सौर वीज यंत्रणा
मी माझ्या घराच्या छतावर दोन १२० वॅट्ची सौर पँनेल्स आणि १२ वोल्ट १०० अम्पीअरची बटरी बसविली आहे व संपूर्ण यंत्रणा १२वोल्ट डीसी वर चालू आहे. त्यापासून सौर उर्जेवर आधारित घरगुती वीज निर्मिती सुरू केली असून त्यावर जिन्यातील व पार्किग मध्ये असे दोन १२ वॅटची एल.ई.डी बल्ब, चार बालकनीत १२ वॅटचे एल.ई.डी. चार दिवे व महावितरण वीज गेल्यावर दिवाणखान्यात व स्वयंपाक घरात पर्यायी दोन १२ वॅटचे दिवे पुर्णपणे सौर उर्जेमार्फत निर्मित विजेवर चालतात. साधारणपणे सायंकाळी ६.३० ते रात्री ११ .३० पर्यन्त असे एकूण ५ तास ही सौर ऊर्जा पुरते. उभारणीसाठी मला एकूण ३०,०००/- रुपये खर्च आला होता व जोडणीचे काम मी स्वतः या क्षेत्रात असल्याने मीच सर्व जोडणी दोन दिवसात केली यामुळे निश्चितच महिन्याला १०० ते १५० रुपयाचा वीज बचतीतून फायदा होत आहे.
भविष्यात नेट मीटरींगच्या माध्यमातून माझ्या घरावर कमीत कामी ३ किलो वॅटचे सौर ऊर्जा पँनेल्स बसवून माझे घर वीजे बाबत स्वयंपूर्ण करण्याचा मानस आहे.
सौर वीज यंत्रणेवरील गुंतवणुकीचा विचार करता साधारणतः गुंतवणुकीवरील परतावा कालावधी खुप जास्त आहे. आज सौर पँनेल्सच्या किमती खुपच बऱ्याच सामान्य माणसाच्या आवाक्यात आलेल्या आहेत, परंतु जशी मागणी वाढेल तश्या किमतीही कामी होतील. सहा वर्षापूर्वी सौर पँनेल्स रु. ९०-१०० रुपये प्रति वॅट मिळत होता आज ४०-४५ रुपये प्रति वॅट बाजारपेठेत उपलब्ध आहेत.
सौरभ कुंभार
९८६०००००४५
No comments:
Post a Comment