Saturday, February 22, 2020

पर्याय स्वंयपाकाच्या गॅसला


पर्याय स्वंयपाकाच्या गॅसला
सबसिडीचे सहा सिलेंडर आणि गॅस च्या किंमतीत दिवसेंदिवस होणाऱ्या भावावाढी मुळे आता स्वंयपाकाच्या गॅस ला पर्याय शोधणं गरजेचं झालं आहे. अद्यावत तंत्रज्ञानामूळे स्वंयपाक घरात नाना प्रकारची उपकरणं आली. कॉफी मेकर, सॅण्डविच मेकर, राईस कुकर, ओव्हन, मायक्रोव्हेव यासारख्या अत्याधुनिक उपकरणांनी स्वयंपाक घरं सजली, तरी स्वंयपाकाच्या गॅसला रास्त आणि स्वस्त पर्यायाविषयी बरेच जण अनभिज्ञ आहेत. काही पर्याय माहीत असले तरी त्याची जुजबी माहीती आणि शंका यामुळे सामान्य माणुस या पर्यायांचा अवलंब करताना कचरतात. परंतु आता सर्वांनाच याची गरज वाटू लागली आहे. सोलार कूकर , इंडक्शन कुकर आणि हॅलोजन कूकर या काही पर्यायांनी आपण गॅस बरोबरच वीज बचत करून स्वादिष्ट अन्न जरुर करु शकतो.
भारतात वर्षभर भरपूर सुर्य प्रकाश उपलब्ध असतो. आपल्या आर्थिक विकासासाठी तसेच घरघुती वापरासाठी आपण या उर्जेचा उपोयोग करु शकतो. सुर्यापासून भारताच्या भुमीवर प्रत्येक चौरसमीटरवर एका तासात सधारपणे ५ ते ७ किलोवॅट इतकी सौर उर्जा उपलब्ध होते. म्हणजेच वर्षभरात ६०,००० अब्ज मेगावॅट अवर इतकी उर्जा विनामुल्य आपल्याला उपलब्ध होते आणि आपण ही उर्जा वाया घालवतो. हीच उर्जा आपण जर सौर उपकरणां मार्फत उपोयोगात आणली तर खर्चिक इंधन आणि विजेचा प्रश्न निकालात निघेल

इंडक्श्न कुकर :
इंडक्श्न कुकर हा विजेवर चालणारा आहे. यात उपकरणात आलेली विज थेट भांड्यात जाते त्यामुळे अन्न पटकन शिजते. यात फक्त कुकरचा भांड्याखालाचा पृष्ठभाग गरम होतो आणि भांड्य़ात ही ज्या पातळी पर्यंत अन आहे, त्या पातळी पर्यंतच भांडे गरम होते. म्हणजेच तुम्ही भांडे हाताने ही उचलू शकता. इडक्श्न कुकर electro magnetic induction technology वर आधारित आहे. इडक्श्न कुकर ला जरी २००० वॅट उर्जा लागत असली तरी त्यावरील अन्न पटकन शिजते त्यामूळे विज बचत होते. उदा. जर २००० वॅट चा इंडक्श्न कुकर १ तास चालला तर तर विजेचे २ युनिट खर्च होतील. आणि जर विजचे दर पर युनिट ६ रुपये पकडला तर २ युनिट साठी आपण १२ रुपये खर्च करतो. या कुकरची स्वछता पटकन करता येते, या कुकरसाठी विशिष्ठ प्रकारची आणी सपाट पॄष्ठ भाग असलेली भांडी वापरावी लागतात. साधारण ३००० ते ४३०० रुपायां पर्यंत इडक्श्न कुकर उपलब्ध आहे. यात बजाज , फिलिप्स यासारखी ब्रॅण्डेड तसेच नॉन ब्रॅण्डेड कंपन्याचे इंडक्श्न कुकर आहेत.
हॅलोजन कुकर :
पाश्चिमात्य देशात सध्या हॅलोजन कुकर च्या नवनवीन रेंज आलेल्या आहेत. भारतात ही हॅलोजन कूकरचा पर्याय उपलब्ध आहेत. हॅलोजन कूकर मध्ये हॅलोजन बल्बचा वापर करण्यात येतो. हॅलोजन बल्ब पटकन तापत असल्याने त्यापासून निर्माण होणाऱ्या उष्णतेने अन्न पटकन शिजते. हॅलोजन कुकर वेगवेगळ्या आकारात उपलब्ध आहे. मायक्रोव्हेव अवन तसेच इडक्शन कूकर सारख्याच आकारात उपलब्ध आहे. यात ही टेमप्रेचर नियंत्रीत करण्याची सोय आहे. साधारणत: २००० रुपायां पासून पूढे हॅलोजन कुकर च्या किंमती आहे
ही नवनवीन उत्पादनांची खरेदी करताना चोखंदळ ग्राहकांनी सर्व बाबींची खातरजमा करणं आवश्यक आहे. उत्पादनांची वॉरन्टी, गॅरन्टी तसेच मॅन्टेन्स कॉस्ट या सर्व गॊष्टींची पडताळणी गरजेचं आहे. याबरोबरच आय. एस. आय. प्रमाणित आणि ५ स्टार चिन्हांकीत उत्पादनेच खरेदी करा.


No comments:

Post a Comment