावर आत्मविश्वासाने उभा राहू शकतो.

MS-CIT अधिक फायदे
# शासनाच्या GR नुसार शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना *MS-CIT* अनिवार्य आहे.
#डिप्लोमा इंजिनीअरिंग साठी प्रवेश घेणाऱ्या विध्यार्थ्यांना CMF ह्या विषयाचा पेपर द्यावा लागत नाही.
जर तुम्हाला जॉब करायचाय, तर तुम्हाला कॉम्पुटर बद्दल माहिती असणे खूप गरजेचे आहे कारण आजकाल सगळीकडेच कॉम्पुटरचा वापर केला जातो. बऱ्याच वेळा असे होते की जॉब मुलाखतीला गेल्यावर तुम्हाला कॉम्पुटर वापरता येत नाही म्हणून रिजेक्ट केले जाते. हे टाळण्यासाठी तुम्हाला कॉम्पुटर वापरता येणे गरजेचे आहे. पण कॉम्पुटर वापरता यावे यासाठी MS-CIT कोर्स केलाच पाहिजे असा काही नाही. 

ओनलाईन MS-CIT करू शकतो का आणि इतर संकेतस्थळ व फायदा काय?
हो तुमच्या करिता ओनलाईन MS-CIT हा पर्याय उपलब्ध आहे.

तुम्ही दुसऱ्या पद्धतीने सुद्धा कॉम्पुटर शिकू शकता. जसे मी सांगितले, खूप संकेतस्थळांवर संगणक कसे वापरायचे याची माहिती दिली जाते. असा पण आहे कि MS-CIT केल्यामुळे तुम्हाला कॉम्पुटर वापरता येत याचा प्रूफ म्हणून तुम्ही MS-CIT चे सर्टिफिकेट वापरू शकता. 

पण हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे कि ओनलाईन संकेतस्थळावरून कोर्से केल्यावर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर त्याचे निवारण करण्यासाठी वेळ लागू शकतो किंवा एखांद्यावेळेस निवारण होणार पण नाही.(?) 

ओनलाईन MS-CIT प्रशिक्षण घेत असताना काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही जवळील  MS-CIT प्रशिक्षण केंद्रात जाऊन आपल्या शंकेचे निरसन करू शकता.

पण जर तुम्ही MS-CIT क्लास लावत असाल आणि तुम्हाला काही अडचण आली तर क्लासचे शिक्षक तुम्हाला मदत करतात. जर घरी अभ्यास करतांना काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही दुसऱ्या दिवशी क्लासला गेल्यावर आपले प्रश्न विचारू शकता. 

करा डिजिटल दुनियाची सफर...
ऑफिस कामासाठी उपयोगी
वेगवेगळ्या ट्रिक्स , टिप्स आणि रोजच्या वापरण्यात येणाऱ्या डिजिटल टूल्ससाठी आजच
जॉईन करा  *MS-CIT*

उपरोक्त माहिती हि इतर वेबसाईट व माहितीच्या आधारे संकलित केलेली आहे. अधिक माहितीसाठी नजीकच्या MS-CIT प्रशिक्षण केंद्रात माहिती घेऊ शकता किवा https://mscit.mkcl.org/ या संकेतस्थळाला भेट द्या.


हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आवश्य शेअर करा. धन्यवाद!