सौर बंब (सोलर वॉटर हीटर)
आंघोळीसाठी बहुतेक कुटुंबातून गरम पाण्याचा
वापर केला जातो. हे गरम पाणी करण्यासाठी गावी बंब अथवा चुलीवर गरम पाणी करण्याची
पद्धत आजही अस्तित्वात आहे. तसंच शहरी भागात इलेक्ट्रिक गिझर, गॅस गिझर अथवा गॅस शेगडीचा वापर केला जात
आहे. पण दिवसेंदिवस इंधनटंचाई, वीजटंचाईची समस्या गंभीर होताना आपण पाहत
आहोत. तसंच इंधनाचे साठे मर्यादित असल्याचेही संकेत आपल्याला मिळू लागले आहेत.
इंधनांवर असलेल्या मर्यादा आणि उपलब्धता यामुळे स्वयंपाकाचा गॅस, केरोसीन, पेट्रोल, डिझेल इत्यादींच्या किमती झपाटय़ाने वाढत
आहेत. विजेचं भारनियमन वाढलं आणि चौदा तासांपर्यंत वीज नाहीशी होऊ लागली. त्यामुळे
सकाळी आंघोळीसाठी गरम पाणी मिळवण्यात अडचणी समोर येऊ लागल्या. या सर्व अडचणी
सर्वत्रच सारख्या आहेत. त्यामुळे या समस्येवर उपाय आहे सौरबंब. म्हणजेच सोलर वॉटर
हीटर. गेल्या तीन वर्षात गुंतवलेल्या रकमेचा परतावा मिळून पुढील काळात ही यंत्रणा
मोफत सेवा देते.

ई. टी. सी. प्रणाली ही वजनाने हलकी व
किमतीला तुलनेने बरीचशी कमी असते, पण त्याचबरोबर थोडी नाजूकही असते. तसेच ती
काचेच्या नळ्यांची बनविलेली असल्याने जेथे पाणी क्षारयुक्त आहे तेथे जास्त
उपयोगाची ठरते. अर्थात,
प्रत्येक प्रणालीचे आपापले गुण व दोष असल्याने आपली गरज, भौगोलिक परिस्थिती, पाण्याची गुणवत्ता व सर्वात महत्त्वाचे
आपले बजेट, या सर्व
गोष्टींचा विचार करून निर्णय घेणे योग्य!
विजेची राष्ट्रीय बचत व्हावी व पर्यावरणास
हातभार लागावा म्हणून मी माझ्या घराचा गच्चीवर ३० सप्टेबर २०१२ ला २५० लिटर ई. टी.
सी. सौर वॉटर हिटर बसवून घेतला आहे व तेंव्हा पासून आजतागायत आम्हाला २४x३६५ केव्हाही गरम पाणी मिळते. सौर वॉटर
हिटर बसवण्यासाठी प्लंबिंग कामासह एकूण खर्च रुपये २५,०००/-(दरमहाची गिझर वीज बचत किमान १०००/-
पेक्षा जास्त होत आहे) (हे सयंत्र बसविण्यासाठी गच्चीवर लागणारी जागा १०' x ५') गेल्या ३
वर्षात फक्त एकदाही खर्च आला नाही. बाकी मेंटेनन्स शून्य, फक्त महिन्यातून एकदा
काच स्वच्छ करावी लागते. (आज रोजी, तीन वर्षापूर्वी मी केलेल्या गुंतवणुकीची
पूर्णपणे वसुली झालेली असून पुढील दहा वर्षे निश्चित मला गरम पाणी मिळू शकेल.)
सोलर काचेच्या नळ्यावर पक्षी विष्ठा टाकतात
किंवा नळ्यावर धूळीचा थर बसून पुरेसे ऊन नळ्यांवर पंडत नाही, त्यावेळी पाणी गरम
होण्यास जास्त वेळ लागतो. ( म्हणूनच महिन्यातून एकदा काच पाण्याने धुवून स्वच्छ
करावी लागते).
या मर्यादा लक्षात घेऊन जर ह्या सौर वॉटर
हिटरचा वापर केला तर तुम्हाला चोवीस तास केंव्हाही गरम पाणी तर मिळेलच पण तीन
वर्षात केलेला खर्च भरून निघेल व उर्वरित आयुष्यभर जवळपास मोफत गरम पाणी मिळेल हे
नक्की.
मीही, अपारंपारिक ऊर्जा क्षेत्रात काम करीत असल्याने अपारंपारिक ऊर्जा वापराबाबत सर्वसाधारण
महत्त्व आणि गांभीर्य मला माहीत आहे.
सौरभ लक्ष्मण कुंभार
९८६०००००४५
Great imforinform
ReplyDelete